कोणत्या भांड्यात जेवल्यास काय फायदा होतो?
🏚🏚🏚🏚🏚🏚🏚🏚🏚🏚
*👉🏽सोन्याची भांडी*
सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.
*👉🏽चांदीची भांडी*
चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.
*👉🏽कांस्यची भांडी*
कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्व नष्ट होतात.
*👉🏽तांब्याची भांडी*
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूष पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.
*👉🏽पितळेची भांडी*
पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्व नष्ट होतात.
*👉🏽लोखंडाची भांडी*
लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते.
*👉🏽स्टीलची भांडी*
स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.
*👉🏽एल्युमिनिअमची भांडी*
एल्युमिनिअम हे बॉक्साईट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिउमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात.
*👉🏽मातीची भांडी*
मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.
पाणी पिण्याच्या भांड्याच्या विषयी "भावप्रकाश ग्रंथा"मध्ये लिहिले आहे...
जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्।
पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्।
काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्।
(भावप्रकाश, पूर्वखंडः4)
अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि अंजलीतून पाणी पिऊ नये.
*टिप - माहीती आयुर्वेद आरोग्य विभागाच्या आधारे*
*संकलन श्री अरुण पगार*
👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽
विविध प्रकारच्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याचे आणि जेवण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
-
लोखंडी भांडी:
लोखंडी भांड्यांमध्ये जेवण बनवल्याने अन्नामध्ये लोह (Iron) मिसळते. लोहामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि ॲनिमिया (Anemia) म्हणजेच रक्ताची कमतरता दूर होते.
-
पितळेची भांडी:
पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते. तसेच, पोटाचे विकार कमी होतात.
-
कांशाची भांडी:
कांशाच्या भांड्यात जेवण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. तसेच, भूक वाढण्यास मदत होते.
-
तांब्याची भांडी:
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने ते शुद्ध होते. तांबे antimicrobial असल्याने ते जंतू मारते. (National Center for Biotechnology Information)
-
स्टीलची भांडी:
स्टीलची भांडी वापरण्यास सोपी आणि टिकाऊ असतात. ती गंज resistent असल्यामुळे सहजपणे खराब होत नाहीत.
-
ॲल्युमिनियमची भांडी:
ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते, कारण ॲल्युमिनियम अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते.
-
मातीची भांडी:
मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने अन्नाला नैसर्गिक स्वाद येतो आणि ते पौष्टिक राहते.
टीप: कोणतेही भांडे वापरण्यापूर्वी ते तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का, याची खात्री करा.
तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास, जरूर विचारा.