2 उत्तरे
2
answers
नवनिर्मिती हक्क (Patents Rights) बद्दल माहिती मिळेल का?
9
Answer link
📙 *नवनिर्मितीचे हक्क (Patents Rights)* 📙
************************************
एखाद्या नवनिर्मितीसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. कष्टाचे स्वरूप आर्थिक असू शकेल वा बौद्धिक. विशिष्ट स्वरूपाचे आराखडे तयार करण्यासाठी तासंतास बौद्धिक कसरत करावी तर लागतेच, पण तो आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक गुंतवणूकही लागते. या सर्वांचे फळ म्हणून तयार झालेली एखादी वस्तू जेव्हा सर्वांसमोर येते तेव्हा त्यातील खुब्या ओळखुन वा चक्क ती विकत घेऊन पूर्णत: सोडवून कशी बनवली आहे, हे पाहून तिची नक्कल करणे खूपच सोपे असते.
ही नक्कल कदाचित कमी प्रतीची असू शकते, कदाचित सरसही ठरू शकते. पण या पद्धतीत ज्याने ही वस्तू तयार केली, त्याचे मात्र अतोनात नुकसान होऊ लागते. त्याच्या देखत त्याची कला विकून दुसरा पैसे मिळू लागलेला असतो. या गोष्टी गेल्या पाच दशकात फार मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या. विज्ञानाची झेप झपाट्याने उंचावत गेली व जवळपास दर दिवशी नवीन एखादी कल्पना कोणीतरी शोधून काढू लागले. याबद्दलची भांडणे विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागताच समंजसपणे यातून मार्ग काढला गेला. तो मार्ग म्हणजे नवनिर्मितीचे हक्क अबाधित राखण्याचा. *पेटंट राईट्स* या नावाने जगभर हा कायदा ओळखला जातो.
प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेतच. पण या सर्वांना साधणारा आंतरराष्ट्रीय पेटंट्स राइट्सचा कायदाही आता येऊ घातला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कशी करता येईल याची शंभराहून अधिक देशांनी एकत्र येऊन चर्चाही पूर्ण केली आहे. 'डंकेल प्रस्ताव' या नावाने ओळखला जाणारा हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पायाभूत कायदा ठरणार आहे. सध्याच्या काळात एका देशात तयार झालेली वस्तू विकत घेऊन दुसऱ्या देशात नेऊन तिची नक्कल बनवली गेली, तर फारसे काही करता येत नाही. याच प्रकारातून जपान, चीन, कोरिया, तैवान यांनी मोठीच मुसंडी मारून जागतिक बाजारपेठ काबीज केली. भारतीय औषधव्यवसायही असाच फोफावत आहे. धान्याची बियाणे व पैदाशीची जनावरे यांच्या बीजांबद्दलही खूपच वाद आहेत. या सर्वांवर नियंत्रण येऊ घातले आहे.
नवनिर्मितीचे हक्क मिळवण्याची पद्धत वरवर सोपी पण खूपच कष्टदायक असते. एखादी गोष्ट खास पद्धतीने तयार केली आहे, असा दावा असल्यास त्याचे सर्व आराखडे, विस्तृत तांत्रिक वर्णन हे या हक्क देणाऱ्या मंचाकडे दाखल करावे लागतात. ही पद्धत स्वतःचीच कशी व अन्य इतरांपासून वेगळेपण काय, यांवर मागितल्यास स्पष्टीकरणही द्यावे लागते. या काळात 'पेटंट पेंडिंग' असे तात्पुरते कळवले जाते. दावा मान्य झाल्यास एक कायमचा क्रमांक दिला जातो. तुमच्या निर्मितीवर हा क्रमांक कोरला वा छापला म्हणजे मग त्याची नक्कल करणार्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.
नवनिर्मितीचा हक्क विकण्याचीही पद्धत आहे. हे हक्क विकल्यावर विकत घेणार्याकडे सर्व अधिकार जातात. खूप मेहनत घेऊन लावलेला एखादा शोध प्रत्यक्ष वापरात आणणे आर्थिकदृष्ट्या अनेकांना शक्य नसते. अशा वेळी हे हक्क विकून त्याचा पैसा करणे व केलेला खर्च भरून काढणे हा सोपा उपाय वापरला जातो. अनेकदा दहापैकी एखादाच हक्क व्यवहारात वापरता येतो. अन्य हक्क फक्त कागदोपत्री नोंदले जातात.
सामन्यात: ८ ते १६ वर्षांपर्यंत हे हक्क अबाधित राखले जाण्याची सोय आहे. त्यानंतर मात्र कोणीही निर्मिती करू शकतो. कोणत्याही पेटंट हक्काबद्दल राष्ट्रीय वाचनालयात वा पेटंट कार्यालयात सर्व माहिती उपलब्ध असते. ती कोणालाही उपलब्ध होऊ शकते. तिचाच उपयोग करून जे बाजारात आलेले नाही, असे काहीतरी शोधून काढण्याची सुरुवात संशोधक करतात. त्या दृष्टीने हा कायदा संशोधक व हक्कधारक या दोघांनाही एक प्रकारे उपयुक्त ठरतो.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

0
Answer link
नवनिर्मिती हक्क (Patent Rights)
नवनिर्मिती हक्क, ज्याला पेटंट (Patent) देखील म्हणतात, हा एक प्रकारचा बौद्धिक संपदा अधिकार आहे. हा अधिकार सरकारद्वारे नविन शोध, रचना किंवा प्रक्रियेसाठी दिला जातो. पेटंट मिळाल्यानंतर, पेटंट धारकाला त्याच्या शोधाचा वापर करण्याचा, बनवण्याचा, विकण्याचा आणि आयात करण्याचा विशेष अधिकार मिळतो.
पेटंटचे प्रकार:
- युटिलिटी पेटंट (Utility Patent): हे पेटंट नवीन आणि उपयुक्त प्रक्रिया, मशीन, उत्पादन किंवा पदार्थांच्या रचनांसाठी दिले जाते.
- डिझाइन पेटंट (Design Patent): हे पेटंट एखाद्या वस्तूच्या नवीन, मूळ आणि सजावटीच्या डिझाइनसाठी दिले जाते.
- प्लॅन्ट पेटंट (Plant Patent): हे पेटंट नवीन वनस्पतींच्या शोधासाठी आणि उत्पादनासाठी दिले जाते.
पेटंट मिळवण्याची प्रक्रिया:
- शोध (Invention): तुमच्याकडे नवीन आणि उपयुक्त शोध असणे आवश्यक आहे.
- अर्ज (Application): पेटंट कार्यालयात योग्य अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
- तपासणी (Examination): पेटंट कार्यालय तुमच्या अर्जाची तपासणी करते आणि शोध नवीन आहे की नाही हे पाहते.
- मंजुरी (Grant): तपासणीत तुमचा शोध पात्र ठरल्यास, पेटंट मंजूर केले जाते.
पेटंटचे फायदे:
- अधिकार (Rights): पेटंट धारकाला त्याच्या शोधाचे अधिकार मिळतात.
- बाजारपेठ (Market): पेटंट धारकाला बाजारपेठेत स्पर्धात्मक लाभ मिळतो.
- उत्पन्न (Income): पेटंट धारक आपल्या शोधाचे लायसन्स देऊन किंवा विकून उत्पन्न मिळवू शकतो.
भारतातील पेटंट:
भारतात, पेटंट मिळवण्यासाठी पेटंट कायदा, १९७० (Patents Act, 1970) आणि पेटंट नियम, २००३ (Patents Rules, 2003) चे पालन करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: ipindia.nic.in