2 उत्तरे
2
answers
बौद्धिक संपदा दिवस म्हणजे काय?
0
Answer link
🧐 _*आज बौद्धिक संपदा दिवस(Intellectual Property Day); असे करा रक्षण!*_
________=___________
_आपण बऱ्याचदा पेटंट, ट्रेडमार्क वगैरे नावे ऐकतो पण हे बौद्धिक संपदा (Intellectual Property) चे च प्रकार आहेत. आपल्या बौद्धिक संपदाचे रक्षण व्हावे म्हणून जे कायदे अस्तित्वात आहेत तेच पेटंट, ट्रेडमार्क अॅक्ट वगैरे होत आणि या सर्वांना बौद्धिक संपदा असे म्हणतात._
_हे सर्व मुख्यत्वेकरून माणसाच्या प्रतिभेचा अविष्कार होत आणि हे अविष्कार ही त्या त्या व्यक्तीची बौद्धिक संपदा ठरते. उदा : एखाद्या माणसाने लिहिलेले पुस्तक, कविता, कंप्यूटर प्रोग्राम, केलेले पेन्टिंग, नविन लावलेला शोध, वैशिष्ठापूर्ण डिजाईन, वगैरे. आता ही बौद्धिक संपदा जेव्हा तयार होते तेव्हा ती आपोआप आपल्या मालकीची असते परंतु त्याचे रक्षण करायचे असेल तर आपल्याला त्यासंबंधीच्या विविध कायद्यांचा आधार घ्यावा लागेल._
🎯 _*बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.*_
_1._ _*कला क्षेत्र*_ : _साहित्य,चित्र, शिल्प, संगीत, नाट्य किंवा चलचित्र इ. – यावर त्यांच्या निर्मात्याला कॉपीराईट (स्वामित्व हक्क) मिळतो._
_2._ _*ट्रेडमार्क*_ : _उत्पादनाची ओळख पटवणारे चिन्ह असेल किंवा ब्रॅण्डनेम किंवा उत्पादनाची ओळख बनलेलं घोषवाक्य, यावर ट्रेडमार्क मिळतो._
_3._ _*इंडस्ट्रियल डिझाईन*_ : _एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, कारचा किंवा मोबाईल फोनचा नाविन्यपूर्ण आकार, इ. वर इंडस्ट्रियल डिझाईन मिळते._
_4._ _*भौगोलिक निर्देशक*_ : _एखादे भौगोलिक ठिकाण जेंव्हा त्या उत्पादनाची ओळख बनते, तेंव्हा त्यावर ‘जिओग्राफिकल इंडीकेटर’ ही बौद्धिक संपदा मिळते._
_5._ _*पेटंट*_ : _एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला मिळतं ते पेटंट!_
_हे वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक संपदा हक्क त्यांच्या निर्मात्याला या निर्मितीवर ठराविक काळापुरते स्वामित्व हक्क बहाल करतात. या काळात निर्मात्याच्या परवानगीशिवाय ही निर्मिती मग कुणीही वापरू शकत नाही; तिच्यावर तिच्या मालकाची या काळात मक्तेदारी असते._
_थोडक्यात म्हणजे आपल्याकडे असलेली बौद्धिक संपदा शोधून तिचे योग्य ते रक्षण कसे करता येईल? व त्यावर मालकी हक्क कसा प्रस्थापित करता येईल? यावर विचार करणे ही बदलत्या जमान्याची गरज आहे._

बौद्धिक संपदा दिवस (World Intellectual Property Day) दरवर्षी २६ एप्रिल रोजी साजरा केला जातो.
उद्देश:
- बौद्धिक संपदेचे महत्त्व आणि समाजाच्या विकासातील त्याचे योगदान याबद्दल जागरूकता वाढवणे.
- नवीन कल्पना आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे.
- सर्जनशील आणि नवोन्मेषी लोकांचा सन्मान करणे.
बौद्धिक संपदा म्हणजे काय?
बौद्धिक संपदा म्हणजे आपल्या बुद्धीने निर्माण केलेली संपत्ती. यात शोध, कला, साहित्य, डिझाइन आणि व्यापारी चिन्हे यांचा समावेश होतो.
बौद्धिक संपदेचे प्रकार:
- पेटंट (Patent): नवीन शोधांसाठी दिले जाते.
- ट्रेडमार्क (Trademark): वस्तू आणि सेवांसाठी वापरले जाणारे चिन्ह.
- कॉपीराइट (Copyright): साहित्य आणि कलाकृतींचे हक्क.
- औद्योगिक डिझाइन (Industrial Design): वस्तूंचे दृश्य स्वरूप.
हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (WIPO) सुरू केला.