3 उत्तरे
3 answers

CCTNS काय आहे?

2
पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते क्राईम डिटेक्शनसाठी काढलेले सॉफ्टवेअर आहे.
उत्तर लिहिले · 15/3/2019
कर्म · 165
2


सीसीटीएनएस प्रकल्पाद्वारे सर्व पोलीस ठाणी व कार्यालये संपर्कात

या प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.

  • Published on: September 16, 2015 5:18 am
NEXT



महत्त्वाच्या बातम्या

‘क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील १०४१ पोलीस ठाणी आणि ६३८ वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालये जोडणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य झाले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले. ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘डिजिटल महाराष्ट्र’ घडविण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
डिजिटल महाराष्ट्राच्या दृष्टीने सीसीटीएनएस हे सकारात्मक पाऊल आहे. यामुळे पोलीस खात्यातील पारदर्शकता वाढेल आणि पोलिसांची कामगिरी व प्रतिमा उंचावेल. संघटीत गुन्हेगारीचे मोठे आव्हान आज पोलिसांसमोर आहे, असे या लोकार्पण सोहोळ्याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याकरिता त्याचा पाया मजबूत असायला हवा. ती कमतरता दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या प्रकल्पाप्रमाणेच राज्यातील सर्व जिल्ह्यांत फॉरेन्सिकचे युनीट तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तर लिहिले · 16/3/2019
कर्म · 1245
0

CCTNS म्हणजे Crime and Criminal Tracking Network and Systems. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सुरू केलेले एक मिशन मोड प्रोजेक्ट आहे. CCTNS चा उद्देश देशभरातील पोलीस स्टेशन्सना एकाच नेटवर्क मध्ये जोडणे आहे.

CCTNS प्रणालीचे मुख्य उद्देश:

  • गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करणे.
  • गुन्ह्यांचा तपास आणि गुन्हेगारांना पकडण्यास मदत करणे.
  • पोलीस स्टेशनमधील कामकाज सुलभ करणे.
  • नागरिकांसाठी पोलीस सेवा ऑनलाइन उपलब्ध करणे.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2580

Related Questions

विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड येथे तक्रार करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली आहे का?
Comet Engine ॲप बद्दल माहिती?
CPGRAMS वरील तक्रारींचे किती दिवसात निवारण होते?
व्हॉट्सॲप डीपीचा स्क्रीनशॉट बंद करायची सेटिंग काय आहे?
मोबाईलवरून कंप्यूटरचे बेसिक ज्ञान घ्यायचे आहे?
मला कंप्यूटरचे बेसिक ज्ञान शिकायचे आहे?
सी पी जी आर ए एम एस?