आयुष्य प्रेरणा जीवनशैली अपयश

आयुष्यात अपयशी होण्याची कारणे कोणती?

4 उत्तरे
4 answers

आयुष्यात अपयशी होण्याची कारणे कोणती?

17
आयुष्यात अपयशी होण्यास आपण स्वतः केलेल्या चूकाच कारणीभूत असतात. कोणत्याही क्षेत्रातील अपयशामागे योग्य नियोजन, दूरदृष्टी चा अभाव, मेहनत न करण्याची वृत्ती, एक ध्येय न ठेवता काम करणे, धरसोड वृत्ती, परिस्थिती नशिबाला दोष देऊन नशिबाच्या हवाल्यावर सोडणे, कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित न करता त्यास सहजतेने घेणे, अतिउत्साही असणे,स्वतःवर आत्मविश्वास नसणे, इतरांना मदत न करण्याची वृत्ती इ. गोष्टी अपयशी होण्यास कारणीभूत ठरतात.
 
उत्तर लिहिले · 23/8/2017
कर्म · 210095
4
*आयुष्यामध्ये हरलेल्या माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणीसाठी*

मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय ,
पुन्हा उठून प्रयत्न कर |
कष्टाने मात करून अपयशावरती ,
यशावरती राज्य कर |
देतील लोक आदर्श तुझा ,
त्यांच्या अपेक्षांना पूर्ण कर |
हरलास पुन्हा तरी चालेल ,
अनुभवांमध्ये तुझ्या वाढ कर |
झाला यशस्वी तर मनाचा राजा होशील,
अन आले अपयश तर गुरु होशील ,
पण मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय ,
पुन्हा उठून प्रयत्न कर ||

झालीय सुरुवात तुझी अपयशाने ,
यशासाठी कष्टामध्ये  वाढ कर |
राहू नको देवाच्या भरवशावराती ,
स्वतःच स्वतःसाठी प्रयत्न कर |
कामविलेय शरीर तुझेच तू ,
वापर त्याचा तुझ्यासाठीच कर |
पण मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय,
पुन्हा उठून प्रयत्न कर ‖

शोध तुझ्यातील तू धाडसाला ,
जगण्यासाठी त्याचा वापर कर |
अन आत्मविश्वासाने जगून या दुनियेमध्ये ,
न्यूनगंडास तुझ्या तू दूर कर |
धावत येईल यश तुझ्यामागे ,
अजून थोडे कष्ट कर |
पण मित्रा , हरलास म्हणून रडतोस काय ,
पुन्हा उठून प्रयत्न कर!!!
उत्तर लिहिले · 13/8/2019
कर्म · 115390
0
आयुष्यात अपयशी होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • ध्येय निश्चित न करणे: ज्या व्यक्ती आपले ध्येय निश्चित करत नाहीत, त्यांना कोणत्या दिशेने जायचे आहे हेच माहीत नसते. त्यामुळे ते अपयशी होण्याची शक्यता असते.
  • नकारात्मक दृष्टिकोन: नकारात्मक विचारसरणीNegative thinkingresult in failure असलेल्या व्यक्तींना संधी असूनही त्या दिसत नाहीत आणि ते प्रयत्न करण्याआधीच हार मानतात.
  • planingचा अभाव: कोणत्याही कामाची योजना न आखता ते काम केल्यास अपयश येऊ शकते. योग्य नियोजनExecution and planning महत्वाचे आहे.
  • कठोर परिश्रमाची तयारी नसणे: Hard work is the key to success जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम Hard workand dedication करण्याची तयारी असावी लागते. जे लोक Hard workकरायला Hard workतयार नसतात, ते अयशस्वी होतात.
  • वेळेचे व्यवस्थापन न करणे: वेळेचे योग्य व्यवस्थापन Time managementन केल्यामुळे अनेक कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे अपयश येते.
  • शिकण्याची वृत्ती नसणे: सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि Improvement करण्याची तयारी नसल्यास, व्यक्ती मागे राहू शकते आणि अपयशी होऊ शकते.
  • जोखीम न घेणे: Risk घेणे महत्त्वाचे आहे, पण Risk न घेतल्यास नवीन संधी मिळत नाहीत आणि आहे त्या परिस्थितीतच समाधान मानावे लागते, त्यामुळे प्रगती खुंटते.
  • आत्मविश्वास कमी असणे: Self confidenceआत्मविश्वास Confidenceनसल्यामुळे व्यक्ती स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे प्रयत्न करत नाही.
  • संयमाचा अभाव: कोणत्याही कामात Patience संयम Patienceअसणे खूप आवश्यक आहे. लगेच Result न मिळाल्यास अनेकजण प्रयत्न करणे सोडून देतात आणि त्यामुळे अपयशी होतात.
  • इतरांशी तुलना करणे: स्वतःची तुलना इतरांशी Comparisonकरण्याची सवय Self esteemअसल्यामुळे Self esteem कमी होतो आणि नकारात्मक भावना Negative emotion निर्माण होतात.

या व्यतिरिक्त, आणखी अनेक वैयक्तिक आणि सामाजिक कारणे Failure to achieve goalsअपयशास कारणीभूत ठरू शकतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5300

Related Questions

प्रयत्न न करताच मैदान सोडल्यास काय अवस्था होईल?
मेहनत करून सुद्धा अयशस्वी ठरलो, का?
जीवनात अपयशाची कारणे सविस्तर कोणती आहेत, आपल्या अनुभवातून सांगा?