प्रथमोपचार आरोग्य

फटाक्याने भाजले तर काय करावे?

3 उत्तरे
3 answers

फटाक्याने भाजले तर काय करावे?

7

*_🔥🎊💥फटाक्याने त्वचा जळली तर काय कराल आणि काय नाही?_*
--------------;---------  -^-^--
_दिवाळी म्हटलं की रोषणाई सोबतच फटाके आलेच. पण फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर चांगलंच महागात पडू शकतं. फटाके फोडताना हवी ती काळजी न घेतल्याने तुम्हाला आनंदाला नजर लागू शकते. दिवाळीचे फटाके फोडताना अनेकांना जळणे, जखम होणे अशा समस्या होतात. तसेच डोळ्यांमध्ये जळजळ होणे, श्वास रोखला जाणे, कान बंद होणे अशाही समस्या होतात. अशावेळी वेळेवर काय काळजी घ्यायची असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आम्ही काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत._

*_🤔फटाक्यांनी जळाल्यावर काय करावे?_*
1) जळणंही दोन प्रकारचं असतं, एक असतं सुपरफिशल बर्न म्हणजे अशाप्रकारे जळाल्यावर वेदना होतात आणि जळाल्याचा चट्टा उमटतो. दुसरं असतं डीप बर्न यात शरीराचा जळालेला भाग सुन्न होतो. जर जळालेल्या जागेवर वेदना होत असतील तर समजा की, स्थिती गंभीर आहे. अशावेळी जळालेल्या भागावर पाण्याची धार सोडा. याने वेदनाही कमी होतील आणि चट्टेही पडणार नाही.

२) जळालेल्या भागावर बरनॉल लावू नका. त्याऐवजी ऑलिव ऑईल लावा. त्यानंतरही जर वेदना होतच असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवा.

३) अनेकदा लोक फटाक्याने जळाल्यावर बरनॉल, निळं औषध, शाई, पेट्रोल हे लावतात. याने त्यावेळेपुरत्या वेदना थांबतात. पण याने जखमेवर रंग लागतो आणि याने समस्या वाढूही शकते.

४) जखम झालेल्या भागावर थंड पाणी टाका. तसेच पाण्याच्या भांड्यात जखम झालेला भाग धरा.

५) जळालेला भाग वेदना कमी होईपर्यंत कमीत कमी १५ मिनिटे पाण्यात ठेवायला पाहिजे. तसेच एखादा स्वच्छ कापड भिजवूनही तुम्ही जखमेवर लावू शकता. पण कापडाने जखम घासू नका.

६) फटाक्याने शरीराचा एखादा भाग जास्तच जळाला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. याबाबत दुर्लक्ष करु नका. डॉक्टरकडे जाताना जखमेवर ओला कपडा ठेवू शकता.

*_🤔जळाल्यावर काय करुन नये?_*
१) फटाक्याने त्वचा जळाल्यावर अनेकजण बर्फ लावतात. बर्फाने जळजळ कमी होईल पण याने त्या जागेवरील रक्त गोठण्याची शक्यता असते. याने तुमचां रक्तसंचार कमी होऊ शकतो. त्यामुळे बर्फाचा वापर टाळावा.

२) कधीही जळालेल्या जागेवर कापसाचा वापर करु नका. कापूस त्वचेवर चिकटू शकतो, याने तुम्हाला आणखी जळजळ होऊ शकते. यासोबतच बॅक्टेरिया वाढण्याचीही शक्यता असते.

३) जळालेल्या जागेवर तूप किंवा मलम लगेच लावणे टाळा आणि पुरळ आल्यावर त्या फोडण्याची चूकही करु नका. याने संक्रमण पसरु शकतं आणि त्रास वाढू शकतो.

४) जास्त जळालं असेल तर घरीच उपचार करण्याऐवजी वेळीच रुग्णालयात जावे. जळालेल्या जागेवर एखादा कापड चिकटलेला असेल तर काढू नका.

५) बटर, पीठ किंवा बेकिंग सोडा आगीवर कधीही टाकू नका.

६) क्रीम, लोशन किंवा तेलाचा ट्रिटमेंट म्हणून कधीही वापर करु नये.

७) जखम कधीही खाजवू नका किंवा त्यावरी मास काढू नका.
खालील उत्तर वरून
फटाक्याने त्वचा जळाली तर काय करावे?
फटाके उडवताना कोणती काळजी घ्याल?
💥

*🎇फटाके उडवतांना घ्या ही काळजी!*
-----------------------------^-------

दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

*👉फटाके उडवितांना ही काळजी घ्या -*

# फटाके उडविण्यासाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा.

# फटाके उडवितांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत.

# गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेलं असतं. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात.

# विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळा.

# मोठा आवाज होणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभेचे आणि आसमंत उजळून टाकणारे फटाके वापरा.

# सुरसुऱ्या, फुलभाज्या विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या. त्या इतरत्र टाकल्यास इतर कुणाचा पाय पडून भाजण्याची शक्यता असते.

*👉जर फटाके उडवतांना काही दुर्घटना घडलीच तर हे उपाय करा -*

# दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा.

# भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा.

# जर जखम गंभीर स्वरूपाची असेल तर घरगुती उपाय करण्याच्या फंदात न पडता दवाखाण्यात जावं.

# जर कुठे आग लागली असेल तर ती विझविण्यासाठी जाड पोते अथवा जाड चादरीचा वापर करावा.
_________________________________
*🔹🔥भाजल्यानंतरचे करावयाचे प्रथम उपचार🔹*

गंभीररीत्या भाजलेल्या अथवा जळालेल्या   रुग्णाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. ज्या पदार्थामुळे त्वचा भाजत  आहे. अशा पदार्थापासून रुग्णाला वेगळे करणे आवश्यक असते. त्याला पण कॉन्टॅक्ट टाईम असे म्हणतो. तो कमी होणे हा प्रथम उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. तू वेळ जितका कमी असेल तितकी त्वचेची इजा व जखमींची खोली कमी होते‌‌.

*▪भाजल्यावर करायचे उपचार▪*

▪१) भाजलेल्या जागी भरपूर पाणी टाकावे.
▪२) जर रासायनिक कार्बन असेल तर ते रसायन पाण्याने धुऊन काढावे.
▪३) श्वसन‌‌कार्य नीट राहिल हे बघणे महत्त्वाचे आहे. श्वास क्रिया बंद पडल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा.
▪४) थंड पाणी किंवा बर्फ लावणे यालाही काही हरकत नाही. कारण त्यामुळे तापमानने होणारा त्वचेचा दाह कमी होऊ शकतो
▪५) भाजलेल्या वरचा मलम असेल तर तो भाजलेल्या जागी लावावा.
▪६) रुग्णाला ब्लॅंकेट लपेटा आणि वैद्यकीय सहाय्यता मिळेल यासाठी प्रयत्न करा
▪७) रुग्णाला वैद्यकीय सहाय्यता     मिळावी यासाठी तातडीने रुग्णवाहिका बोलवावी
उत्तर लिहिले · 7/11/2018
कर्म · 569245
3
फटाक्याने भाजले तर काय कराल



दिवाळीचा सण हा आनंदाचा आणि दीपोत्सवाने साजरा करण्याचा आहे. असुरक्षित फटाके फोडल्याने हजारो लोक दरवर्षी जखमी होतात. त्यापासून दूर राहा. मात्र दुर्घटना घडलीच तर योग्य उपचार करा. भाजलेला भाग पहिल्यांदा पाण्याखाली धरा.

फटाकेमुक्त दिवाळीचा संदेश दिला जात असला तरी अनेकजण मोठ्या उत्साहात फटाके फोडतात. हजारो दुर्घटना घडतात. त्यावर काय उपाय योजावेत, फटाक्यामुळे भाजूच नये याची काळयी घ्या. त्यासाठी प्रत्यक्ष हाताने फटाक्याची वात पेटवू नका. त्यासाठी काठीचा आधार घ्या. फटाका पेटल्यानंतर दूर अंतरावर थांबा. फटाके माती, वाळू, खडी व मुरुम असलेल्या ठिकाणी फोडू नयेत. तिथे स्फोट होऊन ती खडी, मुरुम उडून चेहऱ्यावर इजा होऊ शकते. लहान मुलांसोबत तिथे मोठ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे.

असुरक्षित फटाके फोडल्याने शरिराच्या कोणत्या भागाला जास्त इजा होते?
हात व चेहऱ्याला इजा अधिक होते. अनेकांचा हात निकामी होतो. चेहºयावर खडे उडून डोळ्यात ते जातात. अनेकांना अंधत्व येण्याची शक्यता असते. अनावधानाने भाजलेच तर काय उपचार करावेत? या संदर्भात डॉ. लहाने म्हणाले, भाजलेला भाग वाहत्या पाण्याखाली धरा किंवा स्वच्छ बकेटात पाणी घेऊन त्यात ठेवावा. चेहºयावर भाजले असेल तर स्वच्छ टॉवेल थपित ओला करून तो चेहºयावर ठेवावा. ही प्रक्रिया ३० मिनिटे करावी. कारण जेव्हा भाजते, तेव्हा आपल्या चामडीतील कोलॅजन नावाचा घटक पेट घेत असतो. तसेच भाजलेल्या भागात खूप आग पडलेली असते. ती आग पूर्णपणे थांबेपर्यंत पाणी ओतण्याची व पाण्यात हात ठेवण्याची किंवा थपथपीत ओला टॉवेल भाजलेल्या भागावर ठेवण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. ज्यामुळे भाजलेली जखम खोलवर जात नाही. जखम लवकर भरली, तर डागही लवकर भरतात. अन्यथा जखम भरण्यास वेळ लागतो. डाग पडतात, व्यंग येते.


अनेकजण भाजलेल्या भागावर पाणी टाकले की फोड येते म्हणतात काय करावे, या प्रश्नावर ते म्हणाले, फोड येणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते फोड येणे म्हणजे जखम भरण्याची योग्य प्रक्रिया असते. केवळ ते फोड फोडू नये. जर एखादा फोड मोठा झाला, त्यावरची चामडी खूप पातळ झाली, तर फोडाच्या एका बाजूने स्टराईल निडलचा वापर करून त्यातील पाणी काढावे. भाजलेला भाग उघडा ठेवू नये. त्यावर ड्रेसिंग करणे आवश्यक असते. ज्यामुळे इन्फेक्शन टळते असे सांगत डॉ. लहाने म्हणाले, भाजल्यापासून सहा तासांच्या आत पट्टी केली तर जखम लवकर भरते.

भाजलेल्या भागावर टूथपेस्ट, मेंदी, शाई, मिरची पावडर लावणे असे अघोरी प्रकार घडतात. मुळात त्यामुळे इन्फेक्शन वाढते. मिरची पावडर लावणे आणि फोड येणे याचा काहीही संबंध नाही. प्रबोधन केल्याने फटाक्याने गंभीर भाजण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, किरकोळ प्रकार सुरूच आहेत. ज्यामुळे दिवाळ सणाच्या उत्साहात अनेकांना त्रास सोसावा लागतो. फटाक्याचे व्रण पडतात, पण त्यावर प्रथमोपचार म्हणजेच पाणी टाकणे तर व्रण कायम राहण्याची शक्यता कमी होते.
उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 10670
0

फटाक्याने भाजल्यास खालील उपाययोजना कराव्यात:

  1. जळलेली जागा थंड पाण्याने धुवा: भाजलेली जागा कमीतकमी 10 ते 20 मिनिटे थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला होणारी जळजळ कमी होईल.
  2. बर्फ लावा: भाजलेल्या जागेवर बर्फ लावल्यास आराम मिळतो. बर्फ थेट त्वचेवर लावू नका, तो एका स्वच्छ কাপड्यामध्ये गुंडाळून लावा.
  3. जखमेवर अँटीसेप्टिक क्रीम लावा: भाजलेल्या जागेवर अँटीसेप्टिक क्रीम लावा.
  4. पट्ट बांधा: जखमेवर sterile पट्टी बांधा.
  5. डॉक्टरांना दाखवा: जर भाजलेले गंभीर असेल, तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

घ्यावयाची काळजी:

  • जखमेवर तेल किंवा बटर लावू नका.
  • फोड़ आले असल्यास ते फोडू नका.

Disclaimer:

येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1200

Related Questions

कुत्रा चावल्यावर काय खावे?
रुग्ण किंवा जखमी व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सीपीए ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे का?
विषारी साप चावल्यास कोणती लस द्यावी लागते?
जखम झाल्यास काय करावे?
पशु प्रथमोपचार कसे करावे?
नाजूक मांसपेशींच्या दुखापतीमध्ये प्रथमोपचार कसे करावे?
तुमच्या मित्राला कुत्रा चावल्याचे तुम्ही पाहिल्यास काय कराल?