आयुष्य स्वमदत नैतिकता मानसशास्त्र अपयश

जीवनात अपयशाची कारणे सविस्तर कोणती आहेत, आपल्या अनुभवातून सांगा?

4 उत्तरे
4 answers

जीवनात अपयशाची कारणे सविस्तर कोणती आहेत, आपल्या अनुभवातून सांगा?

6
परफॉर्मन्ससाठी पालकांकडून सातत्याने येणाऱ्या दडपणामुळे मुले खोटे बोलू लागतात. त्यासाठी अप्रत्यक्षपणे पालकच जबाबदार असतात. याचा अर्थ असा नाही की मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्नच पालकांनी करू नये. मात्र त्यांच्या अपयशाची कारणे शोधून त्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला तर आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यापासून विद्यार्थी रोखले जाऊ शकतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी केले.

कल्याणमधील श्री गुरुनानक शाळेतर्फे 'तणावमुक्त परीक्षा' या विषयावर डॉ. जाधव यांचे व्याख्यान नुकतेच झाले. १९६७ मध्ये भारतात आत्महत्यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येत ११ इतके होते. मात्र तेच प्रमाण १९९७ मध्ये १७५ टक्क्यांनी वाढले. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या ४ राज्यांमध्ये देशातील एकूण आत्महत्यांच्या ५० टकके आत्महत्या केल्या जातात. तर बेंगळूरु या शहरात देशातील सर्वाधिक आत्महत्या नोंदवल्या जातात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. स्पधेर्त टिकून राहण्यासाठी उच्चशिक्षणाची आवश्यकता भासू लागली आहे. उच्चशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढू लागल्या आहेत. या महत्त्वाकांक्षा आणि त्यांना प्रत्यक्षात मिळालेले यश यामध्ये मोठी तफावत असली तर मुलांमध्ये नैराश्य येते. या नैराश्यातून सुटका होण्यासाठी आशेचा किरण असावा लागतो. परंतु तोदेखील जेव्हा दिसत नाही, त्यावेळी मुले आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्यास परावृत्त होतात', असे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.
बऱ्याचदा आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना मुलांमध्ये बळावली की सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मुले असा प्रकार करतात हे उघड झाले आहे. असे करणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. १५ ते २९ या वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३४ टक्के इतके आढळून आले आहे. केवळ टीव्हीवरील प्रक्षोभक दृष्ये किंवा बातम्या पाहून कोणीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेत नाही. कारण मानवाला मेंदूच्या माध्यमातून विचार करण्याची निसर्गदत्त देणगी मिळाली आहे. आपण या देणगीमुळे बऱ्यावाईटाचा विचार करू शकतो, त्यामुळे एखादा चित्रपट किंवा बातमी आत्महत्यांना जबाबदार असू शकत नाही, असे परखड मतही त्यांनी मांडले.

'मुले पालकांना आपले रोल मॉडेल (आदर्श) मानतात. अन्य मुलांना आपल्या मुलापेक्षा जास्त मार्क मिळाले की आई मुलांना रागावते. तर वडिलांचा समज असा असतो की मी केवळ मुलाच्या भवितव्यासाठी जास्त वेळ काम करतो. त्याच्या शिक्षणासाठी कितीही पैसा लागला तरी तो आपल्याजवळ असावा, यासाठी कष्ट उपसले जातात. परंतु इतके करूनही मुलाला कमी मार्क मिळाले की वडिलांचाही संयम सुटतो. पालकांचा सुटलेला संयमाचेसुद्धा त्यांना रोल मॉडेल मानत असलेली मुले निरीक्षण करतात. त्यामुळे कालांतराने त्यांनाही संयम राखणे कठीण होते. सध्याच्या स्पधेर्च्या युगात संयम न राखता आला की त्याचे रुपांतर नैराश्यात होते. हे नैराश्य काही दिवसांनी आक्रमकतेकडे वळते आणि आक्रमकपणाचा स्वत:वर केलेला वापर म्हणजे आत्महत्या' असा भावनांचा टप्पा
उत्तर लिहिले · 26/11/2018
कर्म · 13485
2
माफ करा मी वरील उत्तर वाचले नाही कारण फार मोठे होते.
        आत्ता येऊया मूळ प्रश्नाकडे, अपयशाच एकच कारण असत मग ते कोणतही  क्षेत्र असुदे आणि ते म्हणजे आपूरा अभ्यास.
        आपल्याला अपयशी बनवत ते म्हणजे त्या व्यक्तीचा, वस्तूचा, घटनेचा, पद्धतिचा, माताचा, क्षेत्राचा, विषयांचा, कलेचा, (ईत्यादी ) आपूरा अभ्यास. विचार करून पहा आणि तुमच्या अपयशा मागील काही करना पैकी 'अपुरा अभ्यास' हे कारण मेन आहे की नाही ते पहा. मगच लक्षात येईल.
                                                धन्यवाद.
उत्तर लिहिले · 21/1/2019
कर्म · 2950
0

नमस्कार! जीवनात अपयशाची अनेक कारणे असू शकतात, आणि ती व्यक्तीनुसार बदलू शकतात. माझ्या अनुभवानुसार काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. ध्येयांचा अभाव: ज्या व्यक्तींना जीवनात काय साध्य करायचे आहे हेच माहीत नसते, त्यांची दिशा निश्चित नसते. त्यामुळे ते भरकटतात आणि अपयशी ठरतात.

  2. योग्य नियोजन आणि तयारीचा अभाव: कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तयारी नसल्यामुळे अनेक अडचणी येतात आणि अपयश येऊ शकते.

  3. कठोर परिश्रमाची तयारी नसणे: यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्त्वाचे आहे.Hard work is the key to success. ज्या लोकांची कठोर পরিশ্রম करण्याची तयारी नसते, ते अयशस्वी होतात.

  4. आत्मविश्वासाची कमतरता: स्वत:वर विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास कमी असेल तर आपण प्रयत्न करत नाही, आणि त्यामुळे अपयश येते.

  5. नकारात्मक दृष्टिकोन: नकारात्मक विचारसरणीमुळे आपल्या क्षमतांवर परिणाम होतो. नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतो.

  6. वेळेचे व्यवस्थापन न करणे: वेळेचं योग्य व्यवस्थापन न केल्यास कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कामात गडबड होते आणि अपयश येऊ शकते.

  7. शिकण्याची वृत्ती नसणे: सतत बदलणाऱ्या जगात, नवीन गोष्टी शिकणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्ती नवीन गोष्टी शिकायला तयार नसतात, त्या मागे राहतात आणि अपयशी ठरतात.

  8. संयमाचा अभाव: कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी वेळ लागतो. संयम नसेल, तर लवकरच निराश होऊन प्रयत्न सोडून देतो, त्यामुळे अपयश येते.

  9. सामाजिक संबंधांचा अभाव: चांगले सामाजिक संबंध आपल्याला मदत करतात आणि आधार देतात. सामाजिक संबंध नसल्यामुळे अडचणी येतात आणि अपयश येऊ शकते.

ही काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे लोकांना अपयश येऊ शकते. यावर विचार करून आपण आपल्या चुका सुधारू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5300

Related Questions

प्रयत्न न करताच मैदान सोडल्यास काय अवस्था होईल?
मेहनत करून सुद्धा अयशस्वी ठरलो, का?
आयुष्यात अपयशी होण्याची कारणे कोणती?