केस सौंदर्य आणि केस निगा आरोग्य

केस गळतीवर उपाय सांगा, प्लीज. खूप प्रॉब्लेम आहे केसांचा?

2 उत्तरे
2 answers

केस गळतीवर उपाय सांगा, प्लीज. खूप प्रॉब्लेम आहे केसांचा?

5
केसगळती रोखा या काही घरगुती उपायांनी !
 

काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१००केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा

१) कांद्याचा रस

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

कसे कराल ?
- एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा

- रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा

- सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या

- आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा

२) लसुण

कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही 'सल्फर'चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते .

कसे कराल ?
- लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या

- त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या

- मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा

- ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका

- असे आठवड्यातून दोनदा करा.

३) नारळ

केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

कसे कराल ?
- नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा

- तासाभराने केस धुऊन टाका

- किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा

- रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

४) हीना

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ' हीना ' प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.

कसे कराल ?
- २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला.

- हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या.

- आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा

- सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊ न टाका

अन्य  घरगुती हीना पॅक्स बनवण्यासाठी - (हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय) नक्की पहा.

५) जास्वंद

जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

कसे कराल ?
- काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.

- हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा

- थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरीचदेखील बनवू शकता हे  जास्वंदाचे हेअर पॅक्स

६) आवळा

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी 'आवळा' नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.

कसे कराल ?
- आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा

- हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या

- केस कोमट पाण्याने धुऊन टाका

७) अंड

अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कसे कराल ?
- एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.

- १५ ते २० मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .
उत्तर लिहिले · 3/11/2019
कर्म · 11990
0
केस गळती एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर अनेक उपाय आहेत. खाली काही उपाय दिले आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात:
  1. आहार:
    • प्रथिने (proteins) युक्त आहार घ्या: केस प्रामुख्याने केराटीन नावाच्या प्रथिनेपासून बनलेले असतात. त्यामुळे आहारात डाळ, कडधान्ये, अंडी, आणि मांस यांचा समावेश असावा. WebMD - Foods for Hair Growth
    • लोह (iron) युक्त पदार्थ: लोहाच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी पालक, खजूर, आणि बीट (beet) खा.
    • ओमेगा-3 फॅटी ऍसिड (omega-3 fatty acids): हे केसांना पोषण देतात. यासाठी मासे, अळशी (flaxseed), आणि चिया सीड्स (chia seeds) आहारात घ्या.

  2. केसांची निगा:
    • सौम्य شامبو वापरा: harsh chemicals असलेले شامبو टाळा.
    • तेल लावा: आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. तेल केसांच्या मुळांना पोषण देते. Healthline - Home Remedies for Hair Growth
    • गरम पाण्याचा वापर टाळा: गरम पाण्याने केस धुतल्यास ते कोरडे आणि निर्जीव होतात.
    • हेअर ड्रायरचा (hair dryer) वापर कमी करा: जास्त उष्णता केसांना कमजोर करते.

  3. घरगुती उपाय:
    • कोरफड (aloe vera): कोरफडीचा गर केसांना लावा. यामुळे केसांमधील कोंडा (dandruff) कमी होतो आणि केस मजबूत होतात.
    • मेथी: मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट (paste) केसांना लावा.
    • कांद्याचा रस: कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती कमी होते.

  4. तणाव कमी करा:
    • तणावामुळे केस गळू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करा, meditation करा आणि पुरेशी झोप घ्या.

  5. डॉक्टरांचा सल्ला:
    • जर केस गळती जास्तच असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. थायरॉईड (thyroid) किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे देखील केस गळू शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2220

Related Questions

त्वरित केस गळती थांबवण्यासाठी उपाय सांगा?
टक्कल पडले आहे, लवकर केस येण्यासाठी उपाय सांगा?
डीएचटीमुळे केस गळत आहेत, उपाय काय आहे? कोणते तेल वापरायला हवे?
कांद्याचा रस लावल्याने डोक्यावर नवीन केस उगवतात का?
माझे वय फक्त २३ वर्ष आहे आणि मला समोरून टक्कल पडत आहे आणि केस पण खूप पातळ झाले आहेत, हॉस्पिटलमध्येOptional[str] = None गेल्यावर १००% फरक पडेल का किंवा दुसरा एखादा खात्रीशीर उपाय असला तर सुचवा?