3 उत्तरे
3 answers

गर्भाशय प्रत्यारोपण म्हणजे काय असते?

5
गर्भाशय प्रत्यारोपण म्हणजे
एखाद्या स्त्रीचा गर्भ म्हणजे गर्भाशय काढून दुसऱ्या स्त्रीला देने

गर्भाशय प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी शस्त्रक्रिया. इतर देशांमध्ये यशस्वीरित्या पार पडलेलं गर्भाशयाचं ट्रान्सप्लांटेशन पहिल्यांदाच भारतात होणार आहे. पुण्याच्या रुग्णालयात तीन महिलांच्या शरीरात त्यांच्या आईच्या गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं जाणार आहे.

पुढच्या महिन्यात म्हणजे 13 आणि 14 मे रोजी पुण्याच्या गॅलक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये हे प्रत्यारोपण होणार आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने 'जीएलसीआय'ला गर्भाशय प्रत्यारोपणाचा परवाना दिला आहे. पाच वर्षांसाठी हा परवाना प्राप्त झाला आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास तिन्ही महिलांना मातृत्वसुख अनुभवता येईल.

विज्ञानाचा चमत्कार! अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी


जगभरात आतापर्यंत फक्त 25 गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यातही प्रत्यारोपणानंतर केवळ दहा महिलांना गर्भधारणा झाली आहे. 2014 साली स्वीडनमध्ये जगातील सर्वात पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण झालं होतं.

बंगळुरुच्या 'मिलान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ'लाही दोन महिलांचं गर्भाशय प्रत्यारोपण करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाली आहे.

गर्भाशयाशी संबंधित काही कारणांमुळे अनेक महिलांना मूल होत नाही. धक्कादायक म्हणजे जगातील जवळपास तीन ते चार टक्के महिला यामुळे मातृत्त्वापासून वंचित राहतात.

धन्यवाद
उत्तर लिहिले · 21/10/2018
कर्म · 20585
0
शस्त्रक्रियेने एका महिलेचे गर्भाशय दुसऱ्या महिलेला लावणं, याला गर्भाशय प्रत्यारोपण म्हणतात.
उत्तर लिहिले · 21/10/2018
कर्म · 28020
0

गर्भाशय प्रत्यारोपण (Uterus transplantation) म्हणजे एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीमध्ये गर्भाशय शस्त्रक्रियेने प्रत्यारोपित करणे.

हे खालील स्त्रियांसाठी उपयुक्त आहे:

  • जन्मजात गर्भाशय नसलेल्या स्त्रिया.
  • गर्भाशयाला झालेली इजा किंवा गर्भाशयाचे रोग, ज्यामुळे गर्भाशय काढण्याची आवश्यकता आहे.

गर्भाशय प्रत्यारोपणानंतर, स्त्री गर्भवती होऊ शकते आणि बाळ जन्माला घालू शकते. हे तंत्रज्ञान अजूनही प्रयोगात्मक आहे, परंतु ज्या स्त्रिया स्वतःच्या गर्भाशयाने गर्भवती होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही एक आशादायक गोष्ट आहे.

प्रक्रियेबद्दल काही महत्वाचे मुद्दे:

  • दाता: गर्भाशय जिवंत किंवा मृत दात्याकडून घेतले जाऊ शकते.
  • शस्त्रक्रिया: गर्भाशय प्रत्यारोपण एक जटिल शस्त्रक्रिया आहे.
  • गर्भधारणा: प्रत्यारोपणानंतर, IVF (In Vitro Fertilization) च्या मदतीने गर्भधारणा शक्य होते.
  • गुंतागुंत: या प्रक्रियेमध्ये काही गुंतागुंत होण्याची शक्यता असते, जसे की संक्रमण किंवा गर्भाशय नाकारले जाणे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 4280

Related Questions

मुलीना मुल नाही झाल तर काय करावे?
पाठीच्या मणक्याच्या रचनेचे वर्णन करून त्यासाठी योग कसा महत्त्वाचा ठरतो ते स्पष्ट करा.
योगांमधील वेगवेगळ्या क्रियांचे प्रभाव श्वसनसंथ्योच्या कार्यावर कसा होतो ते स्षष्ट करा.?
ब्लेंड ऑईल खाण्याचे फायदे काय आहेत?
शेंगदाणा तेल खाण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?
आई खुप अजारी आहे काही खात पित नाही खुप अक्षकत आहे पहाणे बोलणे बंद आहे रकत नाही काय करु मला तीचे हाल पाहावेत नाही?
झोप न्याची दिशा?