वजन वाढवणे आहार

लोक मला लुकडा म्हणून खूप चिडवत असतात मला आहार संबधित योग्य तो सल्ला दया जेणेकरून माझी तब्येत थोडी लवकर वाढेल?




वजन वाढवायचे आहे ना, मग हे अवश्य खा..

सडपातळ व्यक्तींनी प्रथम आपली भूक वाढविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तुम्ही एकाच वेळी न खात थोड्या-थोड्या वेळाने खाऊ शकता. तसेच हळूहळू जेवणाचे प्रमाण वाढवा.

केळी - वजन वाढविण्यासाठी केळी खूपच उपयुक्त आहे. एका केळातून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात. व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते. अनेकदा खेळाडू ब्रेकमध्ये उर्जा मिळवण्यासाठी केळ खातात.

बटाटा - आहारात सुमारे ४०टक्के घटकांपासून कर्बोदक असतील अशा पदार्थांचा समावेश करा. यात तुम्ही बटाट्याचा समावेश करू शकता. परंतु बटाटा सालीसकट खा.

दूध - दुधातून प्रामुख्याने मिळणारी प्रोटिन्स व कर्बोदके तसेच इतर पोषणद्रव्यामुळे वजन वाढते. १०० मिली दुधातून सुमारे ३.४ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात आणि रोज २ ग्लास दूध प्यायल्यास तुम्ही १४ ग्रॅम प्रोटिन्स मिळू शकतात.

अंडी - अंड्यांच्या सेवनाने देखील शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. १०० ग्रॅम अंड्याच्या सेवनाने सुमारे १३ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. अंड्यातील ‘व्हिटामिन ए’ व ‘व्हिटामिन बी १२’ आरोग्यास चांगला फायदा होतो. 

मांसाहार- शाकाहाराप्रमाणेच मांसाहार देखील घेणे फायदेशीर आहे. चिकनमधून खूप प्रोटिन्स मिळतात. तुम्ही महिन्याभर रोज चिकन खाल्ले तरी तुम्हाला चांगला फरक जाणवेल.

लोणी- वजन वाढवण्यासाठी लोण्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा. यातून मुबलक प्रमाणात मेद मिळते. जे की, वजन वाढण्यास उपयुक्त ठरते.

सुकामेवा- काजू, बदाम, अक्रोड यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात नक्कीच घ्या. वजन वाढविण्यासाठी हा एक परफेक्ट मार्ग आहे.

सोयाबीन - वजन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी कर्बोदके पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी याचा खूपच फायदा होतो.  

राजे

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

लोक मला लुकडा म्हणून खूप चिडवत असतात मला आहार संबधित योग्य तो सल्ला दया जेणेकरून माझी तब्येत थोडी लवकर वाढेल?

Related Questions

वयस्कर लोकांनी काय आहार घ्यावा?
कोणते मासे खाण्यासाठी चांगले आहेत?
उन्हाळ्यात अंडे खावे की नको?
आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?
आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश का करावा?
1 वर्षाच्या मुलाला खायला काय काय द्यावे?
हिरवे मूग खाण्याचे फायदे?