अपयश
कोणतीही प्रतीक्षा न करता, मेहनत न करता काही क्षणांतच श्रीमंत होता आले, तर काय कमाल होईल, असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात कधीनाकधी तरी नक्कीच आला असेल. एखादी सोन्याची खाण मिळाली, तर एका रात्रीत श्रीमंत होता येईल, अशी स्वप्न अनेकांना पडत असतील. पण एक काळ असा होता जेव्हा सोन्याच्या डोंगराची स्वप्नवत वाटणारी ही कल्पना सत्यात उतरली होती.
२४ जानेवारी १८४८ रोजी जेम्स डब्ल्यू मार्शल या व्यक्तीला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील कोलोमा येथे सोने सापडले. या भागात सोने आढळल्याची बातमी पूर्ण अमेरिकेत वणव्यासारखी पसरली. सोन्याच्या शोधात देशभरातून ३ लाख लोकांनी कॅलिफोर्नियाकडे धाव घेतली. १८४८ ते १८५५ या काळाला गोल्डरश म्हणून संबोधले गेले. याच काळात आर यु डार्बी यांच्या काकांना देखील या सुवर्णज्वराने गाठले.
ते आपले घरदार सोडून सोन्याच्या शोधात कोलोरॅडो येथे पोहोचले. थोडे खोदकाम केल्यावर त्यांना सोन्याचा विशाल साठा सापडल्याचे जाणवले. जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण त्याला सापडली होती, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. या आनंदात ते मेरीलँडला आपल्या घरी परतले. सोन्याचे खोदकाम करण्याच्या मशीन विकत घेण्यासाठी पैसा उभा करण्यास त्यांनी सुरुवात केली.
कोलोरॅडोला परत जातानाच डार्बी आणि त्यांचे काका यांनी मिळणाऱ्या सोन्यावरील वाट्यावर आपला हक्क स्पष्ट केला होता. त्यांनी मातीचे परीक्षण केले तेव्हा त्या मातीत सोने असल्याचे स्पष्ट झाले. दोघांच्या आनंदाला पारावर उरला नाही आता काही काळातच आपण श्रीमंत होवू अशी खात्री त्यांना झाली.
त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु केले. परंतु सोने अचानक नाहीसे झाल्यासारखे झाले. भरपूर खोदकाम केल्यानंतरही काहीच मिळत नव्हते. अनेक प्रयत्न करून त्यांनी हात टेकले. सोन्याचा कणही मिळत नसल्याने शेवटी त्यांनी खोदकाम थांबवले. खोदकामाच्या ज्या काही मशीन होत्या त्या त्यांनी भंगार म्हणून विकायच्या ठरवल्या. एका माणसाने त्यांच्याकडून त्या सगळ्या मशीन १००-२०० डॉलरला विकत घेतल्या. सगळे भंगार विकून डार्बी ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागले.
ज्या माणसाने खोदकामाच्या मशीन विकत घेतल्या होत्या त्याने माईन इंजिनिअरला बोलावून त्याला मशीन दाखवल्या. थोडी तपासणी केल्यानंतर इंजिनिअरला कळले की डार्बी यांनी चुकीच्या कॅल्क्युलेशन केल्या होत्या. ज्याठिकाणी खोदकाम थांबवले होते. त्या ठिकाणाहून केवळ तीन फुटांवर सोने होते. सहाजिकच त्यांनी पुन्हा खोदकामाला सुरुवात केली. मशीन विकत घेणाऱ्या व्यक्तीला इंजिनिअरने सांगितल्याप्रमाणे सोने सापडले. आणि तो कोट्याधीश बनला.
मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यावर डार्बी यांनी एक चांगली नोकरी शोधण्याचे ठरवले. ते जीवन विमा विकण्याच्या व्यवसायात शिरले. केवळ तीन फुटांनी सोने गमावल्याच्या अनुभवाने त्यांना मोठा धडा शिकवला होता. यातुन त्यांनी कधीही प्रयत्न न सोडण्याची शिकवण घेतली. जीवन विमा विकताना कोणत्याही ग्राहकाने जीवन विमा विकत घेण्यास नकार दिला , की डार्बी ऐकायचे नाही. ते पूर्ण प्रयत्न करून, मागे लागून जीवन विमा विकूनच राहायचे. आयुषयात पुन्हा कधीही थांबायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. ते दरवर्षी लाखो रुपयांचा जीवन विमा विकत होते. यातून त्यांनी बरीच संपत्ती कामवाली.
प्रयत्नांती परमेश्वर अशी म्हण मराठीत आहे. म्हणून प्रयत्न सोडू नका. एकदा अपयश आल्यावर डार्बी त्याबाबत दुःख करीत राहिले नाही. नशिबाला दोष देत त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवला नाही. तर त्यातून धडा शिकत त्यांनी कधीही प्रयत्न न सोडण्याचे ठरवले आणि यश संपादन केले. म्हणून डार्बी यांच्याप्रमाणे कधीही प्रयत्नांची कास सोडू नका.
सौरभ दिवटे
CEO
कॉप्टरव्हीजन इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड
~ www.Qoptervzn.com ~
कंपनीचे बिजनेसेस -
www.ApnaSaman.com
ईकॉमर्स ( ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट )
www.GrowthApple.com
सॉफ्टवेयर, एप्लिकेशन्स, वेबसाईट्स डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग ची वेबसाईट
www.GrowthApple.xyz
वेब होस्टिंग, डोमेन, VPS च्या सेवा देणारी वेबसाईट
मेहनत करून सुद्धा अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- तुमची मेहनत योग्य दिशेने नसेल, तर अपेक्षित परिणाम मिळणार नाही.
- उदाहरणार्थ: तुम्ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप अभ्यास करत आहात, पण अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करत नाही, तर यश मिळणे कठीण आहे.
- कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे.
- वेळेचे व्यवस्थापन नसेल आणि कामांची प्राथमिकता ठरवली नाही, तर अपयश येऊ शकते.
- एखादे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही अयशस्वी होऊ शकता.
- उदाहरणार्थ: तुम्हाला चांगले इंग्रजी बोलता येत नसेल आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अडचण येऊ शकते.
- कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचे आहे.
- जर तुम्ही नियमितपणे प्रयत्न करत नसाल, तर तुम्हाला अपयश येऊ शकते.
- तुमचा दृष्टिकोन नकारात्मक असेल, तर तुमच्या प्रयत्नांमध्ये कमतरता येऊ शकते.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अडचणींवर मात करणे सोपे जाते.
- ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, त्याबद्दल तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल, तर तुम्ही अयशस्वी होऊ शकता.
- उदाहरणार्थ: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती न घेतल्यास नुकसान होऊ शकते.
- जगात सतत बदल होत असतात आणि या बदलांना स्वीकारण्याची तयारी आपल्यात असायला हवी.
- बदल स्वीकारले नाही, तर मागे राहण्याची शक्यता असते.
- आरोग्याच्या समस्यांमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
- शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.
यापैकी काही कारणे तुमच्या अयशस्वीतेमागे असू शकतात. त्यामुळे आत्मपरीक्षण करणे आणि सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.
कल्याणमधील श्री गुरुनानक शाळेतर्फे 'तणावमुक्त परीक्षा' या विषयावर डॉ. जाधव यांचे व्याख्यान नुकतेच झाले. १९६७ मध्ये भारतात आत्महत्यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येत ११ इतके होते. मात्र तेच प्रमाण १९९७ मध्ये १७५ टक्क्यांनी वाढले. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या ४ राज्यांमध्ये देशातील एकूण आत्महत्यांच्या ५० टकके आत्महत्या केल्या जातात. तर बेंगळूरु या शहरात देशातील सर्वाधिक आत्महत्या नोंदवल्या जातात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. स्पधेर्त टिकून राहण्यासाठी उच्चशिक्षणाची आवश्यकता भासू लागली आहे. उच्चशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढू लागल्या आहेत. या महत्त्वाकांक्षा आणि त्यांना प्रत्यक्षात मिळालेले यश यामध्ये मोठी तफावत असली तर मुलांमध्ये नैराश्य येते. या नैराश्यातून सुटका होण्यासाठी आशेचा किरण असावा लागतो. परंतु तोदेखील जेव्हा दिसत नाही, त्यावेळी मुले आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्यास परावृत्त होतात', असे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.
बऱ्याचदा आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना मुलांमध्ये बळावली की सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मुले असा प्रकार करतात हे उघड झाले आहे. असे करणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. १५ ते २९ या वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३४ टक्के इतके आढळून आले आहे. केवळ टीव्हीवरील प्रक्षोभक दृष्ये किंवा बातम्या पाहून कोणीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेत नाही. कारण मानवाला मेंदूच्या माध्यमातून विचार करण्याची निसर्गदत्त देणगी मिळाली आहे. आपण या देणगीमुळे बऱ्यावाईटाचा विचार करू शकतो, त्यामुळे एखादा चित्रपट किंवा बातमी आत्महत्यांना जबाबदार असू शकत नाही, असे परखड मतही त्यांनी मांडले.
'मुले पालकांना आपले रोल मॉडेल (आदर्श) मानतात. अन्य मुलांना आपल्या मुलापेक्षा जास्त मार्क मिळाले की आई मुलांना रागावते. तर वडिलांचा समज असा असतो की मी केवळ मुलाच्या भवितव्यासाठी जास्त वेळ काम करतो. त्याच्या शिक्षणासाठी कितीही पैसा लागला तरी तो आपल्याजवळ असावा, यासाठी कष्ट उपसले जातात. परंतु इतके करूनही मुलाला कमी मार्क मिळाले की वडिलांचाही संयम सुटतो. पालकांचा सुटलेला संयमाचेसुद्धा त्यांना रोल मॉडेल मानत असलेली मुले निरीक्षण करतात. त्यामुळे कालांतराने त्यांनाही संयम राखणे कठीण होते. सध्याच्या स्पधेर्च्या युगात संयम न राखता आला की त्याचे रुपांतर नैराश्यात होते. हे नैराश्य काही दिवसांनी आक्रमकतेकडे वळते आणि आक्रमकपणाचा स्वत:वर केलेला वापर म्हणजे आत्महत्या' असा भावनांचा टप्पा