Topic icon

सण आणि उत्सव

0

पारशी धर्माचे लोक अनेक सण साजरे करतात, त्यापैकी काही प्रमुख सणांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

1. नवरोझ (Nowruz):

  • नवरोझ हा पारशी लोकांसाठी फार महत्वाचा सण आहे.
  • हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.
  • नवरोझ साधारणपणे 21 मार्च रोजी साजरा केला जातो.
  • या दिवशी पारशी लोक नवीन कपडे घालतात, विशेष प्रार्थना करतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात.

2. जमशेदी नवरोझ (Jamshedi Navroz):

  • हा नवरोझ शहेनशाही पंचांगानुसार साजरा केला जातो.
  • पारशी लोक हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.

3. पतेती (Pateti):

  • पतेती हा पारशी लोकांचा नववर्षाचा दिवस आहे, जो ते आपल्या चुकांची कबुली देऊन आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करून साजरा करतात.
  • हा दिवस त्यांच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि शुद्धीकरणाचा असतो.

4. खोरदाद साल (Khordad Sal):

  • खोरदाद साल हाTemplate:फार महत्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी जरथुस्त्र पैगंबर यांचा जन्म झाला होता.
  • या दिवशी पारशी लोक प्रार्थना करतात आणि धार्मिक विधी करतात.

5. गाथा (Gatha):

  • गाथा हे वर्षातील पाच दिवस असतात जे पारशी धर्मात महत्वाचे मानले जातात.
  • हे दिवस अहुर मज्दा (Ahura Mazda) आणि जरथुस्त्र पैगंबर (Zoroaster) यांना समर्पित असतात.
  • या दिवसांमध्ये विशेष प्रार्थना आणि धार्मिक विधी केले जातात.

हे काही प्रमुख सण आहेत जे पारशी लोक मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे करतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
0
पारशी धर्माचे लोक खालील सण आणि उत्सव साजरे करतात:
  • नवरोझ (Navroz): हा पारशी नववर्ष दिन आहे, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. britannica.com
  • खोरदाद साल (Khordad Sal): हा پیغمبر जरथुस्त्र यांचा जन्मदिवस आहे. javananmagazine.com
  • जश्न-ए-मेहेरगन (Jashn-e-Mehergan): हा शरद ऋतूतील कापणीचा आणि न्यायाचा देव মিথ্র (मिथ्र) यांचा उत्सव आहे.
  • जश्न-ए-तिरगाण (Jashn-e-Tirgan): हा पावसाळ्यातील उत्सव आहे, जो देव तिर (Tishtrya) यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
  • फर्वरदिन (Fravardin): हा दिवस आपल्या पूर्वजांना आदराने स्मरण करण्यासाठी असतो.
  • गाथा (Gatha): वर्षाच्या शेवटी पाच दिवस गाथांचे पठण केले जाते, जे अत्यंत पवित्र मानले जातात.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
0
 नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात

 श्रावण मासाची पौर्णिमाला आपण रक्षा बंधन म्हणून साजरी करतो हे तर सगळ्यांना माहित असेल. पण ह्या दिवशी 'नारळी पौर्णिमा' ही देखील साजर केली जाते. 'नारळी पौर्णिमा' ऐक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमाच्या दिवशी साजरी करण्याची पद्दत आहे.
 
श्रावण मास स्वतःमध्ये एक पवित्र मास आहे आणि त्यात श्रावणी पौर्णिमा आणखीन पवित्र मानली जाते. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील दमण आणि दीव, ठाणे, रत्नागिरी, कोकण इत्यादी महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. मूळात महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिमी क्षेत्रामध्ये, कोकण तट येथे कोळी समुदायाचे लोकांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.
 
नारळाचे महत्व:
ह्याला 'नारळी पौर्णिमा' हे नाव नारळामुळे मिळालं आहे. कारण ह्या दवशी नारळचा खूप महत्व असतं. ह्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केलं जातं आणि नारळ भात याचं पूजेत महत्तव असतं. नारळ फळ हिंदू मान्यतेप्रमाणे सगळ्यात शुभ मानलं जातं. ह्याचं एक कारण असे देखील आहे की त्याचा प्रत्येक भाग जसे पाणी, पानं, फळ, केस सगळे कामास येतात. म्हणून पारंपारिकपणे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते. तसेच मासेमारी आणि जल-व्यापारच्या सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केलं जातं.

 
संस्कृती आणि मान्यता
नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे, कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांच्या आयुष्य चालावण्याचे साधन आहे. तसेच नाव पण त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते नावाची देखील पूजा करतात.
 
हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि जल-व्यापाराची सुरुवात ठरवतो. पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोकं समुद्र-देव वरुण यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे. अशात कोळी लोकं काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाही.

 
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडलं जातं. समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्र भरतीच्या वेळी, समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते.
 
हा सण साजर करण्याची तयारीच्या रूपात कोळी आपली नाव सजवतात, त्यांना रंग-रोगण करतात आणि नाववर फुलांची माळा त्यांना अजूनच आकर्षित बनवते. ह्यादिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते. लोकं पारंपारिक पोशाखात पारंपारिक नृत्य देखील करतात, ज्याला 'कोळी नृत्य' म्हणतात.
 
विविधतेत सुंदरता 
हा दिवस ज्याला मुख्यतः 'रक्षा बंधन' म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण तट येथे 'नारळी पौर्णिमा' म्हणतात, भारताचे वेग-वेगळ्या भागात 'राखी पौर्णिमा', श्रावणी पौर्णिमा', 'उपाकर्म' किंवा 'अवनी अवित्तम' म्हणून देखील साजर केला जातो.
 
जसे रक्षा बंधन भाऊ बहिणीचे अतूट बंधनाचा सण आहे त्याप्रकारे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र ह्यांच्यामधील असलेल्या बंधनाचा सण आहे.
 
एकाच उत्सवाचे इतके वेगळे नाव आणि पद्धत हेच तर आपल्या देशाची 'विविधतेत एकता' दर्शवते.

उत्तर लिहिले · 30/8/2023
कर्म · 53710
1


आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात 




आपटा हे जगातलं एकमेव असं झाड आहे ज्याला पौराणिक काळापासून सोन्याची उपमा दिली गेली आहे. आपण सगळेच विजया दशमी म्हणजेच दसऱ्याला चतुर्मासातला एक महत्त्वाचा सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून या सणाचं महत्त्व जाणतो. पण या बरोबरीनेच या दिवशी अगदी लहान असल्यापासून थोरा मोठ्यांकडून आपल्याला आपट्याच्या पानांची पूजा आणि देवाण घेवाण करण्याची शिकवण दिली गेली आहे. आणि या दिवशीच आपट्याच्या पानांना सोन्याचं प्रतिक म्हणजेच सोन्याचं रूप मानलं जातं. पण बाकीच्या दिवशी मात्र ही पानं कचरा कुंडीत पडलेली आपल्याला दिसतात. म्हणून नेमकं याच दिवशी आपट्याच्या पानांना सोन्याची उपमा का दिली जाते आणि त्याची पूजा का केली जाते या मागे पौराणिक कथा आहे. चला जाणून घेऊया.
पैठणमध्ये राहणाऱ्या ब्राम्हण कुटुंबातील कौत्स नावाच्या मुलगा विद्यार्जनासाठी भडोचमध्ये वरतंतू ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींच्या प्रयत्न पूर्वक शिकवणीमुळे कौत्स चौदा विद्यांमध्ये पारंगत झाला. आपल्याला एवढ्या विद्या शिकवणाऱ्या आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा द्यावी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं या हेतूने त्याने आपले गुरू वरतंतू ऋषींना कृतज्ञतापूर्वक त्यांचे ज्ञानासाठी आभार मानले आणि त्यांना गुरुदक्षिणे बाबत विचारणा केली. मात्र त्याच्या या बोलण्यावर वरतंतू ऋषी काहीही बोलले नाहीत. त्याने आणखी दोनदा ऋषींना गुरुदक्षिणे बाबत विचारणा केली तरीही त्यांच्याकडून काहीही जबाब आला नाही. म्हणून एकदा शेवटची विचारणा करूया या विचाराने कौत्सने ऋषींना गुरुदक्षिणेबाबत विचारले. तर त्यावर ऋषींनी उत्तर दिले की, “गुरुची दक्षिणा हीच असते जेव्हा आपला शिष्य हा आपल्याकडून विद्या घेऊन त्याचा उचित वापर करतो. पण तुला मला गुरू दक्षिणाच द्यायची आहे तर ऐक!
तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येसाठी एक कोटी याप्रमाणे चौदा विद्येसाठी चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तू मला एका व्यक्तीकडूनच आणून दे.”
कौत्स हा सामान्य घरातून होता म्हणून कुटुंबातल्या कोणा एकाकडे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मिळवणं म्हणजे अशक्यच होतं. बाहेर कोणाकडून एवढ्या मुद्रा मागणं आणि त्यांनी देणं म्हणजे कठीणच. म्हणून इथल्या प्रजेचा राजा 'रघुराज' हा एक उदात्त राजा असून तो नक्कीच आपली यात मदत करेल या आशेने कौत्स राजाकडे गेला. पण तिथे गेल्यावर कळलं की राजाने आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला आहे. त्यामुळे तो राजाही सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे राहू लागला होता. राजाची ही स्थिती पाहून नाराज मनाने कौत्स तिथून निघतच होता तेवढ्यात राजाने त्याला भेटायला येण्या बाबतचं प्रयोजन विचारलं. त्याने राजाला सांगितलं, “तुम्ही मला या परिस्थितीत मदत करू शकत नाही मात्र मला माझ्या गुरुंना चौदा कोटी सुवर्ण मुद्रिका एका व्यक्तीकडून मिळवण्यास मार्ग सुचवा.” असं म्हंटलं.
त्यावर राजाने त्याला तीन दिवसामध्ये तुझी सुवर्ण मुद्रांची अडचण दूर होईल असं आश्वासन दिलं. इंद्राकडे राहिलेली आपली थकबाकी घेण्यासाठी राजाने इंद्र देवाला लढण्याचे आव्हान केले. मात्र युद्धाचं समजताच इंद्र देवांनी घाबरून, कुबेराकडून राजाच्या आयोध्या नगरीमध्ये सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. मात्र तो वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला. राजाने त्यातली एकही मुद्रा न घेता, कौत्सला त्याला हव्या तेवढ्या मुद्रा घेण्यास सांगितल्या. आपल्याला केवळ आपल्या गुरुंना देण्यासाठी चौदा कोटींच मुद्रा हव्या आहेत हे बोलून त्याने तितक्याच सुवर्ण मुद्रा उचलून राजाचे आभार मानले आणि त्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या.
मात्र आपट्याच्या झाडाखाली अजूनही अनेक सुवर्ण मुद्रांचा ढीग पडला होता. म्हणून राजाने झाडाखाली पडलेल्या मुद्रा नेऊन प्रजेचं कल्याण व्हावं या हेतूने प्रजेला त्या झाडाच्या इथून मुद्रा उचलून नेण्यास सांगितल्या, त्यावेळी प्रजेतील अनेक लोकांनी आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली पडलेलं सोनं लुटलं. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या झाडांची पूजा केली, सोनं लुटलं आणि एकमेकांना देऊन आपल्या मनाचा आनंद व्यक्त केला.
म्हणून त्या दिवसापासून दसऱ्याला आपट्याच्या पानांची सोनं म्हणून पूजा करतात.
आपट्याच्या झाडाचं आणखी एक पौराणिक महत्त्व म्हणजे पांडवांनी त्यांचा अज्ञातवास संपताच शक्तीपूजन केलं. शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही दसऱ्याच्याच दिवशी म्हणून इथे शमीच्या झाडाला जरी महत्त्व असलं तरीही, लोकांमध्ये शमी आणि आपटा या झाडांविषयी भेदाभेद आढळतो. तो भेदाभेद काहीही असला तरी ह्या झाडांची पानं घेऊन गरीबातील गरीब माणूस सुद्धा स्वत:ला श्रीमंत समजून ती संपत्ती आपल्याकडे न ठेवता तिचं वाटप आपल्या आप्तजनांमध्ये करतो. हा सण साधेपणातील ऐश्वर्य सुद्धा दाखवतो. आपट्याच्या पानांचा हृदयाचा आकार आपल्याला हृदये एकमेकांशी जोडण्याचाचा संदेश देतात. असं हे आपट्याचं झाड आपल्या आवारात असलं पाहिजे.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 53710
1


मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली 


दरवर्षी १४ जानेवारीला आपण मकर संक्रात साजरी करतो. आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात. १३ तारखेला भोगी, १४ तारखेला संक्रात आणि १५ तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते. संक्रांत म्हणजे संक्रमण. ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले, त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरली. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनीदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते.
मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत अंघोळ करण्याला विशेष महत्व आहे. सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते, तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जावून मिळाली होती. याची एक कथा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिलमुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. सगरराजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. 
कपिलमुनींनी क्रोधीत होवून त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल.अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होवून पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार मजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभोशंकराची तपश्चर्या केली. जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली. तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली, तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केली जाते.




मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रातीदिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात. जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. काहीजण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे. तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रातीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो. आता फक्त काळा कसा घालणार म्हणून त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजे फक्त काळा असे होत नाही तर त्यात दागिन्याच्या रुपात पांढरा रंग एकरुप होतो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो.
प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. तर अशी ही मकरसंक्रात नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी.
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।
मकरसंक्रांन्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सुर्य देवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरुपी तेज वाढवणारी ठरो, हीच आमच्याकडून शुभेच्छा…. तिळगुळ घ्या गोड गोड बोला !
उत्तर लिहिले · 13/1/2023
कर्म · 53710
0

दिवाळी हा सण साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण हिंदू पंचांगानुसारdefined position आश्विन महिन्याच्या शेवटी आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला असतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
0

चैत्र महिना म्हणजे নবवर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूचा बहर! या महिन्यात निसर्गात आणि जनजीवनात एक नवचैतन्य संचारते. माझ्या आठवणीतील काही चैत्र:

निसर्गातील बदल:

  • चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते.
  • रंगबिरंगी फुले बहरतात, जसे पळस, गुलमोहर.
  • हवेत एक प्रकारचा सुगंध असतो.

सण आणि उत्सव:

  • चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असतो.
  • घरोघरी गुढ्या उभारल्या जातात.
  • नवीन वर्षाची सुरुवात म्हणून अनेक ठिकाणी शोभायात्रा निघतात.
  • राम नवमी देखील याच महिन्यात येते.

आठवणी:

  • गावाला जत्रा असते.
  • नवीन कपडे घेतले जातात.
  • चैत्रात आंब्याचे Panhe (drink) बनवतात.

चैत्र हा आनंद आणि उत्साहाचा महिना आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040