2 उत्तरे
2 answers

सन्यस्त व्हायचं आहे?

13
थांबा थांबा, घाई करू नका.. खूप मोठा निर्णय आहे हा, असा सहज घेऊ नका. माझं हे उत्तर पूर्ण आणि शांतपणे वाचा कारण मी पण सन्यस्थ व्हायचं ठरवले होते पण झालो नाहीय.

आपल्या मनात संन्यास घ्यायचा आहे म्हणजे अशी इमेज बनलेली असते की ना घरच टेन्शन, ना नौकरीचे ना जगाचे ना संसाराचे. 
संकट, प्रॉब्लेम किंवा झालेला गुंता सोडवायचे दोन मार्ग असतात. एक त्यांना सोडवा, दुसरा त्यांना नका सोडवू असच पडून राहू द्या, वेळ आपोआप सोडवेल. एक म्हणजे करायचं दुसरं काही नाही करायचं - वांगडू 
आपल्यापैकी प्रत्येक जण हाच विचार करतो की ह्याला सोडवावंच लागेल की नाही, आणि जस आपल्याला वाटतं की नाही सोडवले तरी चालेल आपण त्यांना तसेच राहू देतो.

उदारणार्थ : घरचे शिक्षणाला, व्यवसायाला पैसे देत नाहीय, बायको सततची चिडचिड करते, कामातले सहकारी लोक मदत करत नाही उलट उपयोग करून घेताय, घेतलेलं कर्ज काही कमी होत नाहीय, माझं वजन काही कमी होत नाहीय इत्यादी...

आता ह्या क्षणाला आपल्याकडे असे बरेच प्रॉब्लेम असतील ज्यांना आपण एक बॅनर लावून दिलाय "कधी न सुटणारे प्रश्न" आणि त्याच टेन्शन घेऊन आपण जीवन जगतोय. आपण शांत बसून कधीच विचार केला नाहीय "हे प्रश्न खरंच सुटतील तरी का ? कि मी असच ह्यांचं टेन्शन घेऊन देवाघरी जाईल.." तीच सततची किटकिट, पिरपिर ऐकून, पाहून, जगून आपण कंटाळतो आणि मग कालांतराने आपल्याला हे सगळं नकोस वाटत आणि मग आपल्याला असं सारखं वाटत "एकदाच सोडून जावं कुठेतरी जंगलात, मस्त संन्यास घ्यावा आपले आपले मस्त आयुष्य जगावे.." हो की नाही ???

थांबा आणि प्रॉब्लेम च मूळ कुठंय ते पहा..
गोष्टी सगळ्या सिम्पल असतात, गुंता वाढवतो आपण. जर गुंता आपण वाढवू शकतो तर त्यांचं उत्तर हि आपणच सोडवू शकतो. ते संकट, ते टेन्शन सगळं ते डोक्यात आहे, बाहेरच्या जगात नाही. जर बाहेर राहिले असते तर तुम्हाला नाही सगळ्यांना त्याचा त्रास झाला असता.
संन्यास म्हणजे काय सगळे सोडणे होय ना ? पण आपल्याला हे समजत नाही आपण जे काही सोडतोय ते शारीरिक पातळीवर सुटेल, मानसिक पातळीवर नाही. 

आपण घर, समाज, मुलं, नोकरी सोडणार पण ते सगळं भौतिक स्तरावर फिजीकली ना.. मेंटली तुमचे टेन्शन तर तसेच राहील त्याच काय? तुम्ही बाहेरून सगळं सोडणार पण ते कुर्तडनार, आतून पोखरणार, खाणार मन त्याला कसं सोडणार. तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुमचं मन जंगलात गेल्यावर किंवा सगळं सोडून दिल्यावर शांत होईल तर माफ करा असं होऊ शकत नाही. उलट त्याचा गोंधळ वाढेल कारण एकांतात आपले मन शांत होण्याऐवजी आकांत जास्त करते.

आणि तुम्हाला कोणी सांगिलते आश्रमातले लोक छान शांत असतात. नाही तस नाही आतले आणि बाहेरचे कॉन्फ्लिक्ट(Conflict = गुंता) सोडवण्यासाठी मनाची शांतात आणि ज्ञान हवे असते. "प्रॉब्लेम जीवन जगताना घरात, नात्यात असताना, काम करताना  झालाय ना तर तो सॉल्व पण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्या भोवती असणार.."

जेव्हा माझं ब्रेकअप झालं होत तेव्हा मी जिथं राहायचो, जिथं होतो, ती जागा ते गाव मी ह्याच अनुषंगाने सोडलेलं की आपण सुटू ह्यातून, शांतात मिळेल.. पण झालं उलटच.. जास्त चुकल्यासारखे, एकटे एकटे वाटायला लागले. म्हणून हे सत्य नीट समझून घ्या "गोष्टी फिजिकली सहज सुटतात परंतु मेंटली सुटत नाही".   

आणि खऱ्या प्रॉब्लेम्स पहिले मेंटली सुटल्या पाहिजेत तरच त्या आजूबाजूला सुटतील. म्हणून संन्यास घेतल्याने प्रॉब्लेम सुटत नाही, त्या तसेच राहतात. कारण सन्यस्त होऊन आपण सगळ्या गोष्टीचा त्याग वरवरुनच केलेला असतो, आत मध्ये ते तसेच असते. आणि आतमधले सगळे सॉर्ट आऊट करावयास सन्यास गरजेचं अजिबात नाही.

मुलांनी काय चूक केलीय? त्यांना कोण सांभाळेल?
बायको ची काय बस एवढीच चूक आहे की ती राग करतेय?
आई वडिलांना तुम्ही गेल्यावर कोण सांभाळेल.. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाहीय त्यात त्यांचा काय दोष ?

नीट बसून विचार करा आणि लक्षात घ्या.."सगळं डोक्यात आहे, उत्तर पण.. तिथून प्रॉब्लेम कसा काढायचं ह्यावर आपण बोललं पाहिजे ना की सगळं सोडू कसं ह्यावर.."

आणि शेवटचं म्हणजे.. आपल्या संस्कृतीत पण संन्यासाश्रम सर्वांत शेवटी येतो, असं कुठे मधेच नाही..
मी पळून पाहिलंय.. काही उपयोगाचं नाही. परत तिथंच आलो होतो जिथून गेलो होतो सगळं सोडून. एका ठिकाणी बसा, सारासार विचार करा, सगळी उत्तर आपल्या आत आहे. - वांगडू 

@फुंसुख वांगडु 
उत्तर लिहिले · 25/10/2018
कर्म · 75305
0

सन्यस्त होणे म्हणजे सांसारिक जीवन त्यागून संन्यासाश्रमात प्रवेश करणे. हिंदू धर्मात संन्यास हा जीवनाचा अंतिम टप्पा मानला जातो. संन्यास स्वीकारल्याने माणूस सर्व सांसारिक बंधनांपासून मुक्त होतो आणि त्याचे ध्येय मोक्ष प्राप्त करणे असते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

साई बाबांचा जन्म कुठे झाला आहे?
किती दान करावे? कमाईचा कितवा भाग दान करावा?
शेवटी माणूस काय नेतो?
देवळातील देवाला महत्त्व असते की मनातील भावाला जास्त महत्त्व असते?
जीवन हे दशदिशांना विभागले आहे?
अर्थ आणि कर्म ह्या विषयी समुपदेश हवा आहे?
बाबांनी पृथ्वीवरचा खरा देव कोणाला म्हटले आहे?