मेडिटेशनमुळे होणारे फायदे कोणते?
ध्यानामुळे तणावमुक्ती
ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत :
तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध आणिआपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत
हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात.
ध्यानाचे शारीरिक फायदे
ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.
ध्यानामुळे शारीरक स्तरावर होणारे फायदे
उच्च रक्तदाब कमी होतो.रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात.सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.
ध्यानामुळे मानसिक स्तरावर होणारे फायदे
ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते. नियमित ध्यान केल्याने :
अनामिक भीती कमी होते.भावनात्मक स्थिरता वाढते.सृजनात्मकता वाढते.आनंद वाढतो.अंतर्ज्ञान (तात्कालिक ज्ञान) विकसित होते.परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक शांती मिळते.समस्या छोट्या वाटू लागतात.एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो.कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव, राग आणि निराशा वाढते.विस्तारित चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते.
आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.
ध्यानाचे इतर फायदे
भावनिक स्थिरता आणि सुसंवाद : ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
समस्त सृष्टीशी सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.
आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.
ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.
तुमच्यात वैश्विक चेतनेचा उदय होतो:
दररोज ध्यान केल्याने चेतनेची पाचवी स्थिती म्हणजेच वैश्विक चेतना आपण अनुभवू लागतो. वैश्विक चेतना म्हणजेच संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होणे.
ज्यावेळी संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होते त्यावेळी तुम्ही आणि विश्व हे प्रेमाच्या धाग्यात अगदी घट्ट बांधले जातात. आणि ह्याच प्रेमामुळे तुम्हाला जीवनातील अशांती आणि विरोधी तत्त्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता येते. राग आणि निराशा ह्या "आली रे आली की गेली" अशा क्षणभंगूर भावना होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
ज्ञान आणि ध्यान याचं संगम आयुष्य परिपूर्ण करते. जेंव्हा तुम्ही वैश्विक चेतनेची पातळी गाठता, तेंव्हा तुम्ही सुंदर तरीही सशक्त बनता. जीवनाची वेगवेगळी मुल्ये विनाशर्त सामावून घेणारं एक मृदू, नाजूक आणि सुंदर व्यक्तिमत्व बनता.
ध्यानाचे फायदे कसे घ्यावेत
ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सराव करत राहणे जरुरी आहे, आणि तो पण फक्त रोजची काही मिनिटे. एकदा का ते तुमच्या रोजच्या व्यवहातर समाविष्ट झाले की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग बनून जाईल.
ध्यान हे एका बीजा प्रमाणे आहे. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात. आणि ज्या झाडांना खत पाणी मिळत नाही, ज्यांची काही काळजी घेतली जात नाही, त्यांना कधीच फळे लागत नाहीत. ती फक्त जगतात.
सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनिटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा.
स्रोत:द आर्ट ऑफ़ लिविंग वेबसाईट
---------------------------------------------------------
तुमच्यासोबत असं कधी झालयं, की तीव्रपणे एखाद्याची आठवण काढावी आणि तो समोर प्रत्यक्ष हजर…
किंवा
बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी, आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्याला एकदम सुचावी..
कधी नुसताचं एखाद्या गोष्टीचा सतत विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी, मग राहुन राहुन त्याबद्दल आश्चर्य वाटतं.
असं का होतं माहितीये,
आपलं डोकं एका रेडिओ सारखं आहे, ते नेहमी संदेशांचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं.
म्हणुन कधी आपलं मन एकदम आनंदी, प्रफुल्ल्लीत असतं, तरी कधी चिडचिड व्हायला लागते, आणि आपण उदास होतो.
जर तुम्हाला नेहमीच आनंदी राहावं असं वाटत असेल तर हे वाचाच.
मनाचे दोन भाग आहेत, चेतन मन (जागं असलेलं मन) आणि अवचेतन मन, (सुप्त मन).
तसचं प्रत्येक मानवी मनाच्या चार अवस्था, म्हणजे चार फ्रिक्वेन्सी आहेत.
1) बीटा अवस्था – हे आहे आपले चेतन मन, म्हणजे आपली म्हणजे सकाळी उठल्यापासुन रात्री झोपण्यापर्यंत ची जागृत अवस्था. ह्याची फ्रिक्वेन्सी आहे – 14 ते 30 हर्ट्झ.
2) अल्फा स्टेट – ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट असेही म्हणतात. फ्रिक्वेन्सी – 7 ते 13 हर्ट्झ
3) थीटा अवस्था – आपली झोपेची स्थिती, चेतन मन झोपलेले, अवचेतन मनाचे खेळ सुरुच.. फ्रिक्वेन्सी – 3.5 ते 7 हर्ट्झ
4) डेल्टा अवस्था – गाढ निद्रेची स्थिती. फ्रिक्वेन्सी – 0.5 ते 3.5 हर्ट्झ
फक्त माणुसच नाही तर ह्या ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी सोडत्येत.
आपल्या आजुबाजुला वातावरणाचा एक थर आहे, त्याला म्हणतात आयनमंडल. विचारांचे आदानप्रदान करणारं हे माध्यम आहे. याची फ्रिक्वेन्सी आहे 6.8 हर्ट्झ.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता वरच्या सर्व फ्रिक्वेन्सीचे आकडे पडताळुन पहा.
वातावरणाची आणि मनाच्या अल्फा स्टेटची फ्रिक्वेन्सी एकच आहे.
म्हणजे जर आपण आपल्या मनाला अल्फा स्टेटला नेलं, तर आपण वातावरणच्या माध्यमाचा वापर करुन आपण आपल्याला हवं ते घडवु शकतो……
अल्फा स्टेट म्हणजेच ध्यानाची अवस्था…
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टप्पा पहिला -
- एका शांत ठिकाणी, खोलीमध्ये किंवा मोकळ्या जागी मांडी घालुन बसा, त्रास असेल तर आरामखुर्ची घेतली तरी चालते, झोपायची स्थिती टाळा!
- हे केव्हाही फ्री टाईममध्ये करु शकता, व्यत्यय कमी असावेत, भुक लागलेली नसावी आणि खुप पोट भरलेले नसावे, म्हणुन सर्व दृष्टीने, सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ उत्तम.
- डोळे बंद करा.
- शरीर संपुर्णपणे रिलॅक्स सोडा.
- एक एक खोल श्वास घ्या, आणि खोल श्वास सोडा.
- ही क्रिया वीस ते तीस मिनीटे करा.
- हिच अंतर्मनाच्या खोल आवस्थेत जाण्याची सुरुवात आहे.
दुसरा टप्पा –
- ज्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांनी मनातल्या मनात आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि एक प्रार्थना म्हणावी.
- हे ईश्वरा, तुम्ही मला माझ्या अंतर्मनाशी संपर्क करुन देत आहात.
- मला माझ्या अंतर्मनाच्या प्रबळ शक्तीची जाणीव होत आहे.
- मी आनंदी आहे, मी प्रचंड शक्तीशाली आहे,
(इथे आपापल्या इष्टदेवतेचे स्मरण करु शकतो, उदा. स्वामी समर्थ, साईबाबा, कृष्ण, शिवजी, गणपती)
देवाचेच नाव घ्यावे असेही नाही, देवाच्या ऐवजी, “हे ब्रम्हांडा, असा सुद्धा उच्चार करु शकता.”
ट्प्पा तिसरा –
- आता रिलॅक्स व्हा, सर्व बॉडी शिथील सोडा.
- Relaxation is key of happiness.
- क्रमाक्रमाने संपुर्ण शरीर रिलॅक्स करताच अंतर्मनाचे बंद दार तुमच्यासाठी उघडले जाईल.
- काही मिनीटे बसुन राहील्यास, एकदम शांत शांत वाटते, उत्साह वाटतो, तुमच्यामध्ये दैवी शक्तीचा संचार होत असल्याची अनुभुती येते.
- नियमित रीलॅक्शेशन प्रक्रिया केल्याने बीपी, हर्ट अटॅक अजिबात होत नाही.
- झोप खुप छान लागते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं हवं,
काही क्षणासाठी तरी सर्व विचार दुर सारुन स्वतः मध्ये डुंबुन जायला हवं.
मन चंचल आहे,
पण रोजच्या सरावाने ते हळुहळु शांत-शांत व्हायला लागतं.
मग एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते.
ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं.
आयुष्यात घडणार्या चांगल्या गोष्टींबद्दल देवाला मनापासुन ‘थॅंक यु’ म्हणायचं…..
आणि रोजच्या कामाला लागायचं….
बस!………
ब्रह्मांड ते तुम्हाला मिळवुन देण्यासाठी आकाशपाताळ एक करेल…….
अशा ध्यानाचा इफेक्ट म्हणजे याने स्मरणशक्ती प्रचंड वाढते. कामाचा आवाका वाढतो, आत्मविश्वास वाढतो. काम करण्यात आनंद मिळतो, मोठीमोठी इतरांना अवघड वाटणारी कामं आपल्याकडुन चुटकीसरशी होतातं.
आभार आणि शुभेच्छा!...
मेडिटेशनचे (ध्यानाचे) अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक फायदे आहेत. त्यापैकी काही फायदे खालीलप्रमाणे:
1. तणाव कमी होतो (Stress Reduction):
मेडिटेशनमुळे कोर्टिसोल (Cortisol) नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव कमी होतो.
2. चिंता कमी होते (Anxiety Reduction):
नियमित मेडिटेशन केल्याने चिंता आणि भीती कमी होते.[1]
3. भावनिक आरोग्य सुधारते (Improved Emotional Health):
मेडिटेशन आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे भावनिक आरोग्य सुधारते.
4. स्मरणशक्ती वाढते (Enhanced Memory):
मेडिटेशन मेंदूच्या ग्रे मॅटरची (Gray matter) घनता वाढवते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.[2]
5. एकाग्रता वाढते (Increased Attention Span):
नियमित मेडिटेशन केल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.[3]
6. चांगली झोप लागते (Better Sleep):
मेडिटेशनमुळे मन शांत होते आणि झोप सुधारते.
7. वेदना कमी होतात (Pain Management):
मेडिटेशनमुळे क्रोनिक वेदना (chronic pain) कमी होतात.[4]