2 उत्तरे
2
answers
श्रीयाळ षष्ठी (श्रियाल षष्टी) बद्दल माहिती द्या?
2
Answer link
श्रीयाळ शेठ राजांचा एक दिवसाचा उत्सव साजरा करतात ..

श्रीयाळशेठ राजा हा दानशुर ,निस्पृह असा राजा होता. 1315 ते 1450 या काळात हा राजा महाराष्ठ्र कर्नाटक परिसरात राज्य करत होता .1396 साली सतत बारा वर्षे राज्यातील प्रजेला दुष्काळाने भरडुन काढले होते. या काळात त्यांनी सातत्याने बैलगाडया फिरत्या ठेवुन सर्वत्र मदतकार्य सुरु ठेवले .श्रीयाशशेठच्या या कामाची माहिती बेदरच्या राजाला कळाली.त्यांनी श्रीयाळशेठला बोलावुन घेतले आणि त्याचा कामाचे कौतुक केले. त्याबद्दल बेदरच्या राजाने त्याना काय हवे असे सांगितले . श्रीयाळशेठ त्यांना तुमचे तख्यतावर साडेतीन तास बसण्याचे मागणी केली. त्यानुसार राजाने आपले तख्य सोडले .तेव्हा श्रीयाळ शेठ यांनी त्यावेळी दुरावस्थेत असलेल्या सर्व धर्माच्या मंदिर,मस्जिद यांना राजाच्या खजिन्यातुन देणग्या,इनामे दिली.राजाची औठ घटकेची मुदत संपताच त्यांनी बेदर राजाचे तख्त खाली केले .अशा राजाचा उत्सव बोरगांव दे येथे एक दिवसांसाठी साजरा केला जातो .

श्रीधरस्वामी नाझरेकर यांच्या "शिवलीलामृत" या ग्रंथामध्ये राजा श्रीयाळश्रेष्ठ, राणी चांगुणा आणि चिलिया बाळाची कथा दिली आहे ती पुढीलप्रमाणे
श्रीयाळश्रेष्ठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता, त्याची चांगुणा नावाची राणी होती. अनेक वर्ष या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. अनेक नवससायासानंतर अनेक वर्षांनी भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी वरदान दिले. त्यानंतर श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणीला मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी लाडाने "चिलिया" असे ठेवले. राजा राणी आणि राजकुमार अगदी आनंदात होते. त्यांच्या धनधान्याने भरलेल्या घरी येणा-या प्रत्येकाला पोटभर आणि हवे ते जेवायला वाढले जात असे. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणा-या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत.
एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळश्रेष्ठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूने "मला नरमांस हवे" अशी इच्छा बोलून दाखवली. पण श्रीयाळश्रेष्ठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण अतिथी आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं केले. एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून राणीने बाळाचं कांडण केलेलं शीर बाजूला काढून ठेवले आणि मांस शिजवले ते फक्त धडाचं. जेव्हा ते साधू पुढे आणले तेव्हा साधूच्या वेशातील भगवान शंकरांना लक्षात येतं कि चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे. पुन्हा एकदा क्रोधीत
होऊन साधू जेवण न करता उठतात पण मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणीने त्या साधूचे पाय धरून माफी मागितली. भगवान शंकराची करुणा भाकली "भगवंताआता आमची किती परीक्षा पाहणार आहेस". मग चांगुणा राणीने ते शीर शिजवले आणि साधूच्या ताटामध्ये वाढले.

राजा-राणीने साधुपुढे हात जोडून पदर पसरून याचना केली "हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण कर". मग साधू वेशातील भगवान शंकर त्यांचा त्याग पाहून प्रसन्न झाले आणि म्हणाले तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला काय हवा तो इच्छित वर मागा. बिचारी राणी चांगुणा पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि साधूला म्हणते कि लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तुम्ही धुऊन टाकू शकता का? आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते.आणि समोर पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येत आहे आणि आईला बिलगते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. श्रीयाळश्रेष्ठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात कि तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त दीड घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं.
श्रीयाळ श्रेष्ठ अर्थात शिराळशेठ ची कथा
इसवी सन १३९६ ते १४०८ पर्जन्यमान कमी झाल्याने दख्खन प्रदेशात बारा वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते. विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अराजक माजले होते, अन्न पाण्यावाचून लोक मृत्यूमुखी पडत होते. रयत गाव सोडून परागंदा होत होती. यावेळी शिवभक्त श्रीयाळ श्रेष्ठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले. त्याची हि दानशूर वृत्ती पाहून आदिलशाहने त्याला एक दिवसासाठी राजा केले. परंतु हर्षोल्हासाने औट घटकेतच मृत्यू पावला पण या औट घटकेत रयतेच्या हिताची अनेक कामे केली, तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठी म्हणून आजही हा दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. श्रीयाळ श्रेष्ठ चे कालौघात शिराळशेठ असा अपभ्रंश झाला, तर श्रीयाळ श्रेष्ठ शिव भक्त असल्याने शंकरोबा या ग्रामीण भाषेत ओळखला जातो त्याचेच सक्रोबा असे नामाभिधान प्राप्त झाले.
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरगड मंदिरामध्ये आणि कडेपठार मंदिरामध्ये सक्रोबा पूजन केले जाते. त्यासाठी श्रीयाळ श्रेष्ठची माती, बांबूच्या कामठ्या वापरून राजवाडा बनविला जातो, पुरातन काळामध्ये घरांना सजवण्यासाठी धान्याचा वापर करण्यात येई. म्हणून या महालाला डाळ आणि गुंजेने सजवलेलं आहे. आतील मातीच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इ. धान्ये भरून ठेवलेली असतात.त्याला गुंज, डाळी इ. साहित्यांनी सजविली जाते,आतमध्ये अन्न- धान्न्यांनी भरलेली मातीची भांडी, तसेच अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी ठेवलेली असतात. राजवाड्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली जाते तर हवेलीच्या वरील भागामध्ये श्रीयाळची मूर्ती बनविली जाते. मंदिरातील सदरेवर आरती करून कोळी समाजातील लांघी कुटुंबियातील व्यक्ती ती हवेली डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पायरी मार्गाने खाली उतरून
नगर पेठेतून लेंडी ओढ्यानजीकच्या चिल्लाळाची विहीर येथे आरती करून विसर्जन केले जाते. यावेळी वीर दांगट, घडशी समाजातील तरुण ढोल सनई वाजवून देवाची सेवा करतात तर गुरव पूजारी पूजेची व्यवस्था करतात.
लेखन-श्री.सं.पां.उपाध्ये गुरूजी
श्रीक्षेत्र जेजुरी
_________________________________
आज श्रीयाळ षष्टी,
लोककल्याणकारी औट घटकेचा राजा श्रीयाळशेट याची
स्मृती म्हणून आपण शेकडो वर्ष साजरा करतो,
श्रीयाळ षष्टीच्या शुभेच्छा ....................................
रसुल खडकाळे मु.पो.बोरगाव(देशमुख) ता.अक्कलकोट जि.सोलापूर (महाराष्ट्र) +919168390345..........
�न्यूज & अपडेटस..whatsapp GROUP —
0
Answer link
श्रियाळ षष्ठी हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील षष्ठी तिथीला येतो.
श्रियाळ षष्ठी साजरी करण्यामागील काही प्रमुख गोष्टी:
कथा:
या सणाशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे. त्यानुसार, श्रीयाळ नावाचा एक राजा होता, जो आपल्या दानशूर स्वभावासाठी ओळखला जात होता. एकदा भगवान शंकर आणि पार्वती यांनी एका वृद्ध ब्राह्मण जोडप्याच्या रूपात त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी राजाकडे त्याचे पुत्र आणि पत्नी मागितले. राजाने कोणतीही कुरकुर न करता ते दान केले. त्यांच्या निस्वार्थ दानाने प्रभावित होऊन, भगवान शंकराने त्यांना परत त्यांचे कुटुंब दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
महत्व:
हा सण विशेषतः स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी साजरा करतात.
पारंपारिक पदार्थ:
या दिवशी विशेषत: पुरणपोळी आणि दिंड (तांदळाच्या पिठाचे उकडलेले गोळे) बनवले जातात.
पूजा: स्त्रिया शंकराची आणि पार्वतीची पूजा करतात आणि व्रत ठेवतात.
श्रियाळ षष्ठी हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचे प्रतीक आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
लोकमत - [https://www.lokmat.com/spiritual/shriyal-shashthi-2023-auspicious-day-shiyal-shashthi-shravan-month-a178/](https://www.lokmat.com/spiritual/shriyal-shashthi-2023-auspicious-day-shiyal-shashthi-shravan-month-a178/)
झी २४ तास - [https://zeenews.india.com/marathi/dharmik/shriyal-shashthi-2023-date-shubh-muhurat-and-significance-a-218281.html](https://zeenews.india.com/marathi/dharmik/shriyal-shashthi-2023-date-shubh-muhurat-and-significance-a-218281.html)