2 उत्तरे
2
answers
संन्यास म्हणजे काय आणि कसा?
7
Answer link
बर्याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो.
संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं.
कशापासून निवृत्त व्हायचं?
जगापासून.
का निवृत्त व्हायचं?
आत्मशोधासाठी.
पण मग त्यासाठी संन्यास घेतलाच पाहिजे का?
उदाहरणं बघीतलीत तर पद्धतशीर संन्यास न घेताही अनुभव घेतलेली बरीच संतमंडळी होऊन गेली.
मला वाटतं संन्यस्त होणं ही मनाची अवस्था असावी. जी व्यक्ती मनानं संन्यस्त झाली तिला बाहेरच्या अवडंबराची गरज असणार नाही.
कसं व्हायचं असं मनानं संन्यस्त?
प्रथम हे बघायला हवं की तशी आपली खरोखर मनापासून ईच्छा आहे का?
नसली, तर विषय संपला.
असली, तर पुढचा प्रश्न:
आपल्याला खरोखर आत्मशोधाची ईच्छा आहे का?
नसली, तर पुन्हा विषय संपवावा. [कारण जगावरच्या रोषानं वा जगतांना आलेल्या नैराश्यानं किंवा केवळ अनुभवांच्या/चमत्कारांच्या कुतुहलापोटी संन्यास घेण्याच्या मागे लागणं.. ह्यानं नुकसानच जास्त व्हायचं.
एक गोष्ट.. आवडते म्हणून करणं आणि दुसरं काहीच आवडत नाही म्हणून करणं यात शेवटी फरक आहेच ना..]
असली, तर पुन्हा तोच प्रश्न,
कसं व्हायचं असं मनानं संन्यस्त?
मुळात संन्यास म्हणजे विरक्ती. एखादी गोष्ट सोडणं कठीण असतं, ती आपोआप सुटणं त्यापेक्षा सोपं असतं. मन दुसरीकडं पूर्णपणे गुंतलं तर आधीची गोष्ट आपोआपच सुटत जाते. जोवर मनापासून तसं होत नाही, तोवर सर्व जबरदस्तीचा मामला झाला. पण जेव्हा आपल्या ध्येयप्राप्तीची मनापासून ईच्छा असते, तेव्हा बाकीच्या गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं. त्या सोडण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. यालाच वृत्ती स्थिर होणे म्हणतात. हळूहळू आपली वृत्ती स्थिर होत गेली की इतरांच्या वागणुकीचा आपल्याला त्रास कमी व्हायला लागतो. आपल्या इतर गरजा आपोआपच कमी होत जातात. थोडक्यात इतर बाबींचे महत्त्व आपोआपच गौण होत जातं. यालाच मन अंतर्मुख होण्याची पायरी म्हणतात. ज्यावेळेस हे पूर्णपणे साधतं त्यावेळेस एका भगवंताशिवाय दुसर्या कोणत्याही गोष्टीची आस राहत नाही. ती तळमळ साधली की आपलं काम झालं.
जाताजाता एक विचार आला,
व्यवहारातसुद्धा ध्येयासाठी झपाटून काम करतांना बाकीच्या सर्व गोष्टी आपोआपच गौण होत जातात.. तीही एकप्रकारे संन्यस्त अवस्थाच होय. त्यात सुद्धा जोवर जिवापाड तळमळ येत नाही, तोवर ध्येय मनाजोगतं साध्य होत नाही.
त्यामुळं, ते अध्यात्माच्या दृष्टीनं जाऊं देत पण व्यवहाराच्या दृष्टीनंही.. अशी कोणती मोठी ध्येय मी साध्य केलीत आजतोवर.. अन् जरा गांगरल्यासारखं झालं....

0
Answer link
संन्यास म्हणजे काय:
संन्यास म्हणजे जगाचा त्याग करणे. हे जीवन जगण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये व्यक्ती भौतिक सुख, संबंध आणि सामाजिक जबाबदाऱ्या सोडून एकांतात राहते आणि आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते.
संन्यास हा हिंदू धर्मातील जीवनातील चार आश्रमांपैकी चौथा आश्रम आहे. इतर तीन आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ.
संन्यास कसा घ्यावा:
संन्यास घेणे ही एक गंभीर प्रक्रिया आहे आणि ती योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजे. संन्यास घेण्यापूर्वी व्यक्तीने गृहस्थ जीवनातील आपली सर्व कर्तव्ये पूर्ण केली पाहिजेत.
संन्यास घेण्याची प्रक्रिया:
- तयारी: संन्यास घेण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी करणे आवश्यक आहे. व्यक्तीने जगाचा त्याग करण्यास आणि एका साध्या जीवनशैलीचे पालन करण्यास तयार असले पाहिजे.
- गुरु दीक्षा: योग्य गुरूंकडून दीक्षा घेणे आवश्यक आहे. गुरु आपल्याला संन्यासाच्या मार्गावर मार्गदर्शन करतात.
- अनुष्ठान: संन्यास विधीमध्ये अनेक धार्मिक विधी आणि यज्ञ केले जातात. यात व्यक्ती स्वतःच्या श्राद्धाचे विधी करतात, अग्नीत आहुती देतात आणि जगाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा करतात.
- वस्त्र आणि नाव: संन्यास घेतल्यानंतर, व्यक्तीला भगवी वस्त्रे धारण करावी लागतात आणि नवीन नाव धारण करावे लागते.
- जीवनशैली: संन्यासी एकांतात राहतात, ध्यान आणि योगा करतात आणि आध्यात्मिक अभ्यासात मग्न असतात. ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात आणि समाजाला आध्यात्मिक ज्ञान देतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे पाहू शकता: