सौंदर्य केस सौंदर्य आणि केस निगा आरोग्य

कांद्याचा रस लावल्याने डोक्यावर नवीन केस उगवतात का?

3 उत्तरे
3 answers

कांद्याचा रस लावल्याने डोक्यावर नवीन केस उगवतात का?

4
कांदा हा केस गळती रोखतो. कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगलाहोतो. त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्पइंफेक्शन नष्ट करतो. आणि त्याचबरोबर केसांना मजबूत बनण्यास मदत करतो.कसा उपयोग करणार- कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस्त केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवू द्यावा. त्यानंतरचांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे.- कांद्याच्या रसाबरोबर मध लावलेली चांगली. एक चतुर्थ कप रसात थोडीशी मध मिसळायची. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल.- एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा. कांदा एक रात्र तसचा ठेवावा. दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी. त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील. या रमने केसांचा मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करावा. केस गळायचे थांबतील.- एक चमच्या मद आणि एक चमच्या दालचिन पावडरमध्ये थोडे ऑलिव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी. आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे. असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल.- आकाशवेल (अमरवेल) पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे थांबतात.
उत्तर लिहिले · 12/8/2017
कर्म · 210095
1
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण भरपूर असल्याने ते केस गळणे कमी करण्यास व केसांची रिग्रोथ करण्यास मदत करते.
फक्त हा उपाय योग्य प्रकारे व सातत्याने करायला हवा. 3 महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल.
कांदा केसांसाठी कसा वापरायचा हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा....
उत्तर लिहिले · 24/4/2024
कर्म · 70
0

कांद्याचा रस लावल्याने डोक्यावर नवीन केस उगवतात का, याबद्दल काही प्रमाणात सकारात्मक माहिती उपलब्ध आहे. कांद्याच्या रसामध्ये सल्फर ( गंधक ) असते, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक मानले जाते.

कांद्याच्या रसामुळे होणारे संभाव्य फायदे:

  • केसांची वाढ उत्तेजित होते: कांद्याच्या रसामुळे केसांच्या मुळांना रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते.
  • केसांचे गळणे कमी होते: कांद्याचा रस केसांमधील कोंडा आणि इतर संक्रमण कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
  • केस मजबूत होतात: कांद्याच्या रसामध्ये असलेले पोषक तत्वे केसांच्या मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केस लवकर तुटत नाहीत.

उपयोग कसा करावा:

  1. कांद्याचा रस काढून घ्या आणि तो थेट डोक्याच्या त्वचेला लावा.
  2. रसाने डोक्याला 10-15 मिनिटे मसाज करा.
  3. 30 मिनिटे ते 1 तास रस डोक्यावर राहू द्या.
  4. नंतर शॅम्पूने केस धुवा.

संशोधन आणि निष्कर्ष:

या संदर्भात काही वैद्यकीय संशोधन देखील झाले आहे. जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कांद्याचा रस लावल्याने काही लोकांमध्ये केसांची वाढ सुधारली आहे.
(जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी अभ्यास)

खबरदारी:

  • काही लोकांना कांद्याच्या रसामुळे त्वचेला खाज येऊ शकते किंवा ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे, प्रथमpatch test ( थोड्याश्या भागावर लावून बघणे ) करणे चांगले.
  • जर तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल, तर त्वरित वापर थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer : येथे दिलेली माहिती केवळ ज्ञानाच्या उद्देशाने आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2220

Related Questions

राईस ब्रँड तेलाचे फायदे?
सतत चिडचिड होते. टाळायचा विचार करतोय पण नियंत्रण रहात नाही, काय करावे?
दात मजबूत करण्यासाठी काही उपाय आहेत का?
सेक्स पॉवर कमी करण्यासाठी काय करावे?
आर.सी.एच. कॅम्पच्या आयोजनाकरिता ए.एन.एम. ची भूमिका व जबाबदाऱ्या लिहा?
आपण आपल्या उपकेंद्रात कोणकोणत्या नोंदवह्या ठेवाल?
नव्याने उघडलेल्या उपकेंद्रात आपली ए.एन.एम. म्हणून नियुक्ती झालेली आहे का?