3 उत्तरे
3
answers
अतिशयोक्ती याचा काय अर्थ आहे?
7
Answer link
एखाद्या वस्तूचे किंवा कृतीचे वर्णन त्या वस्तूंच्या/ कृतीच्या वास्तविकतेहून फुगवून सांगणे/वाढवून सांगणे. उदाहरणार्थ:- एखादी इमारत खूप उंच आहे म्हणून तिचे वर्णन "गगनचुंबी इमारत" असे करणे. (गगन हे स्पर्श करता येणार नाही एवढ्या दूर अंतरावर आहे. तर त्याला स्पर्श ती इमारत करू शकेल का? नाही करू शकणार. पण त्या इमारतीचे उंचीविषयीचे वैशिष्ट्य लक्षात यावे या दृष्टीने तिचे वर्णन गगनचुंबी असे केले जाते. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला "हत्तीसारखा" अशी उपमा देणे. म्हणजेच अतिशयोक्ती करणे. अतिशय अधिक उक्ती म्हणजे अतिशयोक्ती.
1
Answer link
कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.
अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदाहरणार्थ..
१. जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
२. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
मुळ संकेतस्थळ..
मराठी अलंकार

0
Answer link
अतिशयोक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचे आहे त्यापेक्षा मोठे स्वरूप सांगणे.
जेव्हा आपण एखादी गोष्ट अधिक प्रभावी, नाट्यमय किंवा मनोरंजक बनवण्यासाठी वाढवून सांगतो, तेव्हा त्याला अतिशयोक्ती म्हणतात.
उदाहरण:
- "मी एवढा थकलो होतो की मला डोंगर चढण्याइतका कंटाळा आला होता."
- "माझ्याकडे बोलण्यासाठी खूप विषय आहेत."
अतिशयोक्ती हे एक प्रकारचे अलंकार आहे.
इंग्रजीमध्ये: Hyperbole
संदर्भ: