Topic icon

त्वचा रोग

1

त्वचेला रोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

संसर्ग: जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवीमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. उदाहरणार्थ, दाद, खरुज, सोरायसिस, आणि मुरुम हे सर्व संसर्गजन्य त्वचा रोग आहेत.
ऍलर्जी: त्वचेला ऍलर्जीमुळे खाज सुटणे, लालसरपणा, सूज आणि फोड येऊ शकतात. उदाहरणार्थ, एटोपिक त्वचारोग, संपर्क त्वचारोग आणि अन्न ऍलर्जी हे सर्व त्वचेच्या ऍलर्जीशी संबंधित आहेत.
औषधे: काही औषधे त्वचेला दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की खाज सुटणे, लालसरपणा आणि फोड.
पर्यावरणीय घटक: सूर्यप्रकाश, उष्णता, थंडी, धूळ आणि धूर यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे त्वचेला नुकसान होऊ शकते.
आनुवंशिकी: काही त्वचा रोग अनुवांशिक असतात, जसे की सोरायसिस आणि एक्जिमा.
त्वचेला रोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात, जसे की:

स्वच्छ आणि निरोगी राहा: दररोज आंघोळ करा, परंतु खूप जास्त साबण वापरू नका.
सनस्क्रीन वापरा: उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरा.
त्वचेला खराब होण्यापासून वाचवा: त्वचेला खराब करू शकणाऱ्या पदार्थांपासून दूर राहा, जसे की रसायने आणि धूळ.
स्वस्थ आहार घ्या: निरोगी आहार त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
नियमितपणे डॉक्टरांना भेट द्या: जर तुम्हाला त्वचेवर कोणतीही समस्या येत असेल तर डॉक्टरांना भेटून योग्य उपचार घ्या.
त्वचेला रोग झाल्यास, योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. उपचारांचा प्रकार रोगाच्या प्रकारावर अवलंबून असतो. काही सामान्य उपचारांमध्ये औषधे, औषधी वनस्पती, आणि लाइट थेरपी यांचा समावेश होतो
उत्तर लिहिले · 10/10/2023
कर्म · 34235
0
गजकर्ण हे खूपच त्रासदायक असते. ते लवकर जात नाही किंवा गेले तरी कधी कधी परत येऊ शकते. त्यामुळे एकच करा की उपचार चालू ठेवा, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत उपचार चालूच ठेवा.
उत्तर लिहिले · 9/1/2021
कर्म · 18385
3
सोरायसिस हा फक्त त्वचेशी संबंधित आजार आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भुसा पडणे ही प्रमुख लक्षणे असलेला त्वचा विकार सोरायसिस म्हणून ओळखला जातो. ‘सोरायसिस’ हा आजार प्रामुख्याने त्वचा निर्मितीशी संबंधित आजार आहे.
उत्तर लिहिले · 21/11/2020
कर्म · 1905
2
गजकर्ण हा असा त्वचाविकार आहे की एकदा झाल्यावर परत येऊ शकतो. त्यामुळे त्याची योग्य ट्रीटमेंट घेणे, काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टर जोपर्यंत उपचार चालू ठेवण्यासाठी सांगतात, तोपर्यंत उपचार बंद करू नये. खूप वेळा असे होते की आपल्याला वाटते की आपण आता बरे झालो आहोत आणि आपण उपचार बंद करतो. पण तसे केले तर काही काळानंतर गजकर्ण परत येऊ शकते. त्यामुळे उपचार चालू ठेवा आणि कुठल्यातरी एकाच डॉक्टर कडे ट्रीटमेंट चालू ठेवा म्हणजे नक्की बरे व्हाल.
उत्तर लिहिले · 22/10/2020
कर्म · 18385
1
फ्लुकोनाझोल ४०० मिग्रॅ आठवड्यातून १ दा घ्या.
उत्तर लिहिले · 13/9/2020
कर्म · 3835
3
"नागीण" हे नाव एकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो. या आजाराविषयी समज कमी तर गैर समज जास्त आहे. नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो. खरं तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशा मुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यावयाची असते हे जाणून घेऊ.....

नागीण होण्यामागील कारण
उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरतात. या ऋतूत विषाणू जास्त पसरतात आणि सक्रिय असतात. लहान मुलांमध्ये कांजण्या होतात. लहानपणी होणाऱ्या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जू मध्ये वास्तव्य करतात. शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार पसरवतात.
मधुमेह, प्रतिरोधक शक्ती कमी करणारे औषधे, एड्स, केमोथेरपी मध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते आणि नागिणीचा आजार उद्भवतो.



लक्षणे:
1 नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते.
2  त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची आग होते.
3  या दुखण्यात प्रचंड आग होते.
4  चमका येतात.
5  2 -3 दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात, आणि त्या फोडांमध्ये पाणी होते.
6  ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते.

नागिणीने विळखा मारला, किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळले की जीवास धोका असतो असे गैरसमज आहे. पण ह्यात काहीही तथ्य नाही. नागीण ही शरीराच्या एका बाजूस येते, काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना ह्या आजाराची लागवणं लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्ण पणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास
त्वरित 48 तासातच वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्ण 5 -7  दिवसांत पूर्णपणे बरा होतो.

काही जणांचा गैरसमज असतो की या आजारांवर औषधोपचार नाही त्यामुळे ते घरगुती किंवा अन्यत्र उपाय करतात. दूर्वा, जळालेले खोबरे, तांदळाचा लेप लावतात. त्यामुळे जखम चिघळते आणि आजार पसरतो, दुखणे लांबणीला जाते. त्रास वाढतो.

उपचार :-
1 नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ल्याने औषधोपचार करावे.
2  गोळ्यांचा पूर्ण डोस घ्यायलाच हवा.
टीप :- गरोदरपणात हा रोग झाल्यास पण हे औषधे घेता येते. काही दुष्परिणाम होत नाही.

या आजारात घ्यावयाची काळजी :-
1 जास्त दगदग टाळावी
2  हलका आहार घ्यावा
3  अंघोळी नंतर जागा टिपून घ्यावी
4  स्वतःचे कपडे, साबण, अंथरूण, पांघरुणं, वेगळे ठेवावे
5  स्वच्छता बाळगावी

!! बाकी मग सगळ ठण ठण गोपाळ !!
उत्तर लिहिले · 12/8/2020
कर्म · 14865
5
चांगल्या डॉक्टरांना दाखवा. आणि फंगल इन्फेक्शनचे तसेच असते, ते लवकर ठीक होत नाही किंवा परत परत येते. त्यामुळे तुमचे ट्रीटमेंट चालू ठेवा. आणि एकाच डॉक्टरांकडे जा. डॉक्टर बदलू नका सारखे. इन्फेक्शनची जागा नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवा. जिथे इन्फेक्शन आहे त्यासोबतच थोड्या अतिरिक्त भागावर जास्त क्रीम लावा. पण इलाज सोडू नका.
उत्तर लिहिले · 9/8/2020
कर्म · 18385