शब्दाचा अर्थ भाषा मराठी भाषा वाक्यप्रचार

नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

3 उत्तरे
3 answers

नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

4
विंचुला जो मागे एक काटेसारखा अवयव असतो, ज्यात पुर्णताः विष असते त्या भागाला नांगी म्हणतात. जेव्हापण काही संकट आलं कि विंचु लगेच ती आपली नांगी काढतो आणि चावण्याचा प्रयत्न करतो. स्वतं च बचाव करतो. ते एकप्रकारे त्याच हत्यारच असते.

नांगी ह्या शब्दाला आपण शस्त्र किंवा हत्यार अशी उपमा देतो आणि जेव्हा पण एखाद्या व्यक्तिने आशा सोडली, हतबल झाला, धीर खचलं की आपण म्हणतो त्याने नांगी टाकली. कारण धीर, आशा, धैर्य माणसाचे मुख्य शस्त्रे असतात.

म्हणुन.. नांगी टाकणे म्हणजे निराश होणे, हार मानणे, हतबल होणे.

उदाहरणार्थ :

भारताच्या ५० षटकांत ४२० धावा पाहून बांग्लादेशच्या संघाने नांगी टाकली.. :-) 
उत्तर लिहिले · 30/9/2018
कर्म · 75305
1
नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ - हातपाय गाळणे, घाबरणे असा होतो.
उत्तर लिहिले · 4/11/2018
कर्म · 350
0

नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ माघार घेणे किंवा शरणागती पत् करणे असा होतो.

उदाहरण:

  • समोरच्या बलाढ्य सैन्यापुढे विरोधकांनी नांगी टाकली.
  • खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही म्हटल्यावर, रमेशने नांगी टाकली.

याचा अर्थ असा होतो की, एखादी व्यक्ती जेव्हा एखादे काम करत असते आणि ते काम पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसते, तेव्हा ती माघार घेते किंवा हार मानते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

भाषा आणि बोली यातील साम्यभेद स्पष्ट करा?
ग्रामीण भाषेचे वेगळेपण स्पष्ट करा?
प्रमाणभाषा व बोलीभाषा यातील संबंध उलगडून दाखवा?
प्रमाणभाषा म्हणजे काय ते स्पष्ट करा?
डांगी भाषा महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात बोलली जाते?
बोलण्याच्या कौशल्यातील भाषेचे स्थान स्पष्ट करा?
अशोक ब्राह्मी किंवा मूळ मराठी लिपी मध्ये 'वाळ्त्त' हा तमिळ शब्द कसा लिहायचा?