उपाय आरोग्य

लिंबू सोडा पित्तामध्ये का घेतात?

2 उत्तरे
2 answers

लिंबू सोडा पित्तामध्ये का घेतात?

3

लिंबू सोडा पित्ता मध्ये घेऊ नये त्यामुळे पित्त वाढते दाहसुद्धा होतो यामुळे लिंबू सोडा घेतल्याने शरीरात आम्लनिर्मिती होते.पित्त निर्माण होते .पित्तासाठी लिंबूपाणी चालू शकते.









पाणी आणि द्रवपदार्थ- आपल्या शरीरातील पाणी आणि  पातळी सुयोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आदी द्रवपदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करणं महत्त्वाचं आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं मूत्रविसर्जनाचं प्रमाण वाढतं. तसंच यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या घटकांमुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते, यामुळेच तुम्ही शहाळ्याचं पाणी नियमितपणे घेतलं पाहिजे.

थंड दूध- तुमच्या आहारातील थंड दुधाच्या समावेशाने, पोटातील अतिरिक्त आम्लं शोषलं जातं. थंड दुधात एक चमचा सब्जा पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरतं.


दही आणि ताक- उन्हाळा सुसह्य व्हावा, म्हणून प्रामुख्यानं हे पदार्थ सुचवले जातातच, या दोन्ही घटकांमध्ये प्रोबायोटिक्स उत्तम प्रमाणात असल्याचं सर्वज्ञात आहे. आपल्या पोटाचं संरक्षण आणि एकूणात पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते आणि आपलं स्वास्थ चांगलं राहातं.

फळं- फळं नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंट आहेतच, शिवाय भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे ती ऊर्जा निर्मितीही करतात. पाण्याचा समावेश, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त फळे सर्वोत्तम ठरतात आणि खास करून उन्हाळ्यात त्यांचा चांगलाच फायदा होतो. यामुळे फळांचा रस घेण्यापेक्षा उत्तम रसाळ फळ खावं, असा सल्ला आम्ही नेहमीच देतो. आवळा, पेरु, संत्र आणि लिंबू यासारखी फळं 'क' जीवनसत्त्वयुक्त आहेत. थोडीशी आंबट असल्याकारणानं अनेकांना या फळांमुळे पित्त वाढेल अशी भीती वाटते, परंतु 'क' जीवनसत्त्वयुक्त असलेली ही फळं पित्तासाठी परिणामकारक ठरतात. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आंब्यासारख्या उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळातही 'क' जीवनसत्त्वानं परिपूर्ण आहे. ताडगोळा, जाम, खरबूज, कलिंगड ही फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. या फळांमुळे शरीरात पाण्याची पातळी राखली जाते. केळं हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरलं जातं, उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळं हे पित्तमारक ठरतं. मोसमी फळं तसंच विविध रंगांची फळं खावीत, असं आम्ही सुचवतो. यामुळे नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते.


भाज्या- दुधी, पडवळ, भोपळा, कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजांच्या अंशामुळे फायदेशीर ठरतात. शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खासकरून उपयुक्त ठरते. सिमला मिरचीमुळेही नैसर्गिक स्तरावर पोटातील आम्लावर परिणाम होतो. उन्हाळ्यात खासकरून वैविध्यपूर्ण सलाड आणि भाज्यांचे गार सूप अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.

गूळ- गुळात मॅग्नेशियम अतिशय चांगल्या प्रमाणत असतं, यामुळे गूळ या मोसमासाठी चांगला असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच, आपल्या शरीराचं तापमान राखण्यासही हा पदार्थ कारणीभूत ठरतो. गुळाचं पाणी तुमच्या पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणांवर अतिशय परिणामकारक ठरतं.


चिमूटभर मीठ घातलेलं, तुळशीची पानं असलेलं लिंबूपाणी घोट-घोट घेत राहणं, ताजा ऊस खाणं यामुळेही शरीरातील वाढलेलं तापमान कमी होतं आणि हे सर्व घटक नैसर्गिक आहेत. चहा, कॉफी, मद्य, सोडा इत्यादींच्या अतिरिक्त सेवनामुळे पित्त वाढतं आणि दाहसुद्धा होतो. लाल आणि हिरवी मिरची, मिरी यासारखे मसाले, पुदीना आणि चॉकलेट यामुळेही शरीरात आम्लनिर्मिती होते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, अशांनी या सर्व पदार्थांचं सेवन टाळलेलंच बरं. परंतु आपण आले, लसूण, हळद, जिरे, वेलची यांचा आपल्या आहारात मात्र आवर्जून समावेश करायला हवा. तेलकट पदार्थही केवळ उन्हाळ्यातच नाहीत, तर नेहमीच मोजूनमापून खायला हवेत, कारण तेलकट आणि मेदजन्य पदार्थांमुळे पचन लवकर होत नाही, यामुळे पित्त वाढीस लागतं.

उन्हाळ्यात पित्त आणि दाह याचा त्रास बहुतेकांना होत असतो, ते कमी करण्यासाठी योग्य आहार असणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत काळजी घेणं आणि आहारविषयी जागरुक असणं, सुयोग्य आहाराचं नियोजन करणं यामुळे आरोग्य चांगलं राहील.

    

उत्तर लिहिले · 14/3/2022
कर्म · 121765
0
पित्तामध्ये लिंबू सोडा घेण्याचे काही कारण खालीलप्रमाणे आहेत:
  • पचन सुधारण्यास मदत: लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड (Citric acid) पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. सोडा प्यायल्याने अन्न लवकर पचायला मदत होते आणि पित्ताशयावरचा ताण कमी होतो.
  • acidity कमी करणे: लिंबू हे जरी ऍसिडिक असले तरी ते शरीरात अल्कधर्मी (alkaline) प्रभाव निर्माण करते. त्यामुळे पित्तामुळे होणारी ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.
  • Vitamin C: लिंबामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • Hydration: सोडा प्यायल्याने शरीराला आवश्यक असणारे पाणी मिळते आणि डिहायड्रेशन (dehydration) टाळता येते.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. लिंबू सोडा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

मुलगी पचवण्यासाठी काय करावे?
वस्तूंना जपावे आणि त्यांची काळजी घ्यावी?
गण्डयोग निवारण करण्यासाठी काय उपाय करावा?
आज सकाळी कोलगेट संपला यावर काय उत्तर आहे?
दृष्ट कशी काढावी?
एखाद्याला रात्री झोपताना रामरक्षास्तोत्र, घोरकष्टोधरण स्तोत्र, मारुती स्तोत्र वगैरे म्हणूनही झोपेत स्वप्न पडून झोपेत व्यत्यय येत असेल, तर स्वप्न न पडण्यासाठी त्याने काय उपाय करावा?
चिचुंदरी घरात फिरत असेल तर?