Topic icon

बौद्धिक संपदा

6
1914 साली ‘इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट’ कायदा आला व त्यानंतर 1957 मध्ये ‘द कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957’ असे त्याचे नामकरण करण्यात आले.



★ ‘द कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957’ मध्ये तेव्हापासून तर 1994 पर्यंत अनेक सुधारणा केल्या आहेत.
कोणतीही स्वतंत्र निर्मिती – म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत इ. तयार केल्यावर त्याचा स्वामित्व हक्क(कॉपीराईट) त्याच्या कर्त्यांला मिळतो.

★ मूळ कृतीत बदल करणे, त्यात काटछाट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्या कृतीला बाधा येत असेल वा त्यायोगे कर्त्यांच्या प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का बसत असेल तर अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास कर्ता कायद्याने रोखू शकतो किंवा संबंधितांकडे नुकसान भरपाईही मागू शकतो.
उत्तर लिहिले · 26/1/2021
कर्म · 765
0

बौद्धिक संपदा (Intellectual Property - IP) कौशल्ये आणि अर्थकारण यांचा खूप जवळचा संबंध आहे. बौद्धिक संपदा म्हणजे বুদ্ধीचा वापर करून तयार केलेली संपत्ती. यामध्ये शोध (Inventions), कला, साहित्य, डिझाईन आणि व्यापारी चिन्ह (Trademarks) यांचा समावेश होतो.

बौद्धिक संपदा कौशल्ये आणि अर्थकारण:

  • आर्थिक विकास: बौद्धिक संपदा देशाच्या आर्थिक विकासाला चालना देते. नवीन शोध आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, ज्यामुळे उत्पादन वाढतं आणि नवीन उद्योग सुरू होतात.
  • गुंतवणूक: बौद्धिक संपदा अधिकार (IP Rights) गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईटमुळे कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये आणि ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होतात.
  • रोजगार निर्मिती: नवीन उद्योग आणि व्यवसायांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बौद्धिक संपदा आधारित उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते, ज्यामुळे शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन मिळतं.
  • स्पर्धात्मकता: बौद्धिक संपदा कंपन्यांना बाजारात स्पर्धात्मक बनवते. नवीन आणि सुधारित उत्पादने तयार करण्याची प्रेरणा मिळते, ज्यामुळे ग्राहकांना चांगले पर्याय उपलब्ध होतात.
  • तंत्रज्ञान हस्तांतरण: बौद्धिक संपदा अधिकारामुळे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण (Technology Transfer) सोपे होतं. विकसनशील देशांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळते.

बौद्धिक संपदा कौशल्ये:

  • पेटंट ड्राफ्टिंग (Patent Drafting): नवीन शोधांसाठी पेटंट तयार करण्याची क्षमता.
  • ट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration): आपल्या ब्रँड नावाचे आणि लोगोचे संरक्षण करण्याची प्रक्रिया.
  • कॉपीराईट व्यवस्थापन (Copyright Management): आपल्या कला आणि साहित्यकृतींचे हक्क सुरक्षित ठेवणे.
  • बौद्धिक संपदा मूल्यांकन (IP Valuation): बौद्धिक संपदेचे आर्थिक मूल्य ठरवणे.
  • बौद्धिक संपदा कायद्याचे ज्ञान (Knowledge of IP Laws): बौद्धिक संपदा कायद्याची माहिती असणे.

उदाहरण:

भारतात, 'मेक इन इंडिया' (Make in India) आणि 'स्टार्टअप इंडिया' (Startup India) सारख्या योजना बौद्धिक संपदा अधिकारांना प्रोत्साहन देतात. यामुळे नवीन उद्योगांना चालना मिळाली आहे आणि देशाच्या आर्थिक विकासात मदत झाली आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2820
3



बिल गेट्स ने आपली ऑपरेटिंग सिस्टीम इतरांना इतर सिस्टीम मध्ये वापरण्यास देताना त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा कॉपीराईट अधिकार स्वतःकडेच ठेवला त्यामुळे त्यास ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रत्येक कॉपी मागे पैसे मिळत गेले.

असा कॉपीराईट कायद्याचा अभूतपूर्व उपयोग करताना आपणही जगातील सर्वात यशस्वी माणसाचा आदर्श नकीच घ्यावा.

कॉपीराईट कायद्यांतर्गत आपणस पुढील अधिकार मिळतात.

पब्लिकला आपले कॉपी प्रोटेक्टेड काम विकणे किंवा भाड्याने देणे.
कामाच्या अधारीत शो किंवा कार्यक्रम आयोजित करणे.
कामाबद्दल इतरांना महिती देणे.
स्वतःच्या वा व्यावसायिक कामासाठी याचा वापर करणे.
कामाचे प्रदर्शन किंवा विक्री करणे.
आपण बऱ्याच ठिकाणी (C) हे चिन्ह पाहते ते चिन्ह कॉपीराईट प्रोटेक्टेड हे दर्शविते.

आपल्या नकळत जर कोणी आपण कॉपीराईट केल्याला कामावरून टी व्ही प्रोग्राम करत असेल,किंवा आपल्या कॉपी प्रोटेक्टेड फोटोग्राफचा वापर व्यावसायिक प्रसिद्धीसाठी करत असेल किंवा कोणी आपला कॉपी प्रोटेक्टेड प्रोग्राम अधिकृत लायसन्स शिवाय वापरत असेल तर त्यांवर आपण कायदेशीररीत्या कारवाही करू शकतो.
उत्तर लिहिले · 27/9/2020
कर्म · 11990
0
🧐 _*आज बौद्धिक संपदा दिवस(Intellectual Property Day); असे करा रक्षण!*_
________=___________
_आपण बऱ्याचदा पेटंट, ट्रेडमार्क वगैरे नावे ऐकतो पण हे बौद्धिक संपदा (Intellectual Property) चे च प्रकार आहेत. आपल्या बौद्धिक संपदाचे रक्षण व्हावे म्हणून जे कायदे अस्तित्वात आहेत तेच पेटंट, ट्रेडमार्क अ‍ॅक्ट वगैरे होत आणि या सर्वांना बौद्धिक संपदा असे म्हणतात._

_हे सर्व मुख्यत्वेकरून माणसाच्या प्रतिभेचा अविष्कार होत आणि हे अविष्कार ही त्या त्या व्यक्तीची बौद्धिक संपदा ठरते. उदा : एखाद्या माणसाने लिहिलेले पुस्तक, कविता, कंप्यूटर प्रोग्राम, केलेले पेन्टिंग, नविन लावलेला शोध, वैशिष्ठापूर्ण डिजाईन, वगैरे. आता ही बौद्धिक संपदा जेव्हा तयार होते तेव्हा ती आपोआप आपल्या मालकीची असते परंतु त्याचे रक्षण करायचे असेल तर आपल्याला त्यासंबंधीच्या विविध कायद्यांचा आधार घ्यावा लागेल._

🎯 _*बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.*_

_1._ _*कला क्षेत्र*_ : _साहित्य,चित्र, शिल्प, संगीत, नाट्य किंवा चलचित्र इ. – यावर त्यांच्या निर्मात्याला कॉपीराईट (स्वामित्व हक्क) मिळतो._

_2._ _*ट्रेडमार्क*_ : _उत्पादनाची ओळख पटवणारे चिन्ह असेल किंवा ब्रॅण्डनेम किंवा उत्पादनाची ओळख बनलेलं घोषवाक्य, यावर ट्रेडमार्क मिळतो._

_3._ _*इंडस्ट्रियल डिझाईन*_ : _एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, कारचा किंवा मोबाईल फोनचा नाविन्यपूर्ण आकार, इ. वर इंडस्ट्रियल डिझाईन मिळते._

_4._ _*भौगोलिक निर्देशक*_ : _एखादे भौगोलिक ठिकाण जेंव्हा त्या उत्पादनाची ओळख बनते, तेंव्हा त्यावर ‘जिओग्राफिकल इंडीकेटर’ ही बौद्धिक संपदा मिळते._

_5._ _*पेटंट*_ : _एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला मिळतं ते पेटंट!_

_हे वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक संपदा हक्क त्यांच्या निर्मात्याला या निर्मितीवर ठराविक काळापुरते स्वामित्व हक्क बहाल करतात. या काळात निर्मात्याच्या परवानगीशिवाय ही निर्मिती मग कुणीही वापरू शकत नाही; तिच्यावर तिच्या मालकाची या काळात मक्तेदारी असते._

_थोडक्यात म्हणजे आपल्याकडे असलेली बौद्धिक संपदा शोधून तिचे योग्य ते रक्षण कसे करता येईल? व त्यावर मालकी हक्क कसा प्रस्थापित करता येईल? यावर विचार करणे ही बदलत्या जमान्याची गरज आहे._
उत्तर लिहिले · 26/4/2019
कर्म · 569245
9
📙 *नवनिर्मितीचे हक्क (Patents Rights)* 📙
************************************

एखाद्या नवनिर्मितीसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. कष्टाचे स्वरूप आर्थिक असू शकेल वा बौद्धिक. विशिष्ट स्वरूपाचे आराखडे तयार करण्यासाठी तासंतास बौद्धिक कसरत करावी तर लागतेच, पण तो आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक गुंतवणूकही लागते. या सर्वांचे फळ म्हणून तयार झालेली एखादी वस्तू जेव्हा सर्वांसमोर येते तेव्हा त्यातील खुब्या ओळखुन वा चक्क ती विकत घेऊन पूर्णत: सोडवून कशी बनवली आहे, हे पाहून तिची नक्कल करणे खूपच सोपे असते.

ही नक्कल कदाचित कमी प्रतीची असू शकते, कदाचित सरसही ठरू शकते. पण या पद्धतीत ज्याने ही वस्तू तयार केली, त्याचे मात्र अतोनात नुकसान होऊ लागते. त्याच्या देखत त्याची कला विकून दुसरा पैसे मिळू लागलेला असतो. या गोष्टी गेल्या पाच दशकात फार मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या. विज्ञानाची झेप झपाट्याने उंचावत गेली व जवळपास दर दिवशी नवीन एखादी कल्पना कोणीतरी शोधून काढू लागले. याबद्दलची भांडणे विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागताच समंजसपणे यातून मार्ग काढला गेला. तो मार्ग म्हणजे नवनिर्मितीचे हक्क अबाधित राखण्याचा. *पेटंट राईट्स* या नावाने जगभर हा कायदा ओळखला जातो.

प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेतच. पण या सर्वांना साधणारा आंतरराष्ट्रीय पेटंट्स राइट्सचा कायदाही आता येऊ घातला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कशी करता येईल याची शंभराहून अधिक देशांनी एकत्र येऊन चर्चाही पूर्ण केली आहे. 'डंकेल प्रस्ताव' या नावाने ओळखला जाणारा हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पायाभूत कायदा ठरणार आहे. सध्याच्या काळात एका देशात तयार झालेली वस्तू विकत घेऊन दुसऱ्या देशात नेऊन तिची नक्कल बनवली गेली, तर फारसे काही करता येत नाही. याच प्रकारातून जपान, चीन, कोरिया, तैवान यांनी मोठीच मुसंडी मारून जागतिक बाजारपेठ काबीज केली. भारतीय औषधव्यवसायही असाच फोफावत आहे. धान्याची बियाणे व पैदाशीची जनावरे यांच्या बीजांबद्दलही खूपच वाद आहेत. या सर्वांवर नियंत्रण येऊ घातले आहे.

नवनिर्मितीचे हक्क मिळवण्याची पद्धत वरवर सोपी पण खूपच कष्टदायक असते. एखादी गोष्ट खास पद्धतीने तयार केली आहे, असा दावा असल्यास त्याचे सर्व आराखडे, विस्तृत तांत्रिक वर्णन हे या हक्क देणाऱ्या मंचाकडे दाखल करावे लागतात. ही पद्धत स्वतःचीच कशी व अन्य इतरांपासून वेगळेपण काय, यांवर मागितल्यास स्पष्टीकरणही द्यावे लागते. या काळात 'पेटंट पेंडिंग' असे तात्पुरते कळवले जाते. दावा मान्य झाल्यास एक कायमचा क्रमांक दिला जातो. तुमच्या निर्मितीवर हा क्रमांक कोरला वा छापला म्हणजे मग त्याची नक्कल करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.

नवनिर्मितीचा हक्क विकण्याचीही पद्धत आहे. हे हक्क विकल्यावर विकत घेणार्‍याकडे सर्व अधिकार जातात. खूप मेहनत घेऊन लावलेला एखादा शोध प्रत्यक्ष वापरात आणणे आर्थिकदृष्ट्या अनेकांना शक्य नसते. अशा वेळी हे हक्क विकून त्याचा पैसा करणे व केलेला खर्च भरून काढणे हा सोपा उपाय वापरला जातो. अनेकदा दहापैकी एखादाच हक्क व्यवहारात वापरता येतो. अन्य हक्क फक्त कागदोपत्री नोंदले जातात.

सामन्यात: ८ ते १६ वर्षांपर्यंत हे हक्क अबाधित राखले जाण्याची सोय आहे. त्यानंतर मात्र कोणीही निर्मिती करू शकतो. कोणत्याही पेटंट हक्काबद्दल राष्ट्रीय वाचनालयात वा पेटंट कार्यालयात सर्व माहिती उपलब्ध असते. ती कोणालाही उपलब्ध होऊ शकते. तिचाच उपयोग करून जे बाजारात आलेले नाही, असे काहीतरी शोधून काढण्याची सुरुवात संशोधक करतात. त्या दृष्टीने हा कायदा संशोधक व हक्कधारक या दोघांनाही एक प्रकारे उपयुक्त ठरतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 13/10/2018
कर्म · 569245
2
माझ्या माहितीप्रमाणे, कॉपीराइट जसेच्या तसे किंवा बदल करून लिहिल्यास कॉपीराइट ॲक्टचा भंग होतो. यासाठी तुम्हाला कॉपीराइट ज्याच्या नावावर आहे त्याची लेखी परवानगी लागते.
उत्तर लिहिले · 9/8/2018
कर्म · 0
16
*ट्रेडमार्क नोंदणी*
---------------------------------------------
📌 *ट्रेडमार्क  ( Trademark )* म्हणजे पारले , बिसलरी , निरमा, नोकिया या उद्योगांत एकप्रकारे समानता आहे ते म्हणजेच या उद्योगांचे नाव सर्वदूर पसरलेले असून कोठेही ते लगेच चटकन लक्षात येते.या उद्योगांच्या गुणवत्ते बद्दल लोकांना खात्री झालेली असते.

📌 असेच तुमच्या एखादे गुणवान प्रॉडक्ट किंवा उत्तम सेवांची ओळख बनविणे व त्या नावाचा कायदेशीर हक्क घेणे म्हणजेच ट्रेडमार्क घेणे होय. ( व्यापार बोधचिन्ह )

*📌 ट्रेडमार्क चे प्रमुख फायदे :*

*१)* तुमचा उद्योग सगळीकडे चटकन ओळखला जातो.
*२)* तुमच्या उत्पादनाची नक्कल करता येत नाही.
*३)* तुमचे गुडविल तयार होते.
*४)* तुम्हाला तुमच्या उद्योगाची प्रसिद्धी करता येते.


_*📄ट्रेडमार्क साठी लागणारी कागद पत्रे*_
१. ओळखीचा पुरावा.
२.लोगो व जर पूर्वी वापरला असला तर शपथपत्र.
३.फॉर्म ४८.

*❓काय काय ट्रेडमार्क होऊ शकते ?*
१.👤नाव ( Name trademark ) – तुमचे नाव किंवा आडनाव किंवा पूर्ण नाव  ट्रेडमार्क होऊ शकते जसे की टाटा किंवा किर्लोस्कर.

२. 🆎शब्द (Word  ) – एखादा शब्द ट्रेडमार्क होऊ शकतो जसे की गुगल  , कोको कोला .

३.🎞चित्र किंवा फोटो ( image trademark ) – Apple चा लोगो जसा आहे तसे एखादे चित्र किंवा ऑडी कारचा लोगो.

४.🔢काही आकडे ( Number ) –  जसे की 555 हा पत्त्यांचा ट्रेडमार्क.

५.🎙काही आवाज ( Audio Trademark ) – काही आवाज जसे की नोकिया ची रिंग टोन किंवा एयरटेल ची ट्यून.
---------------- -------------------
उत्तर लिहिले · 18/9/2018
कर्म · 569245