त्वचा रोग आरोग्य

नागीण त्वचा रोगबद्दल माहिती मिळेल का?

नागीण

त्वचारोग

*आरोग्य संवाद गृप*
राजु गोल्हार
९९२२३१५५५५
१९/१/२०१८
संपादित
नागीण हा आजार
‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शनला नागीण
(हर्पीस झोस्टर) म्हणतो, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात. लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्य भरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता अशा कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू जागृत होऊ शकतो. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात.

नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.

👉दोन प्रकारचे संसर्ग :

    हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार १ (HSV-1)
    हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार २ (HSV-2)

हा संसर्ग सुक्ष्मदर्शीतून एकसमान दिसतो आणि ह्याचा तोंड व जननेंद्रियांच्या भागात संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणतः (HSV-1) हा कमरेच्यावरच्या भागात उद्भवतो व (HSV-2) हा कमरेच्या खालील भागात उद्भवतो.
👉 गुप्तांगाजवळील नागीण :

गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो.

सामान्यतः एखाद्या व्यक्तीला, गुप्तांगाचे एचएसव्ही – 2 चे संक्रमण असलेल्या व्यक्तीकडून समागमाच्या दरम्यानच एचएसव्ही-2 चे संक्रमण होते.  ज्या जोडीदाराला न दिसणारा फोड आहे आणि आपण संक्रमित आहोत किंवा नाही याची माहिती नसेल अशा जोडीदाराकडून संक्रमण होऊ शकते.

गुप्तांगाच्या नागिणीची चिन्हे आणि लक्षणे :


"व्हेरिसोला ऑस्टर'मुळे होणारी नागीण ही एकाच बाजूला होते व तिचा विळखा पडत नाही. परंतु "हर्पिस सिम्प्लेक्‍स'मुळे होणारी नागीण ही दोन्ही बाजूंना होते, पसरू शकते. ही नागीण प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांत आढळून येते. प्रतिकारशक्ती कमी असल्याने ही नागीण पसरते व गंभीर स्वरूपात होऊ शकते. त्यामुळे "नागिणीचा विळखा पडल्यास गंभीर आजार आहे,' हा समज रूढ झाला असावा.

या नागिणीवरदेखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.

👉रोगनिदानः

हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.
सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत. नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.

👉लक्षणे
सुरुवातील नागिणीच्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात.
नागिणीची प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज.
नागीण झाल्यावर तो भाग लालसर होतो, आतून दडदडीत होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपतायेत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे फोड मोठे होतात. शेजारचे छोटे छोटे फोड एकत्र होऊन मोठे फोड तयार होतात. नंतर ते फुटतात. काही वेळा या फोडांमध्ये पूसुद्धा होतो. फुटल्यावर त्यातील पाणी निघून जाते आणि वरची त्वचा निघून जाऊन आतील मांस दिसू लागते. नंतर त्या मांसावर खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपली गळून पडते.

👉विशिष्ठ लक्षणे:

- पाठदुखी.
- नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे/खुपल्यासारखे वाटत राहते.
- दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात
- त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो.
- त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो.
- फ्लू’मध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे .
- पाणीदार फोड.. पुढे सुकतात, त्याला खपली धरते आणि ती पडून जाते.

*कार्यकाळ*

नागीण किती प्रमाणात झाली आहे, त्यावर त्याचा काळ अवलंबून असतो. पण साधारणतः नागिणीला चार आठवडे तरी लागतात. कांजिण्यांप्रमाणेच साधारणतः याचा बरा होण्याचा प्रवास असतो. फक्त त्या एका आठवड्यात कमी होतात, तर नागीण बरी व्हायला वेळ लागतो. नागीण आयुष्यात शक्यतो एकदाच होते.
एड्स किंवा जननेंद्रियांच्या सांसर्गिक रोगांमुळे होणारी नागीण मात्र वारंवार होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास किंवा पथ्य न केल्यास नागीण बरी व्हायला खूप वेळ लागतो.
👉नागिणीबद्दल एक रूढ समज म्हणजे नागीण दोन्ही बाजूंनी आल्यास व विळखा पूर्ण झाल्यास तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार समजला जातो व त्यात रुग्ण दगावतो. यात कितपत तथ्य आहे?
कुणी घरगुती उपचार करतात; मंत्र-तंत्रदेखील केले जातात. या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत.पूर्वी विषाणूंवर परिणामकारक औषधे नसल्यामुळे साधारणपणे अशा सर्व आजारांबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक भीती होती. आता नागिणीवर देखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
👉वृद्धापकाळात झालेली नागीण बरी व्हायलाही खूप वेळ लागतो. अत्यंत वाईट बाब म्हणजे अशी नागीण बरी झाल्यानंतरही त्या जागेवरची आग किंवा वेदना या नंतर कितीही उपाय योजना केल्या तरी जन्मभर पाठ सोडत नाहीत.
काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.
साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.


👉नागिणीसाठी प्रचलित उपचारः. आणि गैरसमज

तंत्र मंत्र ऊतारा हे सर्व अंधश्रद्धा आहेत 
आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. नागीण या रोगाबद्दलही अशाच अनेक कल्पना आहेत. हा विकार कितीही भयंकर असला, तरी योग्य व वेळीच केलेल्या आयुर्वेदिक उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात 'कक्षा', 'विसर्प', 'अग्निरोहिणी' अशा नावांनी उल्लेख असलेल्या या विकाराला आपण नागीण, धावरे या नावाने ओळखतो.

* कारणेः

नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढविणार्‍या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरणे, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग हे नागीण होण्यास कारणीभूत असतात.

*स्थाने*

डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर

👉आयुर्वेदिक उपचार

नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.

👉पेशंटची तपासणी करून पोटात

*सकाळी*
४ उंबाराच्या पानाचा काढा करुन ऊपाशि पोटि घ्या
*दुपारी*
गुळवेल सत्त्व           १५ml
महामंजिंष्टादि काढा  १५ml
*संध्याकाळी*
खदिरारिष्ट               १५ml
कायाकल्प वटी २ गोळ्या
संशमनी वटी २ गोळ्यां
दिली जाते.
*मलम*
ऊंबराची मुळी घासुन

दुर्वांचा रस करुन

कोरफडीचा गर

औषधे बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.

👉 *पथ्य*

हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.

पोट साफ ठेवणेही गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे पहिले आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना  नागीण नाही, पण कांजिण्या येऊ शकतात. घरी राहून नागिणीची जागा जेवढी उघडी राहील तेवढे चांगले असते.

*सुचना*

*आपला प्रश्न विचारतांना*
नाव
गाव
वय
हाईट
वजन
आजारा विषयी सविस्तर  माहिती आजार किती दिवसापासुन आहे  कुठले आैषध चालु आहे या विषयी माहिती पाठवले तरच आपल्या प्रश्नांची उत्तर मिळेल नाहीतर नाही
दुसऱ्या चे प्रश्न विचारू नये उत्तर मीळणार नाही त्यांना संपर्क करायला सांगावे
replay नाही मिळाला तर तोच प्रश्न पुन्हा पर्सनली send करावा
Appointment
घेतल्या शिवाय भेटू नये
*वेळे नुसार मार्ग दर्शन केले जाईल**
*धन्यवाद*
अॅडमीन
राजु गोल्हार
९९२२३१५५५५
आरोग्य संवाद गृप
१९/१/२०१८
संपादित
पोस्ट कटपेस्ट करु नये
जशीच्या तशी प्रसारीत करावी
1 उत्तर
1 answers

नागीण त्वचा रोगबद्दल माहिती मिळेल का?

3
"नागीण" हे नाव एकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो. या आजाराविषयी समज कमी तर गैर समज जास्त आहे. नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो. खरं तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशा मुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यावयाची असते हे जाणून घेऊ.....

नागीण होण्यामागील कारण
उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरतात. या ऋतूत विषाणू जास्त पसरतात आणि सक्रिय असतात. लहान मुलांमध्ये कांजण्या होतात. लहानपणी होणाऱ्या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जू मध्ये वास्तव्य करतात. शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार पसरवतात.
मधुमेह, प्रतिरोधक शक्ती कमी करणारे औषधे, एड्स, केमोथेरपी मध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते आणि नागिणीचा आजार उद्भवतो.



लक्षणे:
1 नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते.
2  त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची आग होते.
3  या दुखण्यात प्रचंड आग होते.
4  चमका येतात.
5  2 -3 दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात, आणि त्या फोडांमध्ये पाणी होते.
6  ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते.

नागिणीने विळखा मारला, किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळले की जीवास धोका असतो असे गैरसमज आहे. पण ह्यात काहीही तथ्य नाही. नागीण ही शरीराच्या एका बाजूस येते, काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना ह्या आजाराची लागवणं लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्ण पणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास
त्वरित 48 तासातच वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्ण 5 -7  दिवसांत पूर्णपणे बरा होतो.

काही जणांचा गैरसमज असतो की या आजारांवर औषधोपचार नाही त्यामुळे ते घरगुती किंवा अन्यत्र उपाय करतात. दूर्वा, जळालेले खोबरे, तांदळाचा लेप लावतात. त्यामुळे जखम चिघळते आणि आजार पसरतो, दुखणे लांबणीला जाते. त्रास वाढतो.

उपचार :-
1 नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ल्याने औषधोपचार करावे.
2  गोळ्यांचा पूर्ण डोस घ्यायलाच हवा.
टीप :- गरोदरपणात हा रोग झाल्यास पण हे औषधे घेता येते. काही दुष्परिणाम होत नाही.

या आजारात घ्यावयाची काळजी :-
1 जास्त दगदग टाळावी
2  हलका आहार घ्यावा
3  अंघोळी नंतर जागा टिपून घ्यावी
4  स्वतःचे कपडे, साबण, अंथरूण, पांघरुणं, वेगळे ठेवावे
5  स्वच्छता बाळगावी

!! बाकी मग सगळ ठण ठण गोपाळ !!
उत्तर लिहिले · 12/8/2020
कर्म · 14865

Related Questions

त्वचेला रोग होण्याची कारणे काय आहेत?
गजकर्ण जातच नाही, खूप उपाय केलेत?
सोरायसिस कोणता आजार आहे?
गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्स पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?
गजकर्ण वर काही उपाय आहे का ?
माझा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम कमी होत नाही? डॉक्टरकडे गेलो की थोडे दिवस कमी होत मग परत येतं, काय करू?
नागीण रोग कसा असतो?