सौंदर्य केस घरगुती उपाय त्वचा आणि सौंदर्य आरोग्य

माझ्या आईचे केस खूप गळतात यावर काही उपाय असेल तर सांगा?

2 उत्तरे
2 answers

माझ्या आईचे केस खूप गळतात यावर काही उपाय असेल तर सांगा?

4
केसांच्या समस्या सोडवण्यासाठी काही घरगुती उपाय.


तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा

२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.

३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.

४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.

५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.

६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.

7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.

8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.

9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.

10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.

11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.

12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.

13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.

15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.

16. अळशीच्या बिया खा.

17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.

18. केसांमधून सतत हात फिरवू नये.

19. केसांना नेहमी  फणीने विंचरले पाहीजे.

20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.


*अवेळी गळणाऱ्या केसांवर आणखी काही उपाय.*

झेंडूचे फुल बारीक करून त्‍याचा रस काढा. हा रस नारळाच्‍या तेलात टाकून उकळून घ्‍या. हे तेल थंड झाल्‍यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- जटामांसी या वनस्पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळून हे तेल थंड झाल्‍यानंतर बॉटलमध्‍ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्‍याला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- आहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेल टाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.

- आवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्‍यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्‍ट तयार करून केसाच्‍या मुळाला लावावी. एका तासानंतर केस स्‍वच्‍छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्‍यानंतर डोक्‍यावर केस यायला लागतील.

- दोन लीटर पाण्‍यामध्‍ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्‍याने आढवड्यातून दोन वेळा केस स्‍वच्‍छ करा. यामुळे केस गळती थांबते.

- जैतूनच्‍या(ऑलिव्ह ऑइल) तेलामध्‍ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्‍ट तयार करावी. स्‍नान करण्‍याआगोदर ही पेस्‍ट डोक्‍याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्‍याने स्‍वच्‍छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.

- शिकाकाईच्‍या बीयामध्‍ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्‍यावे. रात्रभर पेस्‍ट थंड असेलल्‍या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्‍ट केसाला लावून अर्ध्‍या तासानंतर केस स्‍वच्‍छ करावे. हे पेस्‍ट केसासाठी नॅचरल शॅम्‍पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्‍यानंतर केस गळतीची समस्‍या दूर होते.

- आहारात मेथीच्‍या भाजीचा वापर जास्‍तीत-जास्‍त केल्‍या नंतर आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्‍या बीया रात्रभर पाण्‍यात भिजत ठेवा. सकाळी याचे पेस्‍ट तयार करा. हे पेस्‍ट केसाला लावल्‍यांनतर केस गळती थांबते.

- जास्‍वदांच्‍या फुलाचा रस काढून घ्‍या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्‍वच्छ करावेत. केस दाट होण्‍याबरोबरच काळे होतात.

*वरील उपाय डॉक्टरांच्या सल्यानुसार करावे.*
उत्तर लिहिले · 1/3/2019
कर्म · 3205
0
आईच्या केसांचे गळणे थांबवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:

आहार:

  • आहारात प्रथिने (proteins), लोह (iron), आणि जीवनसत्त्वे (vitamins) भरपूर असावीत.
  • पालक, मेथी, गाजर, डाळिंब, आणि दही यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा.

तेलाने मसाज:

  • नारळाचे तेल, बदाम तेल, किंवा ऑलिव्ह ऑईलने नियमितपणे केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबूत होतात.
  • तेल लावल्यानंतर, गरम पाण्याने भिजवलेल्या टॉवेलने केस वाफवा.

केसांची काळजी:

  • केस धुण्यासाठी सौम्य شامبو (shampoo) वापरा आणि गरम पाण्याचा वापर टाळा.
  • केस जोरजोरात न चोळता हळूवारपणे धुवा.
  • ओले केस विंचरू नका, ते कमजोर असतात आणि तुटण्याची शक्यता असते.

घरगुती उपाय:

  • कांद्याचा रस: कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे कमी होते. (संशोधन)
  • मेथी: मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट केसांना लावा.
  • आवळा: आवळ्याचा रस किंवा आवळ्याचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात.

डॉक्टरांचा सल्ला:

  • जर केस गळणे जास्तच वाढले असेल, तर त्वचा रोग तज्ञाचा (dermatologist) सल्ला घ्या.
  • थायरॉईड (thyroid) किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे केस गळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा.

तणाव कमी करा:

  • तणाव (stress) हे केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे योगा, ध्यान, आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईच्या केसांचे गळणे कमी करू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

माझ्या डोक्यात/केसात नेहमी कोंडा होतो. त्यावर काय उपाय करावा? (मी केसांना तेल लावत नाही)
केसगळती वर हमखास उपाय काय?
माझ्या नखाला इन्फेक्शन झाले आहे, लाल छोटा फोड आहे तर त्याच्यावर उपाय सुचवा?
केस गळतीवर चांगला उपाय काय?
अंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरले तर काय होते?
माझे केस खूप गळत आहेत, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मला एक गोष्ट कळत नाही की जे रस्त्यावरचे भिकारी लोक असतात, त्यांना नीट खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही आणि आंघोळही करायला मिळत नाही, तरीही त्यांचे केस गळत नाहीत आणि आम्ही रोज आंघोळ करून चांगलं खाऊन असतो, तरीही आमचे केस का गळतात?
पांढरे केस उपटल्याने नवीन पांढरे केस येतात काय?