जीवन ध्यात्म

शेवटी माणूस काय नेतो?

2 उत्तरे
2 answers

शेवटी माणूस काय नेतो?

0
पश्चाताप..!! रिग्रेट!! काश!!

एक दूर जंगलात एक माणूस राहत होता. दिवस उजाडल्यापासून - सूर्य मावळण्यापर्यंत त्याचे फक्त एकच काम ते म्हणजे, "काहीच न करणे!". त्याने त्याचे अर्धे जीवन असेच इकडेतिकडे भटकण्यात व्यतीत केलेलं होते.


एकेदिवशी त्याला कुठूनतरी समजते की, ह्या जंगलात एक "परीस" लपलेला आहे. परीस असा एक जादुई दगड आहे, त्याचा लोखंडाला स्पर्श केला असता त्याच सोन्यात रुपांतर होते. तो विचार करतो कि आपले असेही आयुष्य व्यर्थ गेलेलं आहे - आपण ह्या परिसाचा शोध घ्यायला सुरु करायला पाहिजे - जेणेकरून उर्वरित आयुष्य तरी मजेत आणि आरामात जाईल.

मग तो मनाशी पक्कं ठरवतो आणि परिसाच्या शोधात निघतो. त्याने आपल्या गळ्यात मोठी लोखंडी साखळी घातलेली असते. त्याने ठरवलेलं असते कि जंगलाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं नी रस्त्यात मिळणारा प्रत्येक दगड उचलून गळ्यातल्या साखळीला लावून पहायचा. आणि तो सुरु देखील करतो. पूर्ण दिवस त्याचा तो नित्यक्रम होऊन जातो - तो दगड उचलून साखळीला लावतो - सोन नाही झालं कि हातातला दगड फेकायचा आणि पुढे जाऊन दुसरा दगड उचलायचा, परत तसच करायचं.

अशी अनेक दिवस - महिने - वर्ष जातात पण त्याला काही यश येत नाही. परंतु त्याला तो परीस मिळण्याची खूप धुंद आलेली असते. तो दररोज फक्त एकच काम करतो - समोरचा दगड उचलतो, साखळीला लावून पाहतो - निराश होतो - परत पुढे चालतो दुसरा दगड उचलतो - परत तिसरा दगड उचलतो - चौथा मग पाचवा.

एकेदिवशी तो त्या जंगलाच्या शेवटच्या टोकावर येऊन जातो आणि तिथला शेवटचा दगड्सुद्धा तो तपासून पाहतो. त्याने अनेक वर्ष फक्त हेच काम केलेलं असते आणि आता तो खूप वृद्ध, थकलेला आणि लाचार स्थितीत असतो. आणि पाहतो तर काय "त्याच्या गळ्यातली साखळ सोन्याची" झालेली असते. त्याच्या अंगात अचानक शक्ती संचारते, रक्त सळसळ करते आणि तो अचानक इकडेतिकडे परीस शोधायला सुरु करतो. परंतु त्याला तो "परीस" कुठेच मिळत नाही.


त्याला लक्षात येते, "दररोज दगड उचलणे - साखळीला लावून पाहणे - काही होत नाही म्हणून त्याला फेकून देणे - परत पुढे जाऊन दुसरा दगड उचलून त्याला तपासून पाहणे" हे करण्यामध्ये त्याने "कोणताच दगड परीस नाही" असे डोक्यात ठासून घेतलेलं असते आणि अनेक दगड त्याने "लोखंडाचे सोने होतेय का?" ते न पाहताच फेकून दिलेले असतात. त्याला जेव्हा कळते, "मला परीस मिळाला होता, मी तो साखळीला लावलाही होता परंतु - हा दगडही सामान्य असेल म्हणून लोखंडाचे सोने झालेलं न पाहता त्याला फेकून दिला होता..!!" तेव्हा त्याला खूप "पश्चाताप" होतो आणि तसाच त्याचा मृत्यू होतो.

वरील कहाणीतील जंगल दुसरे तिसरे काही नसून "आयुष्य" आहे. ती व्यक्ती दुसरी - तिसरी कोणी नसून "आपल्यापैकी प्रत्येक जण" आहे. आपल्याही जीवनात, आयुष्याचे सोने करणारे परीस येतात - आपल्याला ते मिळतात - आपले आयुष्य तेव्हाच, त्याच क्षणाला सोनेरी झालेलं असते परंतु आपल्या मनाचे चक्षु तर तेव्हा बंद असतात आणि तो परीस आपण ओळखू शकलेलो नसतो. तो परीस आपल्याला मिळतो, पण आपणच त्याला सोडून दिलेलं असते.

ते परिस असतात - आपले आईबाबा. तो परीस असतो - शिकून घेण्याची वेळ (विद्यार्थी काळातील वेळ). ते परीस असतात - आपले स्वप्ने जे आपण समाज काय विचार करेल, ४ लोकं काय विचार करतील म्हणून सोडून दिलेले असतात, तो परीस असतो - आपले आरोग्य.

हे सगळे परीस आपल्याला मिळालेले असतात किंतु आपण "त्याच्याकडे दुर्लक्ष" केलेलं असते. हे सगळे आपल्याला खूप शेवटी कळते की, "यार आपल्याला तर सगळ मिळालेलं होत!! आपणच तिकडे दुर्लक्ष केलं.. जे मला हवे होते - ते माझ्याकडेच होते." किंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

आईबाबांची खरी आठवण आपल्याला तेव्हा येते जेव्हा आपण त्याच्या त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहतो.
आपल्याला विद्यार्थी काळाची आठवण तेव्हा येते, जेव्हा आपल्याला अथक परिश्रम करूनही खूप कमी पैसे मिळतात आणि आपल्याला सगळ्याचे पालनपोषण पहायचे असते.
आपल्या स्वप्नांची आठवण तेव्हा येते जेव्हा आपल्याला कळते की, "कोणालाही काहीही घेणदेण नव्हतं आपल्या स्वप्नांशी!! लोकं असेही बोलले असते - लोक तसेही बोलले असते".
आपल्याला आरोग्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण आपल्या "मृत्युशय्येवर" असतो.
वेळ निघून गेलेली असते - त्यावेळेस आपल्या जवळ फक्त एकच गोष्ट असते. तो म्हणजे "पश्चाताप..!! रिग्रेट!! काश!!".. काश वो कर लिया होता, काश!! काश!! माणूस शेवटी हाच "पश्चात्ताप" सोबत नेतो.


एक - मिनिट मी सांगतो ते करून पहा. दीर्घ श्वास घ्या, आतला गोंधळ शांत करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, "मी माझ्या मृत्युशय्येवर (डेथबेड) वर असेल तेव्हा माझ्या मनात काय चाललेलं असेल? मी शांत - समाधानी असेल का? - व्वा!! काय आयुष्य होत यार, खूप मज्जा आली….की…काश ते केलं असते, ते केलं असते.."


आयुष्य खूप सुंदर आहे :-)


उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53750
0

माणूस शेवटी काहीच नेत नाही. तो जेव्हा या जगात येतो, तेव्हा तो रिकामा हाती येतो आणि जातानाही रिकामा हातीच जातो. त्याने या जगात जे काही कमावले, ते इथेच राहते.

या संदर्भात काही विचार:

  • भगवत गीता: भगवतगीतेत सांगितले आहे की, "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका.
  • संत तुकाराम: "येणेichririk जन्म गेला, मेल्यावर काय?" या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की, माणूस जन्माला येतो आणि मरतो, पण त्याने काय मिळवले?

त्यामुळे माणसाने लोभ, मोह, माया यांपासून दूर राहावे आणि निस्वार्थपणे कर्म करत राहावे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2460

Related Questions

साई बाबांचा जन्म कुठे झाला आहे?
किती दान करावे? कमाईचा कितवा भाग दान करावा?
देवळातील देवाला महत्त्व असते की मनातील भावाला जास्त महत्त्व असते?
जीवन हे दशदिशांना विभागले आहे?
अर्थ आणि कर्म ह्या विषयी समुपदेश हवा आहे?
बाबांनी पृथ्वीवरचा खरा देव कोणाला म्हटले आहे?
मला माणसात यायचे आहे त्यासाठी मी काय करू?