कायदा गुन्हा गुन्हेगारी न्याय इतिहास

प्राचीन काळात गुन्हेगारांना शिक्षा कशी देत असत?

2 उत्तरे
2 answers

प्राचीन काळात गुन्हेगारांना शिक्षा कशी देत असत?

1
  प्राचीन काळात असा दिला जायचा मृत्युदंड, पाहून उडेल थरकाप   ⭕*_

  .         *_आज बहुतेक देशांमध्‍ये गुन्‍हेगारांना शिक्षा म्‍हणून तुरुंगात डांबले जाते किंवा गुन्‍हा गंभीर असेल तर अंतिम शिक्षा म्‍हणून फाशी दिली जाते. मात्र पूर्वी राजे महाराजे गुन्‍हेगारांना अतिशय क्रूर शिक्षा द्यायचे. याबद्दल ऐकूणच थरकाप उडतो. वेगवेगळ्या देशात शिक्षा देण्‍याच्‍या पद्धतीही वेगवेगळ्या होत्‍या. आज आम्‍ही तुम्‍हाला यातील सर्वात भयानक आणि क्रुर पद्धतींबद्दल सांगणार आहोत._*

*पोट फाडून निघायचा उंदीर*
ही क्रुर शिक्षा चीनमध्‍ये दिली जायची. यामध्‍ये व्‍यक्‍तीला पूर्ण नग्‍न करुन झोपवले जायचे. नंतर त्‍याच्‍या पोटावर एका पिंज-यात उंदीर ठेवला जायचा आणि त्‍या पिंज-यावर विस्‍तव ठेवजा जात असे. त्‍यामुळे पिंजरा अतिशय गरम होत असे. या गरमीपासून वाचण्‍यासाठी उंदीर त्‍या व्‍यक्‍तीचे पोट फाडून आत जात असे. *शरीराला मधोमध कापणे*
मध्‍ययुगात एखाद्या गुन्‍हेगाराला टॉर्चर करण्‍यासाठी अशी शिक्षा दिली जायची. यासाठी त्‍याला उलटे लटकवायचे. यामुळे त्‍याच्‍या शरीरातील सर्व रक्‍त डोक्‍याकडे येत असे. नंतर त्‍याच्‍या शरीराला मधोमध पूर्णपणे कापले जायचे.
*चामडी सोलणे*
प्राचिन ब्रिटनमध्‍ये ही अतिशय वेदनादायी शिक्षा गुन्‍हेगार किंवा शत्रुराष्‍ट्राच्‍या सैनिकाला दिली जायची. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,  येथे त्‍या व्‍यक्‍तीची संपूर्ण चामडी सोलली जायची. यादरम्‍यान त्‍या व्‍यक्‍तीचा वेदनेने मृत्‍यू होत असे. नंतर ही चामडी भरचौकात लटकवली जात असे.
*जिवंत भाजणे*
- प्राचीन अथेन्‍समध्‍ये 560बीसी दरम्‍यान गुन्‍हेगारांना अशी शिक्षा दिली जायची ज्‍यामुळे कोणी स्‍वप्‍नातही गुन्‍हा करण्‍याबद्दल विचार करु नये.
- गुन्‍हेगाराला सांडाच्‍या आकाराच्‍या एका तांब्‍याच्‍या भांडयामध्‍ये बंदीस्‍त केले जायचे.
- नंतर ते भांडे लालेलाल होईपर्यंत तापवले जायचे.
- यामुळे यातील व्‍यक्‍तीचा असहनीय वेदनेने जिवंतपणीच भाजून मृत्‍यू होत असे.
*मध चोपडून मृत्‍यूसाठी सोडणे*
ग्रीसमध्‍ये ही विचित्र शिक्षा दिली जायची. गुन्‍हेगारांना बळजबरी दुध आणि मध पिऊ घातले जायचे. नंतर त्‍यांना पूर्ण नग्‍ण करुन एका बोटला बांधले जायचे. आणि मृत्‍यूसाठी घनदाट अरण्‍य किंवा नदीत सोडले जायचे.
*माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*
┕━━━━╗✹╔━━━━┙
*धारदार चाकूने काढले जायचे मांस*
आतापर्यंतच्‍या शिक्षांमध्‍ये या शिक्षेला सर्वाधिक क्रूर म्‍हटले गेले आहे. चिनमध्‍ये ही शिक्षा दिली जायची. गुन्‍हेगाराच्‍या शरीरावर धारदार चाकू चालवून त्‍याचे मांस काढले जायचे. असे त्‍याचा मृत्‍यूहोईपर्यंत केले जायचे. 1905बीसीमध्‍ये या‍ शिक्षेवर चीनमध्‍ये बंदी घालण्‍यात आली. या शिक्षेदरम्‍यान गुन्‍हेगाराला अफीम खाऊ घालण्‍याचे औदार्य तेवढे दाखवले जायचे.
*लाकडी सुळावर चढवणे*
प्राचीन रोममध्‍ये गुन्‍हेगारांना अतिशय धारदार अशा लाकडी सुळावर बसवले जायचे. नंतर ते सूळ हवेत उचलले जायचे. यादरम्‍यान ते सूळ त्‍या व्‍यक्‍तीच्‍या शरीराला चिरुन डोक्‍यातून बाहेर यायचे.
*द ब्रेकिंग व्‍हील*
ही शिक्षा जर्मनीत दिली जायची. यामध्‍ये गुन्‍हेगाराला एका चाकाला बांधले जायचे. याला ब्रेकिंग व्‍हील किंवा कॅथरीना व्‍हील असेही म्‍हटले जायचे. गुन्‍हेगाराला चाकाला बांधुन त्‍याला हातोड्याने तोपर्यंत मारले जायचे जोपर्यंत त्‍याची हाडे तुटत नाहीत.


0

प्राचीन काळात गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे अनेक प्रकार होते. त्यावेळेस शिक्षेचे स्वरूप गुन्ह्याच्या प्रकारानुसार बदलत असे. काही सामान्य शिक्षा खालीलप्रमाणे होत्या:

  • शारीरिक शिक्षा: यामध्ये चाबकाचे फटके मारणे, अवयव कापणे, जखम करणे, आगीत भाजणे अशा शिक्षांचा समावेश होता.
  • देहदंड: काही गंभीर गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना देहदंड (मृत्यू) दिला जात असे.
  • हद्दपार: गुन्हेगारांना त्यांच्या समाजात किंवा राज्यातून हद्दपार केले जाई.
  • गुलामगिरी: गुन्हेगारांना गुलाम बनवून त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेतले जाई.
  • आर्थिक दंड: काही गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना आर्थिक दंड भरण्याची शिक्षा दिली जाई.
  • सामाजिक बहिष्कार: गुन्हेगारांना समाजातून वाळीत टाकले जाई, ज्यामुळे त्यांचे सामाजिक जीवन मुश्किल होई.

शिक्षेचे स्वरूप त्यावेळच्या समाजाच्या नैतिक मूल्यांवर आणि कायद्यांवर अवलंबून असे. प्राचीन समाजात शिक्षेचा उद्देश हा गुन्हेगाराला शिक्षा देणे आणि इतरांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करणे हा होता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1300

Related Questions

आरोपीचे अधिकार काय आहेत?
जन्मठेपेची शिक्षा १४ वर्षांची असते की आयुष्यभराची?
भारतात दररोज किती कैद्यांना फाशी दिली जाते?
कैद्याला फाशी देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा दोर का वापरतात?
CCTNS काय आहे?
जर एखादा पोलीस अधिकारी गुन्हा करतो, तर त्याच्यावर काय कार्यवाही केली जाते?
जर एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा खून केला असेल, तर त्या व्यक्तीला फक्त काही दिवसच शिक्षा का होते? फाशी का नाही होत? जर कायदा बदलायची गरज असेल, तर सर्व जण का तयार होत नाहीत?