Topic icon

ध्यात्म

0

साई बाबांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, कारण त्यांचे जीवन रहस्यमय आहे. त्यांच्या जन्माचे ठिकाण आणि पालकांबद्दल अनेक मतभेद आहेत.

विविध मतानुसार:

  • काही लोकांच्या मते ते पाथरी (Pathri) येथे जन्मले.
  • काहींच्या मते ते शिर्डीजवळ (Shirdi) जन्मले.
  • आणखी काही मतानुसार त्यांचा जन्म तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) झाला.

त्यामुळे साई बाबांचा जन्म नेमका कोठे झाला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2440
0






किती दान करावे? कमाईचा कितवा भाग दान करावा? जाणून घ्या दान करण्याचे 9 नियम




1. माणसाने ईमानदारीने कमावलेल्या पैशांचा एक दशांश भाग चांगल्या कामांसाठी दान करावा. जो माणूस आपल्या पत्नी, मुलगा, किंवा कुटुंबातील इतरांना दुखी करुन दान करतो ते दान जिवंतपणे आणि मृत्यूनंतरही दुख देणारं ठरतं.
 
2. स्वत: जाऊन दिलेले दान उत्तम आणि घरी बोलावून दिलेले दान मध्यम प्रमाणात फलदायी असते. गायी, ब्राह्मण आणि आजारी लोकांना काही दिले जाते, त्या वेळी कोणी आपल्याला देऊ नका असा सल्ला दिला असल्यास दुःख सहन करावे लागतात.
 
3. तीळ, कुश, पाणी आणि तांदूळ यांचे दान हातात घेऊनच करावे, अन्यथा त्या दानावर राक्षसांचा ताबा येतो. पितरांना तिळासोबत, देवांना तांदूळासह दान करावे. पाणी आणि कुश यांचे संबंध सर्वत्र जपले पाहिजे.

 
4. देणाऱ्याने पूर्वेकडे तोंड करून दान द्यावे आणि घेणार्‍याने उत्तरेकडे तोंड करून ते स्वीकारावे, असे केल्याने देणाऱ्याचे आयुष्य वाढते आणि घेणार्‍याची आयु क्षीण होत नाही.
 
5. अन्न, पाणी, घोडा, गाय, वस्त्र, पलंग, छत्र आणि आसन या 8 वस्तूंचे दान केल्याने मृत्यूनंतरचे दुःख नष्ट होते.
 
6. गाय, घर, कपडे, पलंग आणि मुलगी एकाच व्यक्तीला दान करावी. आजारी लोकांची सेवा करणे, देवतांची पूजा करणे, ब्राह्मणांचे पाय धुणे हे गाय दान करण्यासमान आहे.
 
7. गरीब, अंध, दीन, अनाथ, मुके, अशक्त, अपंग आणि आजारी यांच्या सेवेसाठी दिलेला पैसा पुण्यात भर टाकतो.
 
8. अयोग्य ब्राह्मणांना दान घेऊ नये.
 
9. गाय, सोने, चांदी, रत्ने, शिक्षण, तीळ, मुलगी, हत्ती, घोडा, पलंग, कपडे, जमीन, अन्न, दूध, छत्री आणि आवश्यक साहित्यासह घर - या 16 वस्तू दान करण्यासाठी महादान असे म्हटले जाते.

उत्तर लिहिले · 17/12/2022
कर्म · 53750
0
पश्चाताप..!! रिग्रेट!! काश!!

एक दूर जंगलात एक माणूस राहत होता. दिवस उजाडल्यापासून - सूर्य मावळण्यापर्यंत त्याचे फक्त एकच काम ते म्हणजे, "काहीच न करणे!". त्याने त्याचे अर्धे जीवन असेच इकडेतिकडे भटकण्यात व्यतीत केलेलं होते.


एकेदिवशी त्याला कुठूनतरी समजते की, ह्या जंगलात एक "परीस" लपलेला आहे. परीस असा एक जादुई दगड आहे, त्याचा लोखंडाला स्पर्श केला असता त्याच सोन्यात रुपांतर होते. तो विचार करतो कि आपले असेही आयुष्य व्यर्थ गेलेलं आहे - आपण ह्या परिसाचा शोध घ्यायला सुरु करायला पाहिजे - जेणेकरून उर्वरित आयुष्य तरी मजेत आणि आरामात जाईल.

मग तो मनाशी पक्कं ठरवतो आणि परिसाच्या शोधात निघतो. त्याने आपल्या गळ्यात मोठी लोखंडी साखळी घातलेली असते. त्याने ठरवलेलं असते कि जंगलाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं नी रस्त्यात मिळणारा प्रत्येक दगड उचलून गळ्यातल्या साखळीला लावून पहायचा. आणि तो सुरु देखील करतो. पूर्ण दिवस त्याचा तो नित्यक्रम होऊन जातो - तो दगड उचलून साखळीला लावतो - सोन नाही झालं कि हातातला दगड फेकायचा आणि पुढे जाऊन दुसरा दगड उचलायचा, परत तसच करायचं.

अशी अनेक दिवस - महिने - वर्ष जातात पण त्याला काही यश येत नाही. परंतु त्याला तो परीस मिळण्याची खूप धुंद आलेली असते. तो दररोज फक्त एकच काम करतो - समोरचा दगड उचलतो, साखळीला लावून पाहतो - निराश होतो - परत पुढे चालतो दुसरा दगड उचलतो - परत तिसरा दगड उचलतो - चौथा मग पाचवा.

एकेदिवशी तो त्या जंगलाच्या शेवटच्या टोकावर येऊन जातो आणि तिथला शेवटचा दगड्सुद्धा तो तपासून पाहतो. त्याने अनेक वर्ष फक्त हेच काम केलेलं असते आणि आता तो खूप वृद्ध, थकलेला आणि लाचार स्थितीत असतो. आणि पाहतो तर काय "त्याच्या गळ्यातली साखळ सोन्याची" झालेली असते. त्याच्या अंगात अचानक शक्ती संचारते, रक्त सळसळ करते आणि तो अचानक इकडेतिकडे परीस शोधायला सुरु करतो. परंतु त्याला तो "परीस" कुठेच मिळत नाही.


त्याला लक्षात येते, "दररोज दगड उचलणे - साखळीला लावून पाहणे - काही होत नाही म्हणून त्याला फेकून देणे - परत पुढे जाऊन दुसरा दगड उचलून त्याला तपासून पाहणे" हे करण्यामध्ये त्याने "कोणताच दगड परीस नाही" असे डोक्यात ठासून घेतलेलं असते आणि अनेक दगड त्याने "लोखंडाचे सोने होतेय का?" ते न पाहताच फेकून दिलेले असतात. त्याला जेव्हा कळते, "मला परीस मिळाला होता, मी तो साखळीला लावलाही होता परंतु - हा दगडही सामान्य असेल म्हणून लोखंडाचे सोने झालेलं न पाहता त्याला फेकून दिला होता..!!" तेव्हा त्याला खूप "पश्चाताप" होतो आणि तसाच त्याचा मृत्यू होतो.

वरील कहाणीतील जंगल दुसरे तिसरे काही नसून "आयुष्य" आहे. ती व्यक्ती दुसरी - तिसरी कोणी नसून "आपल्यापैकी प्रत्येक जण" आहे. आपल्याही जीवनात, आयुष्याचे सोने करणारे परीस येतात - आपल्याला ते मिळतात - आपले आयुष्य तेव्हाच, त्याच क्षणाला सोनेरी झालेलं असते परंतु आपल्या मनाचे चक्षु तर तेव्हा बंद असतात आणि तो परीस आपण ओळखू शकलेलो नसतो. तो परीस आपल्याला मिळतो, पण आपणच त्याला सोडून दिलेलं असते.

ते परिस असतात - आपले आईबाबा. तो परीस असतो - शिकून घेण्याची वेळ (विद्यार्थी काळातील वेळ). ते परीस असतात - आपले स्वप्ने जे आपण समाज काय विचार करेल, ४ लोकं काय विचार करतील म्हणून सोडून दिलेले असतात, तो परीस असतो - आपले आरोग्य.

हे सगळे परीस आपल्याला मिळालेले असतात किंतु आपण "त्याच्याकडे दुर्लक्ष" केलेलं असते. हे सगळे आपल्याला खूप शेवटी कळते की, "यार आपल्याला तर सगळ मिळालेलं होत!! आपणच तिकडे दुर्लक्ष केलं.. जे मला हवे होते - ते माझ्याकडेच होते." किंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

आईबाबांची खरी आठवण आपल्याला तेव्हा येते जेव्हा आपण त्याच्या त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहतो.
आपल्याला विद्यार्थी काळाची आठवण तेव्हा येते, जेव्हा आपल्याला अथक परिश्रम करूनही खूप कमी पैसे मिळतात आणि आपल्याला सगळ्याचे पालनपोषण पहायचे असते.
आपल्या स्वप्नांची आठवण तेव्हा येते जेव्हा आपल्याला कळते की, "कोणालाही काहीही घेणदेण नव्हतं आपल्या स्वप्नांशी!! लोकं असेही बोलले असते - लोक तसेही बोलले असते".
आपल्याला आरोग्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण आपल्या "मृत्युशय्येवर" असतो.
वेळ निघून गेलेली असते - त्यावेळेस आपल्या जवळ फक्त एकच गोष्ट असते. तो म्हणजे "पश्चाताप..!! रिग्रेट!! काश!!".. काश वो कर लिया होता, काश!! काश!! माणूस शेवटी हाच "पश्चात्ताप" सोबत नेतो.


एक - मिनिट मी सांगतो ते करून पहा. दीर्घ श्वास घ्या, आतला गोंधळ शांत करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, "मी माझ्या मृत्युशय्येवर (डेथबेड) वर असेल तेव्हा माझ्या मनात काय चाललेलं असेल? मी शांत - समाधानी असेल का? - व्वा!! काय आयुष्य होत यार, खूप मज्जा आली….की…काश ते केलं असते, ते केलं असते.."


आयुष्य खूप सुंदर आहे :-)


उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53750
1
देवळातील देवाला महत्त्व असते की मनातील भावाला जास्त महत्त्व असते?

देवळातील देव आणि मनातील भाव या दोघांनाही सारखेच महत्त्व आहे. फरक ते मानणाऱ्या व्यक्तीं मध्ये आहे. मा‍झ्या मताप्रमाणे तीन प्रकारच्या व्यक्ती आहेत. एक बुद्धीला प्रमाण मानणाऱ्या. दोन मानसिकतेला प्रमाण मांडणाऱ्या, आणि तीन भावनिकतेला प्रमाण मानणाऱ्या. तीनही प्रकारच्या व्यक्तींनी ईश्वराची वेगवेगळी; खरं तर प्रतिमा ही म्हणता येणार नाही; पण संकल्पना केलेली आहे.

बुद्धीला प्रमाण मानणारा, प्रथम ईश्वर आहे की नाही यावरच विचार करेल. मग तो कसा आहे याचा विचार. पहिला विचार संपल्याशिवाय दुसरा चालू होतच नाही. कधीकाळी या व्यक्तीसाठी अशी वेळ येईल की तो विचार करेल की हो, काही शक्ती असू शकेल, जी ब्रम्हांड चालवत आहे. पण त्या शक्तीची प्रतिमा बनवण्याच्या प्रयत्नात तो पडणार नाही. त्याच्यासाठी मूर्ती काय?; किंवा मनातील भाव काय? दोन्हीचे महत्त्व नाही!

दुसरी व्यक्ती मानसिकतेला प्रमाण मानणारी. या प्रकारची व्यक्ती ईश्वराला मूर्त स्वरूप देण्याचे प्रयत्न करेल मग एखादा तिला काव्यात अथवा गद्यात वर्णन करेल. ज्याच्या हाती कला आहे तो तिची प्रतिमा बनवेल अथवा शिल्प बनवेल आणि तीच मूर्ती ईश्वर म्हणून तिची पूजा करेल. मानसिकतेला प्रमाण मर्यादा नाहीत म्हणून सर्व सामान्य वर्णनाच्या पलीकडे जाऊन काव्य आणि प्रतिमा आणि शिल्पे तयार केली गेली. मग हजारो हातांची देवी,डोंगराएवढ्या उंचीचे महावीर आणि बुद्ध तयार झाले. याही पलीकडे जाऊन तीन मुखे असलेले देव तयार झाले. लोकांसाठी झटून क्रुसावर चढवलेला रक्तबंबाळ येशूही तयार झाला. देवाचे संक्षेपइ रूपही लोकांनी तयार केले. स्त्रीच्या गर्भाशयात जाऊन योनीतुन आत आलेले लिंग तयार झाले आणि शिव रूप म्हणून प्रमाण झाले. ते कित्येक हजारो वर्षे लोकप्रिय आणि प्रमाण मानले गेले आहे. ही सर्व रूपे सर्वसामान्य भाविकाने स्वीकारली आणि देवाचे हेच खरे रूप असे प्रमाण मानले.याबद्दल पुढे येतच आहे

तिसरी व्यक्ती भावनिकता; प्रमाण मानणारी. या प्रकारात दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत. यातील प्रथम प्रकारच्या व्यक्ती डोळे मिटून पाहिलेली मूर्ती अथवा प्रतिमा डोळ्याच्या पापण्यांवर प्रक्षेपित करून तीच ईश्वर आहे असे मानणारी. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे; आपण जागृत अवस्थेत डोळे मिटल्यावर आपण पापण्यांचा अंतर्भाग डोळ्याच्या बाहुल्या मधून बघत असतो मग त्यावर भावनिक प्रक्षेपण करतो ही अवस्था आपणास निद्रिस्त असताना आणता येत नाहीत येत नाही, कारण त्यावेळी डोळे सुद्धा निद्रिस्त अवस्थेत असतात. मग देवळात जाऊन मूर्तीच्या प्रतिमेसमोर उभे राहून डोळे मिटले तर तीच पंचमहाभूतांची बनलेली मूर्ती भावनिक प्रक्षेपण होऊन त्या व्यक्तीस दिसते. माझ्या मते याला मनातील भाव म्हणला जातो. परंतु हा भाव जागृत अवस्थेतच जाणता येतो निद्रिस्त अवस्थेत नाही. याच प्रकारातील दुसरा म्हणजे सर्वसामान्य भाविक, सर्वसामान्य विचार करतो. तो पंचमहाभूतांची बनलेली मूर्ती उघड्या डोळ्यांनी बघून तिलाच देव मानतो. त्याच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार त्याला निर्देशीत करत असतात. मग हा भाविक शेंदूर लावलेल्या पाषाणाला ही हाच देव म्हणत असतो. तर शिवलिंगाला ही; हाच शिव म्हणून कवटाळत असतो. म्हणून अशा प्रकारचे भाविक स्थान-महिमा मानतात आणि त्याच-त्याच स्थानाला भेट देतात ज्याला ते ईश्वराशी भेट असे म्हणतात अशा प्रकारचे भाविक संख्येने जगात जास्तीत जास्त आहेत.

कदाचित याच कारणामुळे देवांच्या पंचमहाभूतांच्या प्रतिमा अथवा शिल्पे तयार झाली असावीत. याच कारणामुळे मूर्तिपूजा न मानणाऱ्या धर्मात सुद्धा देवांच्या प्रतिमा अथवा शिल्पे काही काळाने आपोआप निर्माण झाली. जेथे परमेश्वराचे अंश मानवी स्वरुपात लोकांनी पाहिले त्यांनी त्याच लोकांनी त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिमा अथवा शिल्पे बनवली मग त्या वेळी मूर्तीपूजा करू नये या तत्त्वाचा त्यांना विसर पडला. प्रभू येशू ख्रिस्ताची क्रूसावरची प्रतिमा 1000 वर्ष अस्तित्वात नव्हती ती इसवी सनाच्या दहाव्या शतकात अस्तित्वात आली. इस्लाम धर्मातील भाविकानी जरी कोणतीही मूर्ती बनवली नाही तरी मक्का, म्हणजे ईश्वराच्या प्रेषिताचे जन्मस्थान ज्या दिशेस आहे त्या दिशेला पवित्र भिंती बनवून तिच्यासमोर नमाज अदा केली.

तात्पर्य, ईश्वराचे नेमके रूप भाविकाच्या नजरेस सर्वसामान्यपणे येत नाही. त्या वेळी ते मूर्तीची आराधना करतात हे सत्य नाकारता येत नाही. ज्याला मूर्तीच्या अस्तित्वाच्या पलीकडे जायचे आहे ते डोळे मिटून तिचे अस्तित्व प्रक्षेपित करू पाहतात आणि त्याला भाव म्हणतात. निद्रिस्त अवस्थेत म्हणजेच मानवाच्या सर्व अवस्थेत मनातील भाव येत नाही. हे सत्य आहे.

शेवटी काय? मूर्ती अथवा मनातील भाव यामध्ये काहीही फरक नाही.


उत्तर लिहिले · 17/4/2022
कर्म · 121765
2
मानवी जीवनाचे दहा टप्पे आहेत:

जन्मपूर्व विकास

• बालपण आणि लहान वय .

सुरुवातीचे बालपण

• मध्य बालपण

. पौगंडावस्था

• लवकर प्रौढत्व

मध्यम प्रौढत्व

उशीरा प्रौढत्व

वृध्दापकाळ

. मृत्यू आणि मरणजन्मपूर्व विकास:

. गर्भधारणा होते आणि विकास सुरू होतो.

. शरीराच्या सर्व प्रमुख संरचना तयार होत आहेत. आणि आईच्या आरोग्याची प्राथमिक चिंता आहे.

पोषण, टेराटोजेन्स (किंवा पर्यावरणीय घटक ज्यामुळे जन्म दोष होऊ शकतात) आणि श्रम आणि प्रसूती ही प्राथमिक चिंता आहे.

बाल्यावस्था आणि लहानपण

आयुष्याचे पहिले दीड ते दोन वर्षे नाट्यमय वाढ आणि बदल आहेत.

. एक नवजात, ऐकण्याची उत्सुक भावना असलेला परंतु अत्यंत कमकुवत दृष्टी तुलनेने कमी कालावधीत लहान मुलाशी बोलणे, चालण्यात बदलते.

. काळजी घेणाऱ्यांचे रूपांतर एखाद्या व्यक्तीकडून केले जाते जे आहार आणि झोपेचे वेळापत्रक व्यवस्थापित करते, ते मोबाइल, उत्साही मुलासाठी सतत फिरणारे मार्गदर्शक आणि सुरक्षा निरीक्षक बनतात.सुरुवातीचे बालपण

. प्रारंभिक बालपण हे पूर्वस्कूली वर्ष म्हणून देखील ओळखले जाते ज्यात लहानपणापासून आणि औपचारिक शालेय शिक्षणापूर्वीची वर्षे असतात.

मध्य बालपण

. सहा ते अकरा या वयोगटांमध्ये मध्यम बालपण असते आणि या वयात मुलांना जे काही अनुभवते ते शाळेच्या सुरुवातीच्या ग्रेडमध्ये त्यांच्या सहभागाशी जोडलेले असते.

पौगंडावस्था

. पौगंडावस्था हा नाट्यमय शारीरिक बदलाचा कालावधी आहे जो एकूण शारीरिक वाढीचा वेग आणि लैंगिक परिपक्वता द्वारे चिन्हांकित केला जातो, ज्याला यौवन म्हणून ओळखले जाते.लवकर प्रौढत्व

. विसाव्या आणि तीसच्या दशकाला बऱ्याचदा प्रौढत्वाचा विचार केला जातो.

मध्यम प्रौढत्व

तीसच्या उत्तरार्धात साठच्या दशकाच्या उत्तरार्धात मध्यम प्रौढत्व म्हटले जाते.

उशीरा प्रौढत्व

आयुर्मानाचा हा कालावधी गेल्या 100 वर्षांमध्ये वाढला आहे, विशेषतः औद्योगिक देशांमध्ये.

. उशीरा प्रौढत्व कधीकधी "तरुण वृद्ध" आणि "वृद्ध वृद्ध" किंवा "तरुण वृद्ध", "वृद्ध वृद्ध" आणि "सर्वात जुने वृद्ध" यासारख्या दोन किंवा तीन श्रेणींमध्ये विभागले जाते.
उत्तर लिहिले · 16/9/2021
कर्म · 121765
0
नक्कीच! अर्थ आणि कर्म यांविषयी समुपदेश खालीलप्रमाणे:

अर्थ:

'अर्थ' हा शब्द अनेक संदर्भांमध्ये वापरला जातो. काही मुख्य अर्थ खालीलप्रमाणे:

  • पैसा किंवा संपत्ती: जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक बाजू.
  • उद्देश: जीवनाचा अर्थ किंवा हेतू.
  • महत्व: एखाद्या गोष्टीचेValue किंवा significance.

कर्म:

कर्म म्हणजे आपल्या कृती. आपले विचार, बोलणे आणि कार्ये यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. कर्माचे तीन प्रकार आहेत:

  • संचित कर्म: आपले भूतकाळातील कर्म.
  • प्रारब्ध कर्म: या जन्मात भोगायची कर्मे.
  • आगामी कर्म: वर्तमान कर्म जे भविष्य घडवते.

अर्थ आणि कर्म यांचा संबंध:

आपण आपल्या कर्मातून अर्थपूर्ण जीवन निर्माण करू शकतो. चांगले कर्म आपल्याला चांगले परिणाम देतात, ज्यामुळे जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होते.

समस्या आणि उपाय:

  • आर्थिक समस्या:
    • उपाय: योग्य नियोजन, Budget तयार करणे, अनावश्यक खर्च टाळणे, आणि गुंतवणुकी करणे.
  • जीवनातील उद्देश:
    • उपाय: स्वतःला समजून घेणे, आपल्या आवडीनिवडी शोधणे, आणि ध्येय निश्चित करणे.
  • नकारात्मक कर्म:
    • उपाय: सकारात्मक विचार करणे, चांगले काम करणे, आणि वाईट सवयी टाळणे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर भेट देऊ शकता:

हे समुपदेश तुम्हाला तुमच्या जीवनातील अर्थ आणि कर्म सुधारण्यास मदत करेल अशी आशा आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2440
0

बाबांनी पृथ्वीवरचा खरा देव कर्मचाऱ्याला म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी, 'कर्मचारी खरा देव' या विषयावर आधारित लेख वाचा:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2440