कायदा न्यायव्यवस्था गुन्हा गुन्हेगारी न्याय

कैद्याला फाशी देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा दोर का वापरतात?

2 उत्तरे
2 answers

कैद्याला फाशी देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा दोर का वापरतात?

7
.      *_🄼🄰🄷🄸🅃🄸_*

  भारतात गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केवळहाचदोर वापरला जातो  !  ‼


*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*
‼ _*म҉ ा҉ हित҉ ी҉  स҉ े҉ व҉ ा҉  ग्र҉ ू҉ प҉ ,҉  प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉ *_ ‼
------------------------------------------------
*_दि. २७ मे  २҈ ०҈ २०_*
    फाशी देण्यासाठी अतिशय जाड दोर वापरण्यात येतो, जेणेकरून फास तुटू नये आणि तो आवळला जाताच गुन्हेगार त्वरित गतप्राण व्हावा. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फाशीची शिक्षा देण्यासाठी वापरण्यात येणारा दोर हा केवळ एकाच ठिकाणावरून येतो.
हो खरंच आपल्या देशात फाशी देण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचा दोर वापरला जातो आणि हा दोर तयार होतो फक्त बिहार राज्यातील बक्सरच्या तुरुंगात!
╔══╗
║██║      _📍ⓂⒶⒽⒾⓉⒾ_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
*_🥫Mahiti seva group, pethvadgaon🥫_*
-----------------------------------------------
या दोराला म्हणतात ‘मनिला दोर’! आणि हा दोर केवळ बक्सरच्या तुरुंगातील कैद्यांमार्फतच बनवला जातो. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते तेव्हा सरकार बक्सर तुरुंग प्रशासनाकडे या दोराची मागणी करते आणि मग तुरुंग प्रशासन कैद्यांकडून हा स्पेशल मनिला दोर बनवून घेते. ज्याचाच फास काही दिवसांनी गुन्हेगाराच्या गळ्याभोवती आवळला जातो.
*🔹पण केवळ बक्सरच्या तुरुंगामध्येच हा दोर का तयार केला जातो?*
यामागे काही अंशी भौगोलिक कारण आहे. हा तुरुंग गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसला आहे, त्यामुळे सामान्य दिवशी देखील येथील तापमान हे दमट असते. मनिला दोर बनवण्यासाठी दमट वातावरण अतिशय गरजेचे आहे. दमट वातावरणात दोर गुळगुळीत आणि अधिक घट्ट होतात.
*गुन्हेगाराचे शरीराचा संपूर्ण भार काही सेकंद थोपवून धरण्यासाठी ज्या दोराने फाशी द्यायची आहे तो दोर गुळगुळीत आणि अधिक घट्ट असणे अत्यावश्यक असते.꧁༺* बक्सर तुरुंगातील कैदी अतिशय दमट तपमानामध्ये बसून आपल्या खुबीने हा दोर अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम बनवतात.
दोर बनवण्यापूर्वी ज्या गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे त्याच्या शरीराचा सर्व तपशील (वजन, उंची वगैरे) तुरुंग प्रशासन मागवून घेते आणि त्यानुसारच दोर बनवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट ज्या गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे त्याच्या उंचीच्या १.६ पट लांबीचा दोर तयार केला जातो आणि इतका जाड बनवला जातो जेणेकरून दोराला गुन्हेगाराचे वजन सहज पेलवेल.१९३० सालापासून बक्सर तुरुंगातील कैदी मनिला दोर तयार करत आहेत, म्हणजेच ब्रिटीश राजवटपासून या दोराचा वापर फाशी साठी केला जात आहे.
क्रूरकर्मा अजमल कसाब आणि अफजल गुरु या दोघांच्या गळ्याभोवती देखील याच मनिला दोराने फास आवळला गेला होता.
इनमराठी वरून साभार
https://m.facebook.com/story.php?story_fbid=726472797750646&id=100011637976439
-----------------------------------------------
*WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
*📍म҉ ा҉ हित҉ ी҉  स҉ े҉ व҉ ा҉  ग्र҉ ू҉ प҉ ,҉   प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉  📍*
*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*


0

कैद्याला फाशी देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा दोर वापरण्यामागे काही कारणं आहेत:

  • दोर मजबूत असावा: फाशी देताना दोर तुटायला नको, म्हणून तो मजबूत आणि जाड असावा लागतो. साधारणपणे मनीला नावाच्या वनस्पतीपासून बनवलेला दोर वापरला जातो, कारण तो मजबूत असतो.
  • दोर गुळगुळीत असावा: दोर गुळगुळीत असेल तर फाशी देताना तो कैद्याच्या मानेभोवती व्यवस्थित आवळला जातो आणि त्याला त्रास कमी होतो.
  • ठराविक लांबी: दोरीची लांबी कैद्याच्या वजनानुसार ठरवली जाते. जास्त वजन असलेल्या कैद्यांसाठी दोरी लहान ठेवतात, ज्यामुळे त्याला कमी वेळात जास्त आघात होतो.
  • फासा व्यवस्थित तयार करणे: फाशीचा फासा तयार करण्यासाठी अनुभवी जल्लाद (executioner) लागतो. फासा व्यवस्थित बनवला तर कैद्याला कमी त्रास होतो.

या गोष्टींमुळे फाशीची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद होण्यास मदत होते.

टीप: फाशी देणे हे अत्यंत गंभीर कृत्य आहे आणि या प्रक्रियेबद्दल जास्त माहिती देणे उचित नाही.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1300

Related Questions

आरोपीचे अधिकार काय आहेत?
पोलिस व त्याचे तपास नियम काय आहेत?
सर्व प्रकारचे तक्रारी अर्ज मिळतील का?
कायदा व पळवाटा?
कायदा आणि बचाव?
जमीन कशा प्रकारे मिळवायची?
बेकायदेशीर परमिट रूम व बिअर बार चालू आहे, तो बंद कसा करायचा?