3 उत्तरे
3
answers
नागीण हा आजार कशामुळे होतो व त्यावर उपचार काय?
21
Answer link
माहिती संकलित
नागीण नावाच्या आजाराचे आयुर्वेदिक नाव विसर्प असे आहे. सापाप्रमाणे गती असलेला आजार म्हणजे विसर्प. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्याने हा रोग होतो, खरेतर हा एक त्वचा रोग आहे.आधुनिक शास्त्रानुसार याचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक संसर्ग आहे. हा आजार मज्जातंतूच्या मार्गानुसार पसरत जा तो. आजार जसजसा वाढत जातो तसतशी नर्व रूट व्यस्त होत जाते, नर्वचा मार्ग पूर्ण झाला किंवा विळखा जर पूर्ण झाला तर आजार जास्तच बळावतो व माणूस दगावण्याचा धोका असतो म्हणून ही गैरसमजूत बोकाळली आहे.
हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. या रोगात खूप खाज व दाह जाणवतो. खाजेने अगदी त्रस्त व्हायला होते, ही खाज कमी होत नाही. नवीन शास्त्रानुसार यावर ‘असायक्लोवीर’ नावाचे औषध सांगितलेले आहे. याने आजार लगेच बारा होतो पण त्यानंतर बराच काळ दाह व खाज जाणवत राहते. याच कारणाने आयुर्वेदिक तज्ञांचे मतही विचारात घेतले जायला हवे.
जोपर्यंत शरीर पित्तापासून व दुषित रक्तापासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदात यावर रक्तमोक्षण, जालौवाकारक्षण असे काही उपाय सुचवले गेले आहेत. याने पित्त शुद्ध होऊन दाह कमी होतो. कः लेप व पंचकर्म केल्यानेही या आजारापासून सुटका मिळू शकते. तांदळाच्या पिठात दुर्वांचा लेप करून लावल्यास नागीण बरी होते. कोणतेही लेप वापरताना वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला.
कांजिण्यांच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काहींच्या शरीरात हे विषाणू तसेच राहिलेले असतात. काही वर्षानंतर हे विषाणू चेताराज्जुतून नसेतून पसरतात व त्वचेवर फोड तयार होतात. वाढत्या वयाबरोबर या आजाराची तीव्रता वाढते. म्हातारपणात नागिणीचा त्रास जास्त होतो. चेतातंतूच्या रेषेवर विषाणूंची वाढ होते, या जागेवर सुरुवातीला खूप वेदना होतात. नंतर तिकडची त्वचा लाल होते व फोडपण येतात. काही दिवसानंतर फोडांवर खपल्या धरतात. हे फोड नष्ट झाल्यानंतर वेदना थांबतात. काही वेळा वेदना काही काळ राहतात. याचे वाईट परिणाम तर होत नाहीत पण जर फोड डोळ्यात येत असतील तर नजर जाऊ शकते.
उपचार
या आजारावर असायक्लोवीर नावाचे गुणकारी औषध आहे. वेळेत इलाज सुरु केल्यास नागिण वेळीच बरी होऊ शकते. हे औषध महाग आहे. ज्याला आजार झाला आहे त्याला दिलासा द्यावा. जास्त दुखत असल्यास अस्पिरीन द्यावी. आजार लवकर बरा होतो. त्यानंतरही जर दुखत राहिले तर तज्ञांना दाखवावे.
काही आजाराची नावे ही त्याच्या स्वरूपानुसार, गतीप्रमाणे ठेवलेली असतात पण म्हणून त्याचा संबंध एखाद्या प्राण्याशी असतोच असे नाही. नागीण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला हवी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.

1
Answer link
नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.
रोगनिदान
हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.
सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत.
नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.
नागिणीसाठी उपचार
यावर 'असायक्लोव्हिर' हे गुणकारी औषध आहे. पुळया उमटल्याच्या दिवशी हे लगेच सुरु केले तर पुरळ लवकर बरे होतात. पण नंतर जी आग होत राहते ती कमी होत नाही. या गोळया महाग आहेत. याचे मलमही मिळते. याबरोबरच रुग्णाला धीर द्यावा, आणि गैरसमजुती दूर कराव्यात. दुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्यावे. हा आजार काही दिवसांत आपोआप बरा होतो. नंतर तीव्र वेदना होतच राहिली तर संबंधित नस मारून टाकण्याचा उपचार करावा लागतो. त्यासाठी तज्ज्ञाला दाखवावे.
0
Answer link
नागीण (Herpes zoster) हा एक वेदनादायक पुरळ आहे जो Varicella-zoster नावाच्या विषाणूमुळे होतो. हाच विषाणू चिकनपॉक्सला देखील कारणीभूत असतो.
कारणे:
- विषाणूचा प्रादुर्भाव: ज्या व्यक्तींना यापूर्वी चिकनपॉक्स झाला आहे, त्यांच्या शरीरात हा विषाणू सुপ্ত अवस्थेत राहतो. काही वर्षांनंतर, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास, हा विषाणू पुन्हा सक्रिय होतो आणि नागीण म्हणून प्रकट होतो.
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे: वृद्धत्व, ताण, काही औषधे, किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी करणारे आजार (उदाहरणार्थ, एचआयव्ही/एड्स, कर्करोग) यामुळे नागीण होण्याची शक्यता वाढते.
उपचार:
- antiviral औषधे: नागीणच्या उपचारांसाठी डॉक्टर्स acyclovir, valacyclovir, किंवा famciclovir सारखी अँटीव्हायरल औषधे देतात. ही औषधे विषाणूची वाढ रोखून लवकर आराम देतात.
- वेदना कमी करणारी औषधे: नागीणमुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स वेदनाशामक औषधे (painkillers) देतात, जसे की पॅरासिटामॉल (paracetamol) किंवा ibuprofen. गंभीर वेदनांसाठी, ते opioid वेदनाशामक औषधे देखील देऊ शकतात.
- Topic चे क्रीम किंवा लोशन: पुरळ आणि खाज कमी करण्यासाठी डॉक्टर्स calamine लोशन किंवा steroid क्रीम लावण्याचा सल्ला देतात.
- घरगुती उपाय:
- पुरळ स्वच्छ ठेवा आणि त्यावर थंड compresses लावा.
- नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या.
- पुरेशी विश्रांती घ्या.
लक्षणे:
- शरीराच्या एका बाजूला पुरळ उठणे.
- पुरळ येण्यापूर्वी त्या ठिकाणी वेदना, खाज आणि जळजळ होणे.
- ज्वर (ताप) येणे.
- थकवा जाणवणे.
प्रतिबंध:
- लसीकरण: नागीण टाळण्यासाठी 'Shingrix' लस उपलब्ध आहे, जी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.
टीप: नागीण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करा.