मानसशास्त्र अपयश

प्रयत्न न करताच मैदान सोडल्यास काय अवस्था होईल?

2 उत्तरे
2 answers

प्रयत्न न करताच मैदान सोडल्यास काय अवस्था होईल?

0

कोणतीही  प्रतीक्षा न करता, मेहनत न करता काही क्षणांतच श्रीमंत होता आले, तर काय कमाल होईल, असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात कधीनाकधी तरी नक्कीच आला असेल. एखादी सोन्याची खाण मिळाली, तर एका रात्रीत श्रीमंत होता येईल, अशी स्वप्न अनेकांना पडत असतील. पण एक काळ असा होता जेव्हा सोन्याच्या डोंगराची स्वप्नवत वाटणारी ही कल्पना सत्यात उतरली होती. 

 

२४ जानेवारी १८४८ रोजी जेम्स डब्ल्यू मार्शल या व्यक्तीला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील कोलोमा येथे सोने सापडले. या भागात सोने आढळल्याची बातमी पूर्ण अमेरिकेत वणव्यासारखी पसरली. सोन्याच्या शोधात देशभरातून ३ लाख लोकांनी कॅलिफोर्नियाकडे धाव घेतली.  १८४८ ते १८५५ या काळाला गोल्डरश म्हणून संबोधले गेले. याच काळात आर यु डार्बी यांच्या काकांना देखील या सुवर्णज्वराने गाठले.


 ते आपले घरदार सोडून सोन्याच्या शोधात कोलोरॅडो येथे पोहोचले. थोडे खोदकाम केल्यावर त्यांना सोन्याचा विशाल साठा सापडल्याचे जाणवले. जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण त्याला सापडली होती, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. या आनंदात ते मेरीलँडला आपल्या घरी परतले. सोन्याचे खोदकाम करण्याच्या मशीन विकत घेण्यासाठी पैसा उभा करण्यास त्यांनी सुरुवात केली.


    कोलोरॅडोला परत जातानाच डार्बी आणि त्यांचे काका यांनी मिळणाऱ्या सोन्यावरील वाट्यावर आपला हक्क स्पष्ट केला होता. त्यांनी मातीचे परीक्षण केले तेव्हा त्या मातीत सोने असल्याचे स्पष्ट झाले. दोघांच्या आनंदाला पारावर उरला नाही आता काही काळातच आपण श्रीमंत होवू अशी खात्री त्यांना झाली.


 त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु केले. परंतु सोने अचानक नाहीसे झाल्यासारखे झाले. भरपूर खोदकाम केल्यानंतरही काहीच मिळत नव्हते. अनेक प्रयत्न करून त्यांनी हात टेकले. सोन्याचा कणही मिळत नसल्याने शेवटी त्यांनी खोदकाम थांबवले. खोदकामाच्या ज्या काही मशीन होत्या त्या त्यांनी भंगार म्हणून विकायच्या ठरवल्या. एका माणसाने त्यांच्याकडून त्या सगळ्या मशीन १००-२०० डॉलरला विकत घेतल्या. सगळे भंगार विकून डार्बी ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागले.  


ज्या माणसाने खोदकामाच्या मशीन विकत घेतल्या होत्या त्याने माईन इंजिनिअरला बोलावून त्याला मशीन दाखवल्या. थोडी तपासणी केल्यानंतर  इंजिनिअरला कळले की डार्बी यांनी चुकीच्या कॅल्क्युलेशन केल्या होत्या. ज्याठिकाणी खोदकाम थांबवले होते. त्या ठिकाणाहून केवळ तीन फुटांवर सोने होते. सहाजिकच त्यांनी पुन्हा खोदकामाला सुरुवात केली. मशीन विकत घेणाऱ्या व्यक्तीला इंजिनिअरने सांगितल्याप्रमाणे सोने सापडले. आणि तो कोट्याधीश बनला.


मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यावर डार्बी  यांनी एक चांगली नोकरी शोधण्याचे ठरवले. ते जीवन विमा विकण्याच्या व्यवसायात शिरले. केवळ तीन फुटांनी सोने गमावल्याच्या अनुभवाने त्यांना मोठा धडा शिकवला होता. यातुन त्यांनी कधीही प्रयत्न न सोडण्याची शिकवण घेतली. जीवन विमा विकताना कोणत्याही ग्राहकाने जीवन विमा विकत घेण्यास नकार दिला , की डार्बी  ऐकायचे नाही. ते पूर्ण प्रयत्न करून, मागे लागून  जीवन विमा विकूनच राहायचे. आयुषयात पुन्हा कधीही थांबायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. ते दरवर्षी लाखो रुपयांचा जीवन विमा विकत होते. यातून त्यांनी बरीच संपत्ती कामवाली.


  प्रयत्नांती परमेश्वर अशी म्हण मराठीत आहे. म्हणून प्रयत्न सोडू नका. एकदा अपयश आल्यावर डार्बी त्याबाबत दुःख करीत राहिले नाही. नशिबाला दोष  देत त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवला नाही. तर त्यातून धडा शिकत त्यांनी कधीही प्रयत्न न सोडण्याचे ठरवले आणि यश संपादन केले. म्हणून डार्बी यांच्याप्रमाणे कधीही प्रयत्नांची कास सोडू नका.

 --------------------------------------------------------------


               सौरभ दिवटे
                CEO
कॉप्टरव्हीजन इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड
      ~ www.Qoptervzn.com ~

कंपनीचे बिजनेसेस -

www.ApnaSaman.com
ईकॉमर्स ( ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट )

www.GrowthApple.com
सॉफ्टवेयर, एप्लिकेशन्स, वेबसाईट्स डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग ची वेबसाईट

www.GrowthApple.xyz
वेब होस्टिंग, डोमेन, VPS च्या सेवा देणारी वेबसाईट

उत्तर लिहिले · 22/1/2020
कर्म · 8870
0

प्रयत्न न करताच मैदान सोडल्यास अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. काही संभाव्य अवस्था:

  • अपयश: प्रयत्न न करता माघार घेतल्यास अपयश निश्चित आहे. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
  • पश्चात्ताप: भविष्यात तुम्हाला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ शकतो. 'मी प्रयत्न केला असता तर...' असा विचार मनात येऊ शकतो.
  • आत्मविश्वास कमी होणे: प्रयत्न न करता माघार घेतल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो. स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागते.
  • संधी गमावणे: प्रयत्न न केल्यामुळे तुम्ही एखादी मोठी संधी गमावू शकता.
  • शिकण्याचा अभाव: प्रयत्नांमधून शिकायला मिळते. प्रयत्न न करता माघार घेतल्यास तुम्हाला अनुभव आणि ज्ञान मिळत नाही.
  • नकारात्मक दृष्टिकोन: वारंवार प्रयत्न न करता माघार घेतल्यास तुमच्यात नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो.

म्हणून, जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5300

Related Questions

मेहनत करून सुद्धा अयशस्वी ठरलो, का?
जीवनात अपयशाची कारणे सविस्तर कोणती आहेत, आपल्या अनुभवातून सांगा?
आयुष्यात अपयशी होण्याची कारणे कोणती?