भारत सामान्य ज्ञान इतिहास

भारताचे पहिले लोकपाल कोण?

3 उत्तरे
3 answers

भारताचे पहिले लोकपाल कोण?

5

🎯 *पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल; राष्ट्रपतींकडून नियुक्ती*

🧐 भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाला मिळाले पहिले लोकपाल 

👍 केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी केली नियुक्ती, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला दिली मंजुरी

👉 घोष पुढील चार वर्ष घोष लोकपालचे अध्यक्ष असतील, लोकपालच्या अध्यक्षांना सरन्यायाधीशांइतकाच पगार आणि दर्जा असेल

🤔 *पिनाकी चंद्र घोष कोण?*
▪ देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते.
▪ ते आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत.
▪ ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.
▪ न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.


🙏 *अण्णांनी केले स्वागत* :
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पी.सी. घोष यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. अण्णा म्हणाले, 48 वर्षानंतर जनआंदोलनाला एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे

उत्तर लिहिले · 20/3/2019
कर्म · 35170
1
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी घोष होणार भारताचे पहिले लोकपाल.
उत्तर लिहिले · 18/3/2019
कर्म · 455
0

भारताचे पहिले लोकपाल न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष होते. त्यांनी 23 मार्च 2019 रोजी लोकपाल म्हणून शपथ घेतली.

लोकपाल हे भारतातील भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरण आहे, जे सार्वजनिक सेवकांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

भारतीय आकाशवाणीची वाटचाल थोडक्यात लिहा?
बलुतेदारी व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
भाऊसाहेबांच्या बखरीचे स्वरूप स्पष्ट करा?
संत नामदेवांचा जीवन परिचय लिहा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परीस्थितीचे वर्णन करा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करा?
औद्योगिक क्रांती काळातील यंत्रशोधांवर टिपा लिहा?