सौंदर्य केस त्वचा आणि सौंदर्य आरोग्य

पांढरे केस उपटल्याने नवीन पांढरे केस येतात काय?

2 उत्तरे
2 answers

पांढरे केस उपटल्याने नवीन पांढरे केस येतात काय?

5
*‼३०  एप्रिल २०१६  ची माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची फेसबुक पोस्ट‼*
---------------------------------------------------
♏ *एक पांढरा केस उपटल्याने अधिक पांढरे केस उगवतात का ?*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=158721634525768&id=100011637976439
♏ माहिती सेवा गृप पेठवड़गाव केस पांढरे होणं हे म्हातारपणाचे लक्षण मानले जाते. परंतू आजकाल पोषक आहाराच्या अभावाने किंवा तणावग्रस्त जीवनशैलीमुळे तरुणांचेदेखील केस पांढरे होतात.  स्पष्टपणे दिसणारे पांढरे केस लपण्यासाठी केसांना रंगवण्याचा किंवा ते कमी प्रमाणात असल्यास उपटून काढण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र केस अशाप्रकारे उपटून काढल्यास ते अधिक वाढण्याची शक्यता असते का  ?
केस पांढरे कशामुळे होतात ? 
वाढ्त्या वयानुसार, म्हातारपणात केस पांढरे होतात.मात्र तरुणांमध्ये अकाली केस पांढरे होण्याची शक्यता वाढली आहे. जसजसे वय वाढते तसतसे  पिंगमेंंट सेल्स म्हनजेच केसांना नैसर्गिकरित्या रंग देणार्‍या पेशी मृत पावतात. त्यामुळे पिंगमेंंट सेल कमी झाल्यास त्याचा केसांच्या रंगावर परिणाम दिसून येतो. हळूहळू केस पांढरे होतात. माहिती सेवा गृप पेठवड़गाव एक पांढरा केस उपटला तर अजून वाढतात का ?
जर एक पांढरा केस उपटला तर त्या जागी अजून केस येतील का? हा प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळतो. अशा प्रकारे केस उपटल्याने 3-4 अजून पांढरे केस येतात हा केवळ गैरसमज आहे. यामध्ये फारसे तथ्य नाही. एका केसामध्ये जे दोष असतील ते त्याच्या आजूबाजूला असणार्‍या केसांपर्यंत पसरत नाही. त्यामुळे एक केस उपटला तर त्याच्या आजूबाजूला असणार्‍या केसांवर त्याचा परिणाम होत नाही. किंवा या कारणामुळे अधिक पांढरे केस उगवत नाहीतⓂपांढरे केस उपटल्याने अजून पांढरे केस उगवत नसले तरीही ही सवय मूळीच योग्य नाही. कारण अशाप्रकारे केस उपटल्याने त्या भागावरील फोलिसेलचे नुकसान होते. यामुळे त्यावर सामान्य केस उगवणेही भविष्यात कठीण आहे. एकाचवेळी अनेक केस उपटल्यास विशिष्ट भागावर टक्कलेपणा दिसून येतो. त्यामुळे केस उपटून काढण्याऐवजी त्याला मेहंदी, नैसर्गिक रंग़ याने रंगवाⓂ♏तसेच अकाली केस पांढरे होण्याची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार आहारात आणि दैनंदीन जीवनात बदल करणे आवश्यक आहे. यामुळे कालांतराने केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल.♏
0

नाही, पांढरे केस उपटल्याने नवीन पांढरे केस येत नाहीत.

तथ्य:

  • केसांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो.
  • जेंव्हा मेलॅनिनचे उत्पादन कमी होते, तेंव्हा केस पांढरे होतात.
  • केस उपटल्याने मेलॅनिनच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही.
  • एका केसाच्या जागी दुसरा केस उगवतो, पण तो पांढराच असतो जर मेलॅनिनचे उत्पादन कमी झाले असेल तर.

त्यामुळे, पांढरे केस उपटल्याने त्यांची संख्या वाढत नाही.

टीप: वारंवार केस उपटल्याने केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि ते केस पुन्हा न वाढण्याची शक्यता असते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

लहान मुलाचे केस वाढवण्यासाठी काय करावे?
निर्भरणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?
योग साधनेसाठी नैसार्गिक ओषधी वनस्पतींचे?
योग जीवनशैली म्हणजे काय?
फास्ट फुडचे परिणाम?