2 उत्तरे
2 answers

वसुबारस म्हणजे काय?

6
*जाणून घेऊया दिवाळीच्या सणामधील धनत्रयोदशी व वसुबारसेचे महत्त्व*
  _______________________
*✨दिवाळी व वसुबारसेच्या सर्व 'जनरल नॉलेज ग्रुप' वाचकांना हार्दिक शुभेच्छा...*

_दिवाळी सणाला दीपावली, दिव्यांचा उत्सव, दीपोत्सव, दिवाळसण अशा नावांनीही ओळखले जाते. दिवाळी हा साधारण पाच दिवस साजरा केला जाणारा सण. या सणाची सुरुवात होते ती वसुबारसेपासून. म्हणूनच जाणून घेऊया दिवाळीच्या सणामध्ये वसुबारसेचे महत्त्व काय आहे?_
*♦ वसुबारस (गोवत्सद्वादशी) महत्व*

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

▫दिवाळी सणाचा हा पहिलाच दिवस असल्याने अंगणात सडासंमार्जन, रांगोळी घातली जाते.

👉 खरे तर वसु बारस याचा साधा आणि सरळ सरळ अर्थ म्हणजे धनांची बारस.

▪वसु म्हणजे धन ज्याला आपण द्रव्य असेही म्हणतो आणि बारस म्हणजे द्वादशी. यावरुनच नाव पडले वसु बारस.

👉 या दिवसाला गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखले जाते.

▪या सणामध्ये कृषीप्रधान भारताचे प्रतिबिंब पडल्याचे पहायला मिळते.

🙏या दिवशी संध्याकाळी गाई आणि पाडसाची पूजा घरामध्ये धनधान्य, संपत्ती आणि लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी केली जाते. 

▫ज्यांच्या घरी गुरे, वासरे, गाई असतात ती मंडळी गाईची पूजा करतात. सोबत इतर गुरांनाही पुरणपोळीचा नैव्यद्य दाखवतात.
: 🐄 _*गोमाता पूजनाने दिवाळीची सुरुवात, वसुबारस !*_

🎆 _महाराष्ट्रातल्या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस._

👉 आज गाय, बैल, म्हैस या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गाय-बैलांना न्हाऊ-माखू घालून छान सजवले जाते आणि मग त्यांचे औक्षण करून गोडधोड खायला दिले जाते.

🤔 _*वसुबारस म्हणजे काय?*_ : वसुबारसेला गोवत्सद्वादशी असेही म्हटले जाते. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून ही पूजा केली जाते.


उत्तर ->  *♦धनत्रयोदशी महत्व* ​ *वसुबारस महत्त्व*
https://www.uttar.co/answer/5db286c1b05e3e5f71f816a9
*♦धनत्रयोदशी महत्व*

  *धनत्रयोदशी : कथा व सांस्कृतिक महत्व!

  *धनत्रयोदशी :* धनत्रयोदशी, हा दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

_आज आपण याचं धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत…_

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.


*धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे*

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो.
उत्तर लिहिले · 4/11/2018
कर्म · 569245
0
वसुबारस हा सण भारतात विशेषतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. हा सण दिवाळीच्या पर्वाला सुरुवात करतो.

अर्थ:

  • 'वसु' म्हणजे गाय आणि 'बारस' म्हणजे द्वादशी, त्यामुळे वसुबारस म्हणजे गाय आणि वासरांची पूजा करण्याचा दिवस.

कधी असतो:

  • हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण द्वादशीला असतो.

कसा साजरा करतात:

  • या दिवशी गाय आणि वासरांची पूजा करतात.
  • त्यांना गोड नैवेद्य दाखवतात.
  • घरातील स्त्रिया गायीची आरती करतात.
  • काही ठिकाणी या दिवशी उपवास करतात.

महत्व:

  • भारतीय संस्कृतीत गायीला महत्वाचे स्थान आहे. तिला 'माता' मानले जाते.
  • वसुबारस हा दिवस गाय आणि वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
  • या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

इतर माहिती:

  • हा सण 'गोवत्स द्वादशी' म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080

Related Questions

पारशी धर्माचे लोक कोणते सण साजरे करतात?
पारशी धर्माचे लोक कोणकोणते सण उत्सव साजरे करतात?
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?
मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?
दिवाळी सण कोणत्या महिन्यात येतो?
तुम्ही अनुभवलेले चैत्र तुमच्या शब्दात वर्णन करा?