संस्कृती सण रूढी परंपरा पूजा सण आणि उत्सव

दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात?

2 उत्तरे
2 answers

दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात?

6


दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोने घ्या चांदी द्या” म्हणत दसरा साजरा करत असतो. पण आपण आपट्याचीच पाने का वाटतो हे आपणास माहीत आहे का?

चला तर मग आज जाणुन घेऊया विजयादशमी तथा दस-याला सोनं म्हणुन आपट्याची पाने का वाटतात.

आपट्याची पाने तेजतत्व रुपी आहेत, त्याने वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. आपट्याची पाने तम-रजात्मक असल्याने त्याच्यातून प्रक्षेपित होणारे तेज कण वातावरणात शुद्धता निर्माण करतात.
या आपट्याच्या पानात ईश्वरी तत्वाचा वलय निर्माण होतो. त्यामुळे ती पाने एकमेकांना दिल्यावर दोन्ही व्यक्तींच्यात आनंदाचे व स्नेहपुर्वक संबंध निर्माण होतात अशी उदात्त भावना हिंदू परंपरेत आढळून येते. त्यामुळे दस-याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आपण दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना “सोन घ्या सोन्यासारख रहावा” असे म्हणतो.

आपट्याची पाने दुसरी मान्यता


मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम ने लंकेवर हल्ला करण्यापूर्वी आपट्याच्या झाडाला वंदन करीत विजयासाठी प्रार्थना केली होती असे मानले जाते. भगवान श्रीराम ने आपट्याच्या पानांना स्पर्श केल्याने युद्ध जिंकले अशी मान्यता आहे. त्यामुळेच विजयादशमी दिवशु सुख, समृद्धि, आणि विजय मिळवण्यासाठी आपट्याच्या पानांना कालांतरात सोन्याचे स्थान मिळाले.
उत्तर लिहिले · 19/2/2019
कर्म · 35170
0

दसर्‍याला आपट्याची पाने वाटण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. ह्या परंपरेमागे अनेक कारणं आहेत:

  • सोन्याचीsymbol: आपट्याची पाने सोन्यासारखी दिसतात आणि दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटणं शुभ मानलं जातं. त्यामुळे आपट्याची पाने 'सोनं' म्हणून एकमेकांना दिली जातात.
  • विजय आणि समृद्धी: दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस आहे. आपट्याची पाने वाटून लोक विजयाचा आनंद व्यक्त करतात आणि समृद्धीची कामना करतात.
  • पुराणकथा: अशी एक आख्यायिका आहे की कुबेराने रघु राजाला सुवर्णमुद्रा (gold coins) देऊन मदत केली होती, जी राजाने आपट्याच्या झाडाखाली लपवून ठेवली होती. दसऱ्याच्या दिवशी ती पाने सोन्याची झाली, म्हणून दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरु झाली.
  • सामाजिक महत्त्व: आपट्याची पाने वाटून लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि सलोखा वाढवतात.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पारशी धर्माचे लोक कोणते सण साजरे करतात?
पारशी धर्माचे लोक कोणकोणते सण उत्सव साजरे करतात?
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?
मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?
दिवाळी सण कोणत्या महिन्यात येतो?
तुम्ही अनुभवलेले चैत्र तुमच्या शब्दात वर्णन करा?