Topic icon

उपाय

0
जनरल इज द फॉलोइंग ट्रांजेक्शन इन द
उत्तर लिहिले · 13/8/2024
कर्म · 0
1
वस्तूंना जिवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावेत. (एखादया लहान गोजिरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे.) कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते.

(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण-

- वस्तुंना प्राण नसेल, पण म्हणून त्याना जिव नसल्यासारखे वागवू नये. त्या आपल्या नेहमी सेवा करता. पूर्ण आपल्या नियंत्रणात असता. वस्तूंना घाणेरडे हात लावू नये त्यांची जीवापाड काळजी घ्यावी. त्यांचे लहान मुलासारखे लाड करावेत कारण याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, प्रेम निरंतर ठेवतील.
उदाहरणार्थ, आपण वस्तूंना स्वच्छ ठेवू शकतो, त्यांना योग्यरित्या वापरू शकतो आणि त्यांना योग्य ठिकाणी ठेवू शकतो.

वस्तूंना जपणे आणि त्यांची लाड करणे हे एक चांगले काम आहे. हे आपल्याला पैसे वाचवते, पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करते आणि आपल्या जीवनात आनंद आणते.
(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण

- जसा माणूस मरतो तसे वस्तुनाही मर्यादित आयुष्य असते. वस्तूंचे आयुष्य संपले की त्यांना आपण त्याना जागेवरून हलवतो. फक्त त्यांना कृतज्ञता दाखवून निरोय द्यावा.



उत्तर लिहिले · 8/8/2023
कर्म · 53715
0

गण्डयोग निवारणासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. गण्डयोग शांती पूजा: गण्डयोग निवारणासाठी शांती पूजा करणे हा एक प्रभावी उपाय आहे. ही पूजा एखाद्या अनुभवी पंडितांकडून योग्य पद्धतीने करून घ्यावी.

  2. महामृत्युंजय मंत्र जाप: महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने गण्डयोगामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात.

    मंत्र: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

  3. दानधर्म: गरजूंना दानधर्म करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे यांसारख्या कार्यांमुळे गण्डयोगाचा प्रभाव कमी होतो.

  4. शिव उपासना: भगवान शंकराची नियमित पूजा आणि अभिषेक केल्याने गण्डयोगामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात.

  5. हनुमान चालीसा: हनुमान चालीसाचे नियमित पठण करणे देखील फायदेशीर ठरते.

  6. योग्य ज्योतिष सल्ला: आपल्या जन्मपत्रिकेनुसार एखाद्या योग्य ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यांनी सांगितलेले उपाय करणे.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला अधिक माहितीची आवश्यकता आहे. 'आज सकाळी कोलगेट संपला' यावर तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित आहे?

उदाहरणार्थ, काही पर्याय:

  • तुम्ही पर्याय विचारत आहात का? (उदा. "आता मी काय करू?")
  • तुम्ही याबद्दल काहीतरी विचारत आहात का? (उदा. "हे का घडले?")
  • तुम्ही फक्त माहिती देत आहात का?

कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकेन.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
3

लिंबू सोडा पित्ता मध्ये घेऊ नये त्यामुळे पित्त वाढते दाहसुद्धा होतो यामुळे लिंबू सोडा घेतल्याने शरीरात आम्लनिर्मिती होते.पित्त निर्माण होते .पित्तासाठी लिंबूपाणी चालू शकते.









पाणी आणि द्रवपदार्थ- आपल्या शरीरातील पाणी आणि  पातळी सुयोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आदी द्रवपदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करणं महत्त्वाचं आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं मूत्रविसर्जनाचं प्रमाण वाढतं. तसंच यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या घटकांमुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते, यामुळेच तुम्ही शहाळ्याचं पाणी नियमितपणे घेतलं पाहिजे.

थंड दूध- तुमच्या आहारातील थंड दुधाच्या समावेशाने, पोटातील अतिरिक्त आम्लं शोषलं जातं. थंड दुधात एक चमचा सब्जा पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरतं.


दही आणि ताक- उन्हाळा सुसह्य व्हावा, म्हणून प्रामुख्यानं हे पदार्थ सुचवले जातातच, या दोन्ही घटकांमध्ये प्रोबायोटिक्स उत्तम प्रमाणात असल्याचं सर्वज्ञात आहे. आपल्या पोटाचं संरक्षण आणि एकूणात पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते आणि आपलं स्वास्थ चांगलं राहातं.

फळं- फळं नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंट आहेतच, शिवाय भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे ती ऊर्जा निर्मितीही करतात. पाण्याचा समावेश, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त फळे सर्वोत्तम ठरतात आणि खास करून उन्हाळ्यात त्यांचा चांगलाच फायदा होतो. यामुळे फळांचा रस घेण्यापेक्षा उत्तम रसाळ फळ खावं, असा सल्ला आम्ही नेहमीच देतो. आवळा, पेरु, संत्र आणि लिंबू यासारखी फळं 'क' जीवनसत्त्वयुक्त आहेत. थोडीशी आंबट असल्याकारणानं अनेकांना या फळांमुळे पित्त वाढेल अशी भीती वाटते, परंतु 'क' जीवनसत्त्वयुक्त असलेली ही फळं पित्तासाठी परिणामकारक ठरतात. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आंब्यासारख्या उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळातही 'क' जीवनसत्त्वानं परिपूर्ण आहे. ताडगोळा, जाम, खरबूज, कलिंगड ही फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. या फळांमुळे शरीरात पाण्याची पातळी राखली जाते. केळं हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरलं जातं, उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळं हे पित्तमारक ठरतं. मोसमी फळं तसंच विविध रंगांची फळं खावीत, असं आम्ही सुचवतो. यामुळे नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते.


भाज्या- दुधी, पडवळ, भोपळा, कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजांच्या अंशामुळे फायदेशीर ठरतात. शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खासकरून उपयुक्त ठरते. सिमला मिरचीमुळेही नैसर्गिक स्तरावर पोटातील आम्लावर परिणाम होतो. उन्हाळ्यात खासकरून वैविध्यपूर्ण सलाड आणि भाज्यांचे गार सूप अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.

गूळ- गुळात मॅग्नेशियम अतिशय चांगल्या प्रमाणत असतं, यामुळे गूळ या मोसमासाठी चांगला असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच, आपल्या शरीराचं तापमान राखण्यासही हा पदार्थ कारणीभूत ठरतो. गुळाचं पाणी तुमच्या पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणांवर अतिशय परिणामकारक ठरतं.


चिमूटभर मीठ घातलेलं, तुळशीची पानं असलेलं लिंबूपाणी घोट-घोट घेत राहणं, ताजा ऊस खाणं यामुळेही शरीरातील वाढलेलं तापमान कमी होतं आणि हे सर्व घटक नैसर्गिक आहेत. चहा, कॉफी, मद्य, सोडा इत्यादींच्या अतिरिक्त सेवनामुळे पित्त वाढतं आणि दाहसुद्धा होतो. लाल आणि हिरवी मिरची, मिरी यासारखे मसाले, पुदीना आणि चॉकलेट यामुळेही शरीरात आम्लनिर्मिती होते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, अशांनी या सर्व पदार्थांचं सेवन टाळलेलंच बरं. परंतु आपण आले, लसूण, हळद, जिरे, वेलची यांचा आपल्या आहारात मात्र आवर्जून समावेश करायला हवा. तेलकट पदार्थही केवळ उन्हाळ्यातच नाहीत, तर नेहमीच मोजूनमापून खायला हवेत, कारण तेलकट आणि मेदजन्य पदार्थांमुळे पचन लवकर होत नाही, यामुळे पित्त वाढीस लागतं.

उन्हाळ्यात पित्त आणि दाह याचा त्रास बहुतेकांना होत असतो, ते कमी करण्यासाठी योग्य आहार असणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत काळजी घेणं आणि आहारविषयी जागरुक असणं, सुयोग्य आहाराचं नियोजन करणं यामुळे आरोग्य चांगलं राहील.

    

उत्तर लिहिले · 14/3/2022
कर्म · 121765
1
      मुलाची दृष्ट कशी काढावी याची माहिती या नवीन मातांना नाही. आपल्याकडे लहान मुलांना होणार्‍या “नजर लागणे” किंवा “दृष्ट लागणे” या गोष्टीसाठी पूर्वजांनी अत्यंत सोपी उपाययोजना सांगितली आहे. त्याचा अनुभव आपल्या सर्वांनी घेतलेला आहे.

पूर्वी घरात आजीबाई मुलीला, सुनेला नातवंडांची दृष्ट काढायला शिकवायच्या. आजी हे एक अजब व्यक्तिमत्व होतं. तिच्याकडे एक बटवा असे. ज्याला “आजीबाईचा बटवा” म्हणत. त्यात ज्येष्टीमध, वेखंड, सुंठीपासून अनेक औषधं असतं. लहानसहान गोष्टींसाठी प्राथमिक उपचार आजीबाई करत. आजीबाईंची ती पिढी आता वैकुंठात पोहोचलेय. आत्ताच्या आज्यांना नातवंडांपेक्षा टिव्ही सिरियलमध्ये जास्त रस. असो.

दृष्ट लागणे म्हणजे नेमके काय? तर आपल्याकडे असे मानले जाते की, लहान मुलांवर आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा लगेच परिणाम होतो. आजूबाजूला वावरणार्‍याला प्रत्येक माणसाची वृत्ती चांगली असते असे नव्हे. काही व्यक्तींना त्या मुलाच्या घराण्याबद्दल असूया असते, काहींना त्या मुलाच्या आई-वडिलांबद्दल असूया असते. ही अनेक कारणांमुळे असू शकते. जेव्हा हे मूल त्या व्यक्तीच्या संपर्कात येतं, तेव्हा त्या मुलाला पाहताच, ही असूया, द्वेष त्या व्यक्तीच्या मनात उफाळून येतो आणि त्या मुलाकडे विषतुल्य दृष्टीने बघितले जाते, ज्याचा परिणाम त्या मुलावर होतो. याला दृष्ट लागणे असे म्हणतात.

काही वेळा घरात काही वास्तुदोष असतील, तर त्याचा परिणाम त्या मुलावर होतो. त्या घरात पूर्वी कुणाची हत्या झाली असेल, किंवा पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत एखाद्या निपुत्रिक विधवेला इस्टेटीसाठी छळ करून हाकलून दिलेले असेल, तर अशा व्यक्तींचे शाप त्या घराला असतात. अशा घरातल्या मुलांना कुठलेही आरोग्याचे वा अन्य कारण नसतांनाही, ती लहान मुले रात्री अस्वस्थ होऊन रडायला लागतात. हा प्रकार शनिवार, अमावास्या, अष्टमी या दिवशी जास्त होतो.

तसेच मुलाला जन्मत: राहु, शनी, केतु यापैकी ग्रहांची महादशा असेल किंवा शनिची साडेसाती असेल तरीसुद्धा अशा दशांमध्ये वा साडेसातीत त्याच्यावर असल्या लोकांच्या नजरेचा लगेच परिणाम होतो. मूल वेगळं वागायला लागतं, रात्री अपरात्री झोपेतून उठून रडायला लागतं, दिवसभर छान खेळणारी मुलं दिवेलागणीच्या वेळेस रडायला लागतात, काही मुलांना अनामिक भीती वाटायला लागते. काही विशिष्ठ व्यक्ती समोर आल्या की मुले रडायला लागतात, घाबरतात.

अशा वेळेस सर्वप्रथम पेडिएट्रिशिअनकडे मुलाला घेऊन जावं आणि त्याची तपासणी करावी. काही वेळा जंत झाल्यामुळे मूल रडतं असतं, त्याच्या पोटात दुखत असतं पण त्याला नीट सांगता येत नाही. काही वेळा इतर काही शारीरिक त्रास असतील, कॉन्स्टिपेशन असेल तरीसुद्धा मूल रडतं. त्यामुळे सर्वप्रथम शारीरिक पातळीवर त्याला काही त्रास नाही हे बघणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकवेळा शारीरिक त्रास काही नसतो. डॉक्टर तपासतात. सीबीसी, इएसआर करायला सांगतात, कधी एसजीओटी, एसजीपीटी करून लिव्हरचा त्रास नाही ना हे पहिले जाते. पण सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या तरी मूल रात्री रडायचं थांबत नाही.

अशा वेळेस त्या मुलाची दृष्ट जरूर काढावी. तसेच मुलाला काहीही होत नसेल तरीही त्याची दृष्ट काढावी. ती कशी हे सांगतो.

जन्मल्यापासून सहा महिन्यांपर्यंत रोज संध्याकाळी दिवेलागणीला फूल आणि पाणी यांनी दृष्ट काढावी. उजव्या हातात एक फूल आणि डाव्या हातात अर्धे भरलेले पाण्याचे भांडे सात वेळा मुलाच्या समोरून उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यावे व सात फेरे पूर्ण करावेत. ते करत असतांना खालील मंत्र म्हणावा;-

“दृष्ट मिष्ट, आल्यागेल्याची, नात्या-गोत्याची, भूताखेताची, पापी चांडाळाची, वेताळ-काताळाची, काळ्या माणसाची, गोर्‍या माणसाची, स्त्री पुरूषाची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची… दृष्ट दूर होवो..

असे म्हणून ते फूल आणि भांड्यातले पाणी घराबाहेर नेऊन टाकून द्यावे. आणि खालील मंत्र बाळाला मांडीवर घेऊन म्हणावा.

वासुदेवो जगन्नाथ पूतना तर्जनो हरि:
रक्षतु त्वरितोबालं मुंच मुंच कुमारकम्‌

सहा महिने पूर्ण झाल्यावर दर शनिवारी आणि अष्टमी, पौर्णिमा व अमावास्येला मीठ मोहरीने दृष्ट काढावी. त्यासाठी मंत्र वरीलप्रमाणेच आहे. फक्त दोन्ही हातात मीठ मोहरी घेऊन सात वेळा मुलावरून उतरवून जमीनीवर बोटे मोडावीत.

तसेच दृष्ट काढण्यापूर्वी साधारण पाच मिनिटे लोखंडाची डाव जी फोडणीसाठी वापरतात, ती गॅसवर गरम करत ठेवावी. दृष्ट काढेपर्यंत ती पूर्ण तापेल या हिशोबाने. दृष्ट काढल्यावर मीठ मोहरी त्या तापलेल्या लोखंडाच्या डावेत टाकावी. ते टाकल्यावर गॅसजवळ उभे राहू नये. मोहोरी तडतडते. डोळ्यात जायची शक्यता असते. त्यामुळे ते टाकून लगेच गॅस पासून दूर व्हावे. पाच मिनिटांनी ते जळल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्याचा अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा.
उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 121765
0
स्वप्न येणे ही एक স্বাভাবিক गोष्ट आहे. स्वप्ने आपल्या মানসিক आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असतात. पण काही वेळा स्वप्नांमुळे झोपमोड होते किंवा भीतीदायक स्वप्ने येतात, ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत स्वप्ने येऊ नयेत किंवा चांगली स्वप्ने यावी यासाठी काही उपाय करता येतात:

1. झोपण्यापूर्वीचे उपाय:

  • ध्यान (Meditation): झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात.

  • प्रार्थना: रामरक्षास्तोत्र, घोरकष्टोधरण स्तोत्र, मारुती स्तोत्र यांसारखी स्तोत्रे वाचून झाल्यावर, चांगली स्वप्ने येण्यासाठी आणि वाईट स्वप्ने येऊ नयेत यासाठी देवाला प्रार्थना करा.

  • पुस्तक वाचन: झोपण्यापूर्वी प्रेरणादायी पुस्तके वाचा. यामुळे सकारात्मक विचार मनात राहतात.

  • स्क्रीन टाइम कमी करा: झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांचा वापर टाळा.

  • हलका आहार: रात्री झोपण्यापूर्वी जड आणि मसालेदार जेवण टाळा. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि झोप शांत लागते.

2. झोपण्याची पद्धत:

  • ठराविक वेळी झोपणे: दररोज रात्री ठराविक वेळी झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावा. यामुळे शरीराची जैविकClock (Biological clock) व्यवस्थित राहते.

  • शांत वातावरण: झोपण्याची जागा शांत आणि आरामदायक असावी. खोलीत अंधार असावा आणि तापमान योग्य असावे.

3. मानसिक उपाय:

  • सकारात्मक विचार: दिवसभर सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक गोष्टी टाळा.

  • तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम, किंवा आवडते छंद जोपासा.

  • मानसोपचार: जर स्वप्नांमुळे खूप त्रास होत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

4. इतर उपाय:

  • पाण्याचे सेवन: रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळा, ज्यामुळे रात्री वारंवार लघवीला जावे लागत नाही.

  • औषधे: जर तुम्ही काही औषधे घेत असाल, तर डॉक्टरांना विचारून घ्या की त्या औषधांमुळे स्वप्नांवर परिणाम होतो आहे का.

हे उपाय केल्याने तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल आणि स्वप्नांमुळे होणारा त्रास कमी होईल.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980