भूगोल मुंबई निर्मिती इतिहास

मुंबईची बेटे किती व कोणती आहेत आणि मुंबईची निर्मिती कशी झाली?

3 उत्तरे
3 answers

मुंबईची बेटे किती व कोणती आहेत आणि मुंबईची निर्मिती कशी झाली?

12



महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे नगर सात बेटांनी बनलेले आहे.

पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती. या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले, ज्यापरत्वे आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे होती -
माहीम (Mahim)
वरळी (Worli)
परळ (Parel)
माझगाव (Mazgaon)
मुंबई (Bombay)
कुलाबा (Calaba)
छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)
मुंबई बेटाची निर्मिती संपादन करा
या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत. त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉइंटपासून वरळीपर्यंत पसरला आहे. या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे. दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे. या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे. या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, अँटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत. या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.
उत्तर लिहिले · 7/12/2019
कर्म · 34255
3
मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर ती सात बेटे खालीलप्रमाणे:

1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माझगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी

या सात बेटांच्या दरम्यान असलेल्या उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड, विटा, मातीच्या साहाय्याने बुजवून सलग मुंबईची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना "आधुनिक मुंबईचा शिल्पकार" असे म्हटले जाते.
😊
उत्तर लिहिले · 7/12/2019
कर्म · 3965
0

मुंबई शहर हे मूळतः सात बेटांचे बनलेले आहे. ही बेटे खालीलप्रमाणे:

  • कुलाबा
  • लहान कुलाबा (ओल्ड वुमन्स आयलंड)
  • माझगाव
  • गिरगाव
  • वरळी
  • परळ
  • माहीम

मुंबईची निर्मिती:

मुंबईची निर्मिती ही अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फळ आहे. पूर्वी ही सात बेटे वेगवेगळ्या खाड्यांनी विभागलेली होती. या बेटांना जोडण्याचे काम ब्रिटिशांनी केले. त्यांनी भराव टाकून आणि बांध घालून या बेटांना जोडले, ज्यामुळे मुंबई शहराला आजचे स्वरूप प्राप्त झाले.

इतिहास:

मुंबईचा इतिहास फार जुना आहे. ही बेटे मौर्य साम्राज्याचा भाग होती. त्यानंतर या बेटांवर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी या बेटांवर ताबा मिळवला. १६६१ मध्ये, पोर्तुगीजांनी ही बेटे ब्रिटिशांना dowry म्हणून दिली.

ब्रिटिशांनी या बेटांचे महत्त्व ओळखले आणि या बेटांना एक मोठे व्यापारी केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बेटांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम केले, Pelhar dam (पेल्हार धरण) व तानसा धरणाच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा सुरळीत केला.

अशा प्रकारे, सात बेटांचे शहर असलेले मुंबई आज एक मोठे महानगर बनले आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5060

Related Questions

अण्णाभाऊ साठे रशियालाच का गेले होते?
कार्ल आणि भाजे लेण्यांमध्ये लेण्यांच्या संबंधीची माहिती विशद करा?
वेरुळ (एलोरा) येथील ब्राह्मणी (हिंदू) लेण्यांचे वर्णन करा.?
प्राचीन भारतीय इतिहासामध्ये नाणे शास्त्राचे योगदान स्पष्ट करा?
मध्ययुगीन काळातील राज्यकर्त्यांनी (बादशहांनी) विनिमयात आणलेल्या नाण्यांविषयी चर्चा करा.
ब्रिटिश काळातील नाण्यांच्या वापराचे स्वरूप स्पष्ट करा.
कल्याणीच्या चालुक्यांविषयी वर्णन करा?