शरीर
फळ
कृषी
रासायनिक खते
केमिकलचा वापर करून पिकवलेली फळे कोणकोणती आहेत आणि त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
2 उत्तरे
2
answers
केमिकलचा वापर करून पिकवलेली फळे कोणकोणती आहेत आणि त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
7
Answer link
फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर करून झटपट नफा कमावण्यासाठी फळाचे ठोक आणि घाऊक विक्रेते ग्राहकांच्या जीवाशी राजरोसपणे हा खेळ करीत आहेत. परिणामी पोटाचे विकार, त्वचा रोग आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना आमंत्रण मिळत आहे. या घातक रसायनांचा अंश फळांमध्ये उतरत असल्याने ग्राहक पैसे देऊन दुखणे विकत घेत आहेत. फळे पिकविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. मात्र ही गाईड लाईन धाब्यावर बसवत शहरातील शेकडो फळविक्रेते कॅल्शियम कार्बाइड, इकॉन सारखी घातक रसायने वापरून अनैसर्गिकरीत्या फळांना पिकवत आहेत.
नफेखोरीसाठी जीवाशी खेळ
झाडावरून तोडलेले फळ नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. मात्र झटपट नफा कमविण्यासाठी फळविक्रेते फळांच्या पेटीत कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्या ठेवतात. त्यामुळे पेटीची उष्णता वाढून फळ वेळेच्या आधीच पिकते. वास्तविक या रसायनांमुळे फळांमधले नैसर्गिक सत्व कमी होते. शिवाय त्या फळांमध्ये रसायनांचा अंशही उतरतो. त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक ठरत आहेत. आंबा, चिक्कू, पपई, संत्रे, मोसंबी या सारखी जाड सालपटांची फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरले जाते तर केळी पिकविण्यासाठी इकॉन नावाचे केमिकल वापरले जाते.
बाजारातून विकत घेतलेले फळ नैसर्गिकरीत्या पिकलेले आहे की कृत्रिमरीत्या पकविले आहे, हे शोधण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही.प्रयोगशाळेतच त्याचे परीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे मुजोर झालेले फळविक्रेते ग्राहकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.
रसायनयुक्त फळांमुळे
कॅन्सरचा धोका
कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशा फळांच्या सेवनामुळे त्यातील रसायनांचे अंश पोटात जातात. त्यामुळे पोट बिघडणे, मळमळ करणे, अपचन, पोटाची जळजळ, जुलाब, डोकेदुखी, उलट्या सारख्या तक्रारी वाढतात. फळांमधील कार्बाइडच्या अंशामुळे शरीरात इथिलीन नावाचा गॅस तयार होतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत चालला आहे.
फळांमधूनही विषबाधा होऊ शकते
नैसर्गिकरीत्या पिकलेले कोणतेही फळ आरोग्यासाठी गुणकारी असते. मात्र कार्बाइडच्या माध्यमातून पिकविलेल्या फळांत रसायनांच्या अंशामुळे विषबाधा होऊ शकते. रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी फळांचा आहार प्रत्येकानेच घेतला पाहिजे. पोटाच्या माध्यमातून आपल्याला ही शक्ती मिळत असते. मात्र रसायनयुक्त फळांमुळे ही शक्तीच कमी होत आहे.
आरोग्यावर परिणाम
आंब्याचा सिझन असताना अनेक वेळा बाजारात गेल्यानंतर प्रत्येकालाच विकत घेण्याची इच्छा होते. समोरचे फळ कशा रीतीने पिकविले आहे, हे सामान्यांना कसे कळणार. अशा रासायनिक फळांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढत आहे. प्रशासनाने त्याला आवर घालणे गरजेचे आहे.
असा ओळखा केमिकल लोचा
'स्टेरॉइड'चेइंजेक्शन दिलेल्या टरबुजाचे फळ लालबुंद असले तरी कापल्यानंतर आतील गरांत तंतूचे जाळे तयार झालेले असते. ते भरीव राहता तुटक-तुटक असते. यावरून इंजेक्शन दिलेले टरबूज ओळखले जाऊ शकते.
>मेणलावलेल्यासफरचंदांना चकाकी असते. सफरचंद नैसर्गिकपणे चकाकतच नाही. शिवाय सफरचंदाला "पिटोशिन' इंजेक्शएन दिलेले असेल तर त्या ठिकाणी बारीक डाक पडतो. काही व्यापारी तेथे "ओके, टेस्टेड, एक्स्पोर्ट क्वाॅलिटी' आदी नावांचे स्टीकर लावून तो डाग झाकतात. मात्र, हा डाग वाहतुकीमुळे अथवा फळे हाताळताना पडला की इंजेक्शनने, हे ओळखता येऊ शकते.
>इथेलिनच्यासाहाय्याने पिकवलेल्या द्राक्षांना दवाखान्यातील स्पिरिटसारखा वास येतो. खायला तीही गोड लागतात. मात्र, शरीरासाठी ते हानिकारक असतात.
नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी किमान आठ दिवस
नैसर्गिकरीत्याफळ पिकण्यासाठी ते १५ दिवस लागतात. पूर्वी खेड्यांमध्ये आंबा पिकवण्यासाठी स्वतंत्र खोली असायची. त्याला माजघर म्हटले जायचे. कच्चा आंबा अर्थात कैरी झाडल्यानंतर तो या माजघरात नैसर्गिकरीत्या पिकवला जायचा. आज आंबा कृत्रिमरित्या पिकवला जातोय.
शरीरासाठी घातक : "स्टेरॉइड’इंजेक्शन दिलेले टरबूज खाल्ले तर शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. तर कार्बाइडने पिकवलेली फळे खाल्ल्याने अनेकांना नाक, कान, घशात खवखव होणे, लिव्हर निकामी होणे, पोट छातीत जळजळ होणे असे आजार होतात. त्वचेच्या अल्सरशिवाय कर्करोगाची भीतीही असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सफरचंदांवर मेण केळीपण दूषित
काही वेळा सफरचंदांनासुद्धा हे इंजेक्शन दिले जाते. बाजारात अनेक ठिकाणी चकाकणारे सफरचंद दिसून येतात. त्यासाठी सर्रास "मेणा’चा वापर केला जातो.
केळी पिकवण्यासाठी अनेक ठिकाणी "इथिलीन’ हे रसायन वापरले जाते. त्यामुळे पिकवलेली केळी ही पिवळीधमक दिसते. पण, खायला फारशी गोड नसते.
गंभीर आजार जडू शकतात
रसायनांचाअंश फळांच्या माध्यमातून पोटात गेला तर पचनसंस्था बिघडू शकते. हॉर्मोन्समध्ये बदल होतात. ही रसायने पोटात साठून एखादा ट्युमरही होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांना फळे खायला देताना काळजी घेतली पाहिजे. फळांच्या अतिरिक्त सेवनाने लहान मुलांना अतिसार, उलट्या असे विकारही लवकर होतात. डॉ.सतीश झडपे, होमिओपॅथी तज्ज्ञ.
पपई, टरबुजाला "स्टेरॉइड’ इंजेक्शन
पपईसहटरबुजांचा आकार वाढवण्यासाठी "स्टेरॉइड' या इंजेक्शनचा वापर केला जातो. बाजारात सध्या समान आकारातील टरबूज विक्रीस आलेली दिसतात. एकाच आकारातील टरबूज बघून अनेकांना नवलसुद्धा वाटत असते. हे टरबूज चार ते आठ किलोपर्यंतसुद्धा असतात. सडपातळ माणसांचे शरीर मांसल बनवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात "स्टेरॉइड’ या इंजेक्शनचा वापर केला जातो. परंतु, याचा वापर टरबुजांचा आकार वाढवण्यासाठी सर्रास केला जात आहे; तसेच कुक्कुटपालन करणाऱ्या कोंबड्यांचे मास वाढवण्यासाठी 'स्टेरॉइड’ या इंजेक्शनचा वापर करतात..
धन्यवाद

0
Answer link
रासायनिक खतांचा (chemical fertilizers) आणि कीटकनाशकांचा (pesticides) वापर करून पिकवलेली फळे आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम:
फळे आणि परिणाम:
- आंबा: लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा (calcium carbide) वापर केला जातो. यामुळे पोटाच्या समस्या, त्वचेवर ऍलर्जी (allergy) आणि मज्जासंस्थेवर (nervous system) परिणाम होऊ शकतो.
- केळी: इथेनॉलचा (ethanol) वापर केला जातो, ज्यामुळे फुफ्फुसांवर (lungs) आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.
- सफरचंद: फळे ताजी दिसावी म्हणून मेणाचा (wax) थर लावला जातो. यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
- द्राक्षे: वाढ जलद होण्यासाठी जिबरेलिक ऍसिडचा (gibberellic acid) वापर करतात, ज्यामुळे हार्मोनल (hormonal) असंतुलन होऊ शकते.
- टरबूज: लाल रंग येण्यासाठी इंजेक्शन (injection) दिले जाते, ज्यामुळे किडनी (kidney) आणि लिव्हरचे (liver) आजार होऊ शकतात.
शरीरावर होणारे दुष्परिणाम:
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
- हार्मोनल असंतुलन.
- पचनाच्या समस्या.
- त्वचेवर ऍलर्जी.
- कर्करोगाचा धोका वाढणे.
- neurological समस्या
बचावासाठी उपाय:
- सेंद्रिय (organic) फळांना प्राधान्य द्या.
- फळे खाण्यापूर्वी व्यवस्थित धुवा.
- शक्य असल्यास फळांची साल काढून खा.
टीप: कोणती फळे रासायनिक पद्धतीने पिकवली आहेत हे ओळखणे कठीण आहे, त्यामुळे शक्यतो सेंद्रिय फळे खाण्याचा प्रयत्न करा.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या: Healthline, WebMD