Topic icon

संन्यास

13
थांबा थांबा, घाई करू नका.. खूप मोठा निर्णय आहे हा, असा सहज घेऊ नका. माझं हे उत्तर पूर्ण आणि शांतपणे वाचा कारण मी पण सन्यस्थ व्हायचं ठरवले होते पण झालो नाहीय.

आपल्या मनात संन्यास घ्यायचा आहे म्हणजे अशी इमेज बनलेली असते की ना घरच टेन्शन, ना नौकरीचे ना जगाचे ना संसाराचे. 
संकट, प्रॉब्लेम किंवा झालेला गुंता सोडवायचे दोन मार्ग असतात. एक त्यांना सोडवा, दुसरा त्यांना नका सोडवू असच पडून राहू द्या, वेळ आपोआप सोडवेल. एक म्हणजे करायचं दुसरं काही नाही करायचं - वांगडू 
आपल्यापैकी प्रत्येक जण हाच विचार करतो की ह्याला सोडवावंच लागेल की नाही, आणि जस आपल्याला वाटतं की नाही सोडवले तरी चालेल आपण त्यांना तसेच राहू देतो.

उदारणार्थ : घरचे शिक्षणाला, व्यवसायाला पैसे देत नाहीय, बायको सततची चिडचिड करते, कामातले सहकारी लोक मदत करत नाही उलट उपयोग करून घेताय, घेतलेलं कर्ज काही कमी होत नाहीय, माझं वजन काही कमी होत नाहीय इत्यादी...

आता ह्या क्षणाला आपल्याकडे असे बरेच प्रॉब्लेम असतील ज्यांना आपण एक बॅनर लावून दिलाय "कधी न सुटणारे प्रश्न" आणि त्याच टेन्शन घेऊन आपण जीवन जगतोय. आपण शांत बसून कधीच विचार केला नाहीय "हे प्रश्न खरंच सुटतील तरी का ? कि मी असच ह्यांचं टेन्शन घेऊन देवाघरी जाईल.." तीच सततची किटकिट, पिरपिर ऐकून, पाहून, जगून आपण कंटाळतो आणि मग कालांतराने आपल्याला हे सगळं नकोस वाटत आणि मग आपल्याला असं सारखं वाटत "एकदाच सोडून जावं कुठेतरी जंगलात, मस्त संन्यास घ्यावा आपले आपले मस्त आयुष्य जगावे.." हो की नाही ???

थांबा आणि प्रॉब्लेम च मूळ कुठंय ते पहा..
गोष्टी सगळ्या सिम्पल असतात, गुंता वाढवतो आपण. जर गुंता आपण वाढवू शकतो तर त्यांचं उत्तर हि आपणच सोडवू शकतो. ते संकट, ते टेन्शन सगळं ते डोक्यात आहे, बाहेरच्या जगात नाही. जर बाहेर राहिले असते तर तुम्हाला नाही सगळ्यांना त्याचा त्रास झाला असता.
संन्यास म्हणजे काय सगळे सोडणे होय ना ? पण आपल्याला हे समजत नाही आपण जे काही सोडतोय ते शारीरिक पातळीवर सुटेल, मानसिक पातळीवर नाही. 

आपण घर, समाज, मुलं, नोकरी सोडणार पण ते सगळं भौतिक स्तरावर फिजीकली ना.. मेंटली तुमचे टेन्शन तर तसेच राहील त्याच काय? तुम्ही बाहेरून सगळं सोडणार पण ते कुर्तडनार, आतून पोखरणार, खाणार मन त्याला कसं सोडणार. तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुमचं मन जंगलात गेल्यावर किंवा सगळं सोडून दिल्यावर शांत होईल तर माफ करा असं होऊ शकत नाही. उलट त्याचा गोंधळ वाढेल कारण एकांतात आपले मन शांत होण्याऐवजी आकांत जास्त करते.

आणि तुम्हाला कोणी सांगिलते आश्रमातले लोक छान शांत असतात. नाही तस नाही आतले आणि बाहेरचे कॉन्फ्लिक्ट(Conflict = गुंता) सोडवण्यासाठी मनाची शांतात आणि ज्ञान हवे असते. "प्रॉब्लेम जीवन जगताना घरात, नात्यात असताना, काम करताना  झालाय ना तर तो सॉल्व पण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्या भोवती असणार.."

जेव्हा माझं ब्रेकअप झालं होत तेव्हा मी जिथं राहायचो, जिथं होतो, ती जागा ते गाव मी ह्याच अनुषंगाने सोडलेलं की आपण सुटू ह्यातून, शांतात मिळेल.. पण झालं उलटच.. जास्त चुकल्यासारखे, एकटे एकटे वाटायला लागले. म्हणून हे सत्य नीट समझून घ्या "गोष्टी फिजिकली सहज सुटतात परंतु मेंटली सुटत नाही".   

आणि खऱ्या प्रॉब्लेम्स पहिले मेंटली सुटल्या पाहिजेत तरच त्या आजूबाजूला सुटतील. म्हणून संन्यास घेतल्याने प्रॉब्लेम सुटत नाही, त्या तसेच राहतात. कारण सन्यस्त होऊन आपण सगळ्या गोष्टीचा त्याग वरवरुनच केलेला असतो, आत मध्ये ते तसेच असते. आणि आतमधले सगळे सॉर्ट आऊट करावयास सन्यास गरजेचं अजिबात नाही.

मुलांनी काय चूक केलीय? त्यांना कोण सांभाळेल?
बायको ची काय बस एवढीच चूक आहे की ती राग करतेय?
आई वडिलांना तुम्ही गेल्यावर कोण सांभाळेल.. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाहीय त्यात त्यांचा काय दोष ?

नीट बसून विचार करा आणि लक्षात घ्या.."सगळं डोक्यात आहे, उत्तर पण.. तिथून प्रॉब्लेम कसा काढायचं ह्यावर आपण बोललं पाहिजे ना की सगळं सोडू कसं ह्यावर.."

आणि शेवटचं म्हणजे.. आपल्या संस्कृतीत पण संन्यासाश्रम सर्वांत शेवटी येतो, असं कुठे मधेच नाही..
मी पळून पाहिलंय.. काही उपयोगाचं नाही. परत तिथंच आलो होतो जिथून गेलो होतो सगळं सोडून. एका ठिकाणी बसा, सारासार विचार करा, सगळी उत्तर आपल्या आत आहे. - वांगडू 

@फुंसुख वांगडु 
उत्तर लिहिले · 25/10/2018
कर्म · 75305
7
बर्‍याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो.

संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं.

कशापासून निवृत्त व्हायचं?
जगापासून.

का निवृत्त व्हायचं?
आत्मशोधासाठी.

पण मग त्यासाठी संन्यास घेतलाच पाहिजे का?
उदाहरणं बघीतलीत तर पद्धतशीर संन्यास न घेताही अनुभव घेतलेली बरीच संतमंडळी होऊन गेली.

मला वाटतं संन्यस्त होणं ही मनाची अवस्था असावी. जी व्यक्ती मनानं संन्यस्त झाली तिला बाहेरच्या अवडंबराची गरज असणार नाही.

कसं व्हायचं असं मनानं संन्यस्त?
प्रथम हे बघायला हवं की तशी आपली खरोखर मनापासून ईच्छा आहे का?
नसली, तर विषय संपला.
असली, तर पुढचा प्रश्न:

आपल्याला खरोखर आत्मशोधाची ईच्छा आहे का?
नसली, तर पुन्हा विषय संपवावा. [कारण जगावरच्या रोषानं वा जगतांना आलेल्या नैराश्यानं किंवा केवळ अनुभवांच्या/चमत्कारांच्या कुतुहलापोटी संन्यास घेण्याच्या मागे लागणं.. ह्यानं नुकसानच जास्त व्हायचं.
एक गोष्ट.. आवडते म्हणून करणं आणि दुसरं काहीच आवडत नाही म्हणून करणं यात शेवटी फरक आहेच ना..]
असली, तर पुन्हा तोच प्रश्न,

कसं व्हायचं असं मनानं संन्यस्त?
मुळात संन्यास म्हणजे विरक्ती. एखादी गोष्ट सोडणं कठीण असतं, ती आपोआप सुटणं त्यापेक्षा सोपं असतं. मन दुसरीकडं पूर्णपणे गुंतलं तर आधीची गोष्ट आपोआपच सुटत जाते. जोवर मनापासून तसं होत नाही, तोवर सर्व जबरदस्तीचा मामला झाला. पण जेव्हा आपल्या ध्येयप्राप्तीची मनापासून ईच्छा असते, तेव्हा बाकीच्या गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं. त्या सोडण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. यालाच वृत्ती स्थिर होणे म्हणतात. हळूहळू आपली वृत्ती स्थिर होत गेली की इतरांच्या वागणुकीचा आपल्याला त्रास कमी व्हायला लागतो. आपल्या इतर गरजा आपोआपच कमी होत जातात. थोडक्यात इतर बाबींचे महत्त्व आपोआपच गौण होत जातं. यालाच मन अंतर्मुख होण्याची पायरी म्हणतात. ज्यावेळेस हे पूर्णपणे साधतं त्यावेळेस एका भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही गोष्टीची आस राहत नाही. ती तळमळ साधली की आपलं काम झालं.

जाताजाता एक विचार आला,
व्यवहारातसुद्धा ध्येयासाठी झपाटून काम करतांना बाकीच्या सर्व गोष्टी आपोआपच गौण होत जातात.. तीही एकप्रकारे संन्यस्त अवस्थाच होय. त्यात सुद्धा जोवर जिवापाड तळमळ येत नाही, तोवर ध्येय मनाजोगतं साध्य होत नाही.
त्यामुळं, ते अध्यात्माच्या दृष्टीनं जाऊं देत पण व्यवहाराच्या दृष्टीनंही.. अशी कोणती मोठी ध्येय मी साध्य केलीत आजतोवर.. अन् जरा गांगरल्यासारखं झालं....

उत्तर लिहिले · 22/10/2018
कर्म · 13485
14
ज्या वेळी व्यक्तीला 'मी कोण आहे', 'हे का आहे', असे प्रश्न पडतात, त्यावेळी एक अवस्था असते की जिथे विज्ञान संपते, तिथे फिलॉसॉफीची सुरुवात होते. त्यावेळी फिलॉसॉफीमध्ये असे आहे की, प्रत्येक हलणारी (ज्या गोष्टीत चेतना आहे) गोष्टीत जी चेतना आहे, ती देव परमेश्वर याचाच अंश आहे. त्या परमेश्वराला बघायचे असेल, तर काही मार्ग आहेत. त्यात संन्यास हा एक मार्गाचा अवलंब हा एक त्यातला छोटा भाग आहे. जवळजवळ सर्वच धर्मातील लोक संन्यास घेतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन धर्मातील असे अध्यात्मिक मार्गातील लोक त्यामुळे संन्यास घेतात. संन्यास म्हणजे केवळ विवाह न करणे असे नसून मोहात न अडकता आपले कर्म करणे असे आहे.
उत्तर लिहिले · 3/9/2017
कर्म · 15400
9
सन्यास घेण्यासाठी राग, लोभ, काम, मद, मत्सर इत्यादी गोष्टींचा त्याग करावा लागतो, व स्वतःच्या इंद्रियावर त्याचा संयम असला पाहिजे.
उत्तर लिहिले · 25/3/2017
कर्म · 1310