6

*दिवाळी*
*धनत्रयोदशी :* धनत्रयोदशी, हा दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

_आज आपण याचं धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत…_

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.


*धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे*

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो.
_______________

उत्तर ->  *जाणून घेऊया दिवाळीच्या सणामधील धनत्रयोदशी व वसुबारसेचे महत्त्व*
https://www.uttar.co/answer/5bdf04f0abd3f458f954cbfd
_______________________
*♦ वसुबारस (गोवत्सद्वादशी) महत्व*



आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
___________________
*♦नरक चतुर्दशी कथा*

_*नरक चतुर्दशी : कथा व सांस्कृतिक महत्व*_

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच अश्विन कृष्ण महिन्याच्या चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणे लावतात त्यानंतर संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.


नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे, तेलाचे मर्दन लाऊन स्नान केले जाते, त्यास अभ्यंगस्नान असे म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे, असेही मानतात.

  📌  *कथा-:* नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका खूप प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते, असे मानतात.पुराणानुसार नरकासुर हा एक प्रसिद्ध असुर होता, ज्याला पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न विष्णुपुत्र म्हणून ओळखल्या जायचे. हा वराह अवतार वेळी जन्मला होता, जेव्हा विष्णूने पृथ्वीचा उद्धार केला होता.

जेव्हा लंकापती रावणाचा वध झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला, नरकासुराचा जन्म त्याचं स्थानी झाला होता जिथे जानकी म्हणजेच सीतेचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर १६ वर्षांचा होत पर्यंत त्याच पालन पोषण केलं. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णूजवळ घेऊन गेली आणि मग विष्णूने त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले. नरकासुर हा मथुरेच्या राजा कंस याचा असुर मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याची त्याचा विवाह झाला, त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दुर्भेथ रथ दिला.काही दिवसांपर्यंत तर नरकासुर व्यवस्थितपणे राज्याचा कारभार सांभाळत होता. पण बाणासुराच्या संगतीत पडून तो दुष्ट झाला. त्यामुळे वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा शाप दिला.

या श्रापापासून वाचण्याकरिता एकदा नरकासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व ‘अवध्यत्वा’चा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्र देखील बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना त्रासदायक झाला होता.

💁‍♂ *असे करा लक्ष्मी पूजन व नरक चतुर्दशी साजरी*

⚡ प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते. त्या काळापासून दिवाळी सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. दिवाळीत अश्व‌िन वद्य चतुर्दशी अर्थात, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे.

👉 *अभ्यंगस्नान म्हणजे?*  सूर्योदयापूर्वी उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान होय.

👀 *नरक चतुर्दशी का साजरी करतात?*
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा या दिवशी वध करून मानवजातीला राक्षसी वृत्तींच्या बंधनातून मुक्त केले होते. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.

💡 *दीपदानाचे महत्त्व*
या दिवशी दीपदान करण्याची (पणती लावण्याची) प्रथा आहे. पणती हे अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे आण‌ि तेज, समृध्द‌ी यांचे प्रत‌ीक असल्याने दीपदानाचे महत्त्व आहे.

✔ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करुन, घरासमोर रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून लक्ष्मीपूजन केले जाते.

🧐 *अशी करा पूजा*  लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.
____________
♦ *बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा माहिती आणि कथा*

अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

🌺  _*का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? कोठे कसा साजरा होतो पाडवा?*_

आज दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा दिवस. सर्वत्र दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा साजरी केली जाते. हा सण नेमका काय आहे? कोठे कसा साजरा केला जातो? काय आहे परंपरा? जाणून घेऊयात.

🎊 *दिवाळी पाडवा का साजरा केला जातो?*


⚡ अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो...


*कथा: :* बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा व‌ख्यिात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरविण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिपले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणिन पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा श‌ल्लिक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला, की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.

*इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो...*

🙏 *बळीचे राज्य येवो...*
पाडव्याला रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.

📚 *व्यापाऱ्यांसाठी नववर्ष*
पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्षाचा प्रारंभ करतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात.

🎯 *दिवाळी सण*
पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळी सण म्हणतात.
पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

👏🏻 *बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा* :

▪ नागरी जीवनात पाडव्याला पत्नीने पतीला उटणे लावून, तेलाने मसाज करून स्नान घालण्याला आणि औक्षण करण्याला महत्त्व आहे.

▪ औक्षण केल्यानंतर पती पत्नीला प्रेमभेट देतो. असे असले तरी, हा सण मुळात अनागर संस्कृतीतून, कृषीसंस्कृतीतून फुललेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो.

▪ शेतकरी आज घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते.

🤔 *कोठे कसा साजरा केला जातो?*

▪ *कोकणात*

आज गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते.

▪ *मराठवाड्यात*

गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.

▪ *ठाणे-रायगड*

आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी, अशी यावेळी प्रार्थना केली जाते.

▪ *धनगर समाजात*

हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे, असा देखावा तयार करतात.

▪ *आदिवासी समाज*

आपल्या गुरांच्या-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार केलेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय

▪ बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला आदिवासी 'ढोर उठवणे' असे म्हणतात.

⚡ *गोवर्धन पूजा* :

दिवाळीचा हा चौथा दिवस `वर्ष प्रतिपदा` म्हणूनही जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

_*🏮 काय आहे भाऊबीज? जाणून घेऊ या सणाविषयी*_


⚡ दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज, कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले आहे. अशी कथा प्रचलित आहे.

भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना(यमी) हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की, या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.


दिवाळीतला आणखी एक महत्त्वाचा सण. भाऊबीज आज सर्वत्र साजरा होतोय. महाराष्ट्रातच नव्हे तर, उत्तर भारतातही हा सण साजरा केला जातो. त्याला भाई दूज असं म्हटलं जातं.

*👫 भाऊबीज :*

▪ कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितिया असेही म्हटले जाते.

▪ द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो`, अशी यामागची भावना आहे.

▪ आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरिता हा भाऊबीजेच्या सण.

▪  बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिन. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो.

▪  भाऊ ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो.

📍 जैन धर्माच्या काही विशिष्ट समाजांत फक्त भावाकडूनच ओवाळणी `वसूल` केली जात नाही तर, बहीणही भावाला आणि वहिनीलाही भेटवस्तू देत असते.

▪  एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे.

*🤔 काय कराल? कसे कराल?*

*🎯 अशी करा भाऊबीज साजरी*

◼या दिवशी भावाला तेल-उटणे लावून आंघोळ घालावी.
◼बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
◼ भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.
◼भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.
▪ भाऊबीजला बंधूना पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे. पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी. तसेच समोर दीप तेवता असावा.

▪ बहिणीने बंधूंच्या कपाळी टिळा लावून त्याना ओवाळावे.

▪ त्यानंतर बहिणीने भावाच्या हातावर लाल-पिवळा धागा बांधावा.

▪ त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा.

▪ भावाने बहिणीला चरणस्पर्श करुन तिचा आशीर्वाद घ्यावा आणि तिला भेटवस्तू द्यावी.

♦ *भाऊबीज : सांस्कृतिक महत्व आणि कथा*

भाऊबीजचा टिळक पुजनाचा मुहूर्त - 01:00 ते 03:11 वाजेपर्यंत


*भाऊबीजेची कथा-* यमद्वितीयेला यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला वेगळं महत्व आहे.
एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असं केल्यास अपमृत्यु येत नाही.

*विधी-*
अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।` असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा.
भाऊबीजला बहिनीने भावाला टिळा लावून त्याला ओवाळावे.त्यानंतर बहिणीने भावाच्या हाताला लाल-पिवळा धागा बांधावा.त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा. भावाने बहिणीचे चरण स्पर्श करुन तिचा आशिर्वाद घ्यावा आणि तिला भेटवस्तू द्यावी.

*भाऊबीजे निमित्त ओवाळणीत चुकूनही देऊ नका ह्या '3' गोष्टी ज्या मानल्या जातात अशुभ*

💫 भाऊ बहिणीचे नातं हे इतकं पवित्र आणि निरागस नातं आहे ज्यात प्रेम, माया, भांडण, राग-रुसवा ह्या सर्व गोष्टी येतात. हे नातं शब्दांत कधीच व्यक्त होत नाही. कारण हे नाते शब्दांच्या पलीकडचे असते.

✨ अशा या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या सणानिमित्त बहिणी आपल्या भावाचे कर्तृत्व, दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी यमाकडे प्रार्थना करतात. या दिवशी बहिणी भावाला औक्षण करून त्याच्या भाळी गंधाचा टिळा लावतात.

⚡ त्यानंतर देवाजवळ त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी बहिणीसोबत भावालाही ओवाळणी दिली जाते.रक्षाबंधन असो वा भाऊबीज बहिणीला दोन्ही सणाला ओवाळणी मिळतेच किंबहुना बहिणी घेतातच.

💥 मात्र भावाला भाऊबीजेदिवशी ओवाळणी मिळते. या ओवाळणीत भावाला किंवा बहिणीला जी भेटवस्तू दिली जाते, त्यात चुकूनही पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश नसावा असा सल्ला विवेक वैद्य गुरुजी यांनी लेटेस्टली मराठीशी बोलताना सांगितला आहे. या गोष्टी या सणादिवशी अशुभ मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी:

*1.* भाऊबीजेला ओवाळणीत काळ्या रंगाचे वस्तू विशेषत: कपडे भेटवस्तू म्हणून देऊ नये.

*2.* तसेच ओवाळणीच्या शुभमुहूर्ता दरम्यान किंबहुना संपूर्ण दिवस भावाला किंवा बहिणीला टोमणे अथवा अपशब्द वापरू नये. तसेच इतरांविषयी वाईट बोलू नये.

*3.* भेटवस्तू म्हणून देवघरात ठेवण्यासाठी देवाची मूर्ती अथवा फोटो देऊ नये.
भाऊबीज हा सण स्नेहाचा, आपुलकीचा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक भावंडांमध्ये प्रेम असते मात्र ते कधीही एकमेकांसमोर व्यक्त केले जात नाही. असे हे अव्यक्त प्रेम दिसते बहिणीच्या पाठवणीवेळी. त्यामुळे हे भावा-बहिणींमधील हे अव्यक्त प्रेम असेच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
उत्तर लिहिले · 25/10/2019
कर्म · 569245