2 उत्तरे
2
answers
शरीराचे पोस्टमार्टम म्हणजे काय, ते का करतात?
18
Answer link
या लेखामध्ये तुम्हाला नेमकं पोस्टमार्टम म्हणजे काय समजेल
वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे, हॉस्पिटलच्या निष्काळजीमुळे किंवा अपघातात मृत्युमुखी पडल्यावर अनेकदा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो पोस्टमाॅर्टेमचा. कोणत्याही हॉस्पिटलच्या शवागर परिसराबाहेर नजर टाकली की चिंताग्रस्त नातेवाईक दिसतात. पोस्टमाॅर्टेम नको, असा प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. पण त्याची आवश्यकता का आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरमसज आणि त्याचे महत्त्व विषद करण्याचा हा प्रयत्न...
कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली तर मृतदेहाचे पोस्टमाॅर्टेम करावे लागते. पण मृताचे नातेवाईक अनेकदा पोस्टमाॅर्टेम नको, असा आग्रह धरतात. मात्र अशा प्रकरणात नियमाप्रमाणे व दंड विधानसंहितेतील तरतुदीनुसार पोस्टमाॅर्टेम करावे लागते. कायद्याने हे होत असल्याने त्यातून कोणालाही सूट देता येत नाही हे सर्वप्रमथ सर्वसामान्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
पोस्टमार्टेम करताना मृताचे सर्व अवयव काढून घेतले जातात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तसे नसते. शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी. लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते.
पोस्टमाॅर्टेम सेंटरबाबतही अनेक गैरसमज आहेत. यामधील कर्मचारी मद्यपान करूनच पोस्टमाॅर्टेम करतात असे सर्वसामान्यप्रमाणे बोलले जाते. पण हे एक ऑपरेशनच असल्याने सेंटरमधील कर्मचारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करतात. पोस्टमाॅर्टेमचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांनाच हे काम दिले जाते. मूळात हे काम करणाऱ्यांची कमतरता आहे. त्यासाठी सहजासहजी कोणी तयार होत नाही. त्यामुळे हे काम करणाऱ्यांना अधिक भत्ते दिले तर पोस्टमाॅर्टेमच्या कामासाठी अधिक कर्मचारी येतील आणि मृतांच्या नातेवाईकांची प्रतीक्षाही कमी होईल.
परवानग्यांच्या फेऱ्यात
पोस्टमाॅर्टेम झाल्यावर मृतदेह एका जिल्ह्याच्या हद्दीतून दुस-या जिल्ह्याच्या हद्दीत नेण्यासाठी नातेवाईकांना अनेक परवानग्यांचे सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यासाठी सर्वप्रथम स्थानिक पोलिस स्टेशनची परवागनी आवश्यक असते. त्यांची एनओसी घ्यावी लागते. मृतदेह बाहेरगावी नेण्यासाठी संबंधित पालिका हॉस्पिटल किंवा प्रशासकीय कार्यालयातून परवाना घ्यावा लागतो. बऱ्याचदा नातेवाईकांना याची माहिती नसल्याने वेळ व श्रम वाया जातात. पण त्याची माहिती सबंधित पोस्टमाॅर्टेम सेंटरमध्ये असणे आवश्यक आहे. मुंबईत असा परवाना राजावाडी, कूपर, कस्तुरबा व इतर सरकारी हॉस्पिटलमधून दिला जातो. जिल्हापातळीवर जिल्हा हॉस्पिटलमधून परवाना मिळतो. त्यामुळे पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरसमज मनातून काढून टाकण्याची गरज आहे.
धन्यवाद

0
Answer link
शवविच्छेदन (Postmortem) म्हणजे काय:
शवविच्छेदन, ज्याला ऑटोप्सी (Autopsy) देखील म्हणतात, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून मृत्यूचे कारण आणि मृत्यू कसा झाला हे शोधले जाते.
शवविच्छेदन का करतात:
- मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी.
- गुन्हेगारी प्रकरणात मृत्यू झाला असल्यास, गुन्ह्याची उकल करण्यासाठी.
- वैद्यकीय संशोधन आणि शिक्षणासाठी.
- सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे निष्कर्ष काढण्यासाठी.
- वारसा हक्काच्या दाव्यांसाठी (insurance claims).
शवविच्छेदनामुळे अनेक अज्ञात गोष्टींचा उलगडा होतो आणि न्याय मिळण्यास मदत होते.
अधिक माहितीसाठी:
- विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/शवविच्छेदन)