पर्यावरण प्रदूषण उपाय

प्रदूषण टाळण्याचे उपाय कोणते?

2 उत्तरे
2 answers

प्रदूषण टाळण्याचे उपाय कोणते?

8
👏नमस्कार मी आपणास जल आणि वायू प्रदूषण याविषयी सांगतो...
१)💦जल 💦 प्रदूषण:-
उपाय :- 
ङ्घ पाणी परीक्षण करून वापरणे, तुरटी पोटॅशियम परमॅग्नेट, ब्लिचिंग पावडरचा सातत्याने वापर करणे. 
ङ्घ पाणी साठे (विहिरी,आड) यांना संरक्षण कुंपण करून झाकून ठेवणे. 
ङ्घ प्रदूषके सोडणाऱ्या उद्योगांनी प्रक्रिया संयंत्रे उभारावीत. 
ङ्घ शेतीसाठी सेंद्रिय व जैविक खतांचा जास्त प्रमाणात वापर करणे. 
ङ्घ पाणी उकळणे, कोळसा व कपड्यातून गाळून घेणे, जलाशयांत मिसळणारे प्रदूषित पाणी प्रक्रिया करून पुनर्वावर करणे. 
ङ्घ क्षारांचे प्रमाण ५०० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करावा. 
ङ्घ चुंबकिय प्रणालीचा वापर करून क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा. 
ङ्घ १००० लीटर पाणी निर्जंतूक करण्यासाठी शेवगा वाळलेल्या बियांची ८०० ग्रॅम भुकटी वापरुन २ तासांत पाणी निर्जंतूक करता येते. 

याशिवाय मेंदू ज्वर, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ त्वचा रोग, अस्थिव्यंग, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी सेवनाने जाणवतात. सध्या ग्रामीण भागात सांधे व गुडघेदुखीसारखे प्रकार व कॅन्सरसारखे भयानक आजार जडू लागले आहेत. मुख्यत्वेकरून आर्सेनिक या पाण्यातील विषारी घटकामुळे हा आजार जाणवत आहे. तसेच पाणी प्रदूषित झाल्यामुळे आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाण्याचे सेवन आपण करत नाही हे कारण पोटदुखी, मुतखडा यासारख्या आजारांना आयतेच निमंत्रण आहे.

😎२)वायू प्रदूषण:-
वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे प्रदूषण. मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जबाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.

प्रदूषक घटके-

नैसर्गिक हवेतील जे पदार्थ अथवा घटक मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.


सल्फर डायॉक्साईड (SO2)जेव्हा कोळसा किंवा रॉकेल जळते तेव्हा त्यांमध्ये असणार्‍या गंधकाचे-सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होतो. सल्फर डायॉक्साईड पाण्यात लवकर विरून जातो. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्या काळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फ्यूरिक अम्ल तयार होते व यालाच अम्लधर्मी पाऊस म्हणतात. अम्लधर्मी पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन अम्लयुक्त होते व हळूहळू नापीक बनते. असल्या पावसाने त्यातल्या गंधकाची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सफ्लर डायॉक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुफ्फुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते. 

सल्फर डायॉक्साईड हा कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होत असल्याने त्याचे प्रमाण वीटभट्या, वीज निर्मिती प्रकल्पांजवळ जास्त असते. परंतु वार्‍याबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने. अतिदूरवरही सल्फर डायॉक्साईडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. सल्फर डायॉक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी वस्तींमध्ये रॉकेलचा कमी वापर, वीजनिर्मिती प्रकल्पात गंधकरहित कोळसा वापरणे व धूर हवेत सोडण्यापूर्वी सल्फर स्क्रबर मधून त्याचे शुद्धीकरण करणे इत्यादी उपाय आहेत. जर हे उपाय अमलात आणले तर सल्फर डायॉक्साईड व अम्लधर्मी पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. गाड्यांमधून निघणार्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायॉक्साईड असतो.

नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड (NO and NO2) अतिउच्च तापमानावर (१००० अंश सेल्शियस अथवा त्यापेक्षा जास्ती) जेव्हा ज्वलन होते त्यावेळेस हवेतील नायट्रोजनचेही ज्वलन होऊन त्याचे नायट्रोजन ऑक्साईड व नंतर डायॉक्साईड बनते. मुख्यत्वे दुचाकी-चारचाकींच्या इंजिनमध्ये तापमान १००० पेक्षाही जास्त असते त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होऊन वाहनांच्या धुराड्यांमार्फत वायुप्रदूषण होते. नायट्रोजन डायॉक्साईड सुद्धा सल्फर डायॉक्साईड प्रमाणे श्वसननलिकेत प्रवेश करतो परंतु याची पाण्यात विरण्याची क्षमता कमी असते व तो बराचसा फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. यामुळे जास्तीत जास्त कफनिर्मिती होऊन सर्दी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडतात. वाहतुकीच्या वर्दळीमध्ये नायट्रोजन डायॉक्साईडमुळेच सर्दी वाढण्याचे प्रकार घडतात. दीर्घकालानंतर सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहेमीचे आजार बनून जातात. 

नायट्रोजन डायॉक्साईड कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असणे गरजेचे आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नायट्रोजन डायॉक्साईडचे पुन्हा ऑक्सिजन व नायट्रोजनमध्ये रूपांतर करतो. यासाठी ज्यात कन्व्हर्टर नाहीत अशा जुन्या गाड्या निकालात काढणे गरजेचे आहे. सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानावर ज्वलन करून नायट्रोजन डायॉक्साईडचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर काम करत आहेत.

ओझोन (O3)-ओझोन शरीरास चांगला असतो हा एक चुकीचा समज आहे. ओझोनमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असतात यातील तिसरा अतिशय आक्रमक असतो व मिळेल त्या गोष्टीचे ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्‍न सातत्याने करत असतो. ओझोनची खरी गरज वातावरणातील वरच्या भागात आहे. तिथला ओझोन सूर्यापासून येणार्‍या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण करतो. परंतु आपल्या नजीकच्या वातावरणातील ओझोन एक आक्रमक रसायनाचे काम करत असतो. ओझोन श्वसन नलिकेत कफामध्ये अजिबात न विरघळता सरळ फुफ्फुसांपर्यंत जाऊन पोहोचतो व फुफ्फुसांतील पेशींवर अतिशय संहारक पद्धतीने हल्ला चढवतो यामुळे जेव्हा हवेत ओझोनचे प्रमाण जास्त असते तेव्हा छातीत कळ येण्यासारखे प्रकार घडतात. ओझोनच्या सातत्याच्या मार्‍यामुळे कालांतराने फुफ्फुसे दुर्बल होऊन दम्यासारखे रोग वाढीस लागतात. या अगोदर नमूद केलेल्या नायट्रोजन ऑक्साईडची ऑक्सिजनशी रासायनिक क्रिया होऊन ओझोन तयार होतो, तसेच ओझोनचेही नायट्रोजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनते. दिवसभर हवेत ओझोन व नायट्रोजन ऑक्साईडचा कमी जास्त होण्याचा खेळ चाललेला असतो.

जर नायट्रोजन ऑक्साईड व व्हीओसींचे प्रमाण कमी राहिले तर ओझोनचे प्रमाण मर्यादित रहाण्यास मदत होते. ओझोनमुळे केवळ मानवी शरीरावरच नव्हे तर रबर, प्लॅस्टिक, कपडे यांच्यावरही परिणाम होतो. ओझोनच्या संपर्कात येऊन रबराची लवचीकता कमी होते. कपड्यांचे रंग उडतात, इत्यादी दुय्यम परिणाम आहेत.

व्होलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड (VOC)- विविध रसायने व रासायनिक उत्पादने यांच्या वापराने या उत्पादनांचे बाष्पीकरण होते व व्हीओसी. तयार होतात. यातील काही घटक हे मानवी आरोग्यास सरळपणे घातक असतात तर काही सुरक्षितपण असतात. बहुतांशी व्हीओसींचे सूर्यप्रकाशात ओझोनमध्ये रूपांतर होऊन जाते व ओझोन अंततः घातक प्रदूषक घटकाचे काम करतो. पेट्रोलपंपावरील गाडी भरताना उडणारे पेट्रोल, घराला रंग देताना थिनर व ऑईलपेंटचा वापर इत्यादी गोष्टी वातावरणातील व्हीओसी वाढवतात. 

वातावरणातील व्हीओसी कमी करण्यासाठी उघड्यावरील रसायनांचा वापर टाळणे, इमारतींसाठी व घरांमध्ये पाण्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे.कार्बन मोनॉक्साईड(CO) - आरोग्यास अत्यंत घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनाने तयार होतो. वीटभट्या, छोटे छोटे तसेच मध्यम व मोठे वीजनिर्मितीसंच, वाहनांचीया इंजिने यांमधून हा बाहेर पडतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. त्यामुळे हा वायु अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. हे अतिटोकाच्या परिस्थितीत होऊ शकते, परंतु कमी संपर्कात किंवा हवेतील कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, विचारक्षमता अथवा कार्यक्षमता कमी होणे असे प्रकार घडतात.

कमी तापमानावरील (७०० अंश से किंवा त्यापेक्षा कमी) ज्वलन, तसेच ज्वलनासाठी पुरेशा ऑक्सिजनची कमतरता हे कार्बन मोनॉक्साईड तयार होण्याची कारणे आहेत.

धुळीचे प्रदुषण

ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे अतिशय लहान धूलिकण व श्वसनातून शरीरात न जाणारे. १० मायक्रोमीटर (PM10)पेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण केवळ रहदारीमुळेच होते असे मानणे चुकीचे आहे. धूलिकण मानव निर्मित तसेच निसर्ग निर्मितही असू शकतात. मानव निर्मित धूलिकण हे ज्वलन व तत्सम प्रक्रियांतून निर्माण होतात. तसेच कुठेही चालणारी बांधकामे, विविध प्रकारचे कारखाने, शेतीतील विविध प्रकारची कामे हे मानव निर्मित धूलिकणांचे स्रोत आहेत. निसर्गही हवेतील धूलिकण कमी अथवा जास्त करण्यात मोठा हातभार लावत असतो. फुलांच्या बहार येणार्‍या मोसमात काही ठिकाणी हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढते. तसेच कोरड्या प्रांतातून वार्‍याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ येऊ शकते. आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून येणारी धूळ स्पेन, इटली, ग्रीस, स्वित्झर्लंड, सायप्रस इत्यादी देशांत मोठ्या प्रमाणात येऊन तेथील हवेत धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवते [३].

अतिसूक्ष्म धूलिकण २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकारमानाचे (PM2.5) : हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत साठून राहतात. हे सूक्ष्म कण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करतात. वाहनांतून बाहेर पडणार्‍या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म (नॅनो आकारात) काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन अतिसूक्ष्म कण बनतात व वातावरणातील प्रदूषण वाढवतात. दोन स्ट्रोकवाल्या वाहनांमुळे, तसेच डिझेलवर चालणार्‍या वाहनांमुळे, शहरांमध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील शहरांमध्ये प्रामुख्याने अतिसूक्ष्म कणांचा प्रादुर्भाव जास्ती आहे.
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 35170
0

प्रदूषण टाळण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो, त्यापैकी काही महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. वैयक्तिक पातळीवर उपाय:
  • ऊर्जा वापर कमी करा: घरातील लाईट आणि उपकरणे गरजेनुसारच वापरा.
  • पुनर्वापर आणि पुनर्वापर (Reduce, Reuse, Recycle): वस्तूंचा पुनर्वापर करा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
  • सार्वजनिक वाहतूक: सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर करा, ज्यामुळे वायू प्रदूषण कमी होईल.
  • इंधनाचा कार्यक्षम वापर: आपल्या वाहनांची नियमित तपासणी करा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी चांगले इंधन वापरा.
2. औद्योगिक पातळीवर उपाय:
  • प्रदूषण नियंत्रण उपकरणे: कारखान्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण उपकरणे (Air and water pollution control devices) बसवणे आवश्यक आहे.
  • स्वच्छ ऊर्जा: सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे.
  • कचरा व्यवस्थापन: कारखान्यातील कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे.
3. सरकारी पातळीवर उपाय:
  • कडक नियम आणि अंमलबजावणी: प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने कडक नियम बनवणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • प्रोत्साहन: प्रदूषण कमी करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे.
  • जागरूकता: प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती करणे.
4. शेती संबंधित उपाय:
  • रासायनिक खतांचा कमी वापर: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक खतांचा वापर करणे.
  • जैव कीटकनाशके: रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर करणे.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने आपण प्रदूषण कमी करू शकतो आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5060

Related Questions

मुलगी पचवण्यासाठी काय करावे?
वस्तूंना जपावे आणि त्यांची काळजी घ्यावी?
गण्डयोग निवारण करण्यासाठी काय उपाय करावा?
आज सकाळी कोलगेट संपला यावर काय उत्तर आहे?
लिंबू सोडा पित्तामध्ये का घेतात?
दृष्ट कशी काढावी?
एखाद्याला रात्री झोपताना रामरक्षास्तोत्र, घोरकष्टोधरण स्तोत्र, मारुती स्तोत्र वगैरे म्हणूनही झोपेत स्वप्न पडून झोपेत व्यत्यय येत असेल, तर स्वप्न न पडण्यासाठी त्याने काय उपाय करावा?