Topic icon

शवविच्छेदन

0
या लेखामध्ये तुम्हाला नेमकं पोस्टमार्टम म्हणजे काय समजेल

वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे, हॉस्पिटलच्या निष्काळजीमुळे किंवा अपघातात मृत्युमुखी पडल्यावर अनेकदा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो पोस्टमाॅर्टेमचा. कोणत्याही हॉस्पिटलच्या शवागर परिसराबाहेर नजर टाकली की चिंताग्रस्त नातेवाईक दिसतात. पोस्टमाॅर्टेम नको, असा प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. पण त्याची आवश्यकता का आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरमसज आणि त्याचे महत्त्व विषद करण्याचा हा प्रयत्न...

कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली तर मृतदेहाचे पोस्टमाॅर्टेम करावे लागते. पण मृताचे नातेवाईक अनेकदा पोस्टमाॅर्टेम नको, असा आग्रह धरतात. मात्र अशा प्रकरणात नियमाप्रमाणे व दंड विधानसंहितेतील तरतुदीनुसार पोस्टमाॅर्टेम करावे लागते. कायद्याने हे होत असल्याने त्यातून कोणालाही सूट देता येत नाही हे सर्वप्रमथ सर्वसामान्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
पोस्टमार्टेम करताना मृताचे सर्व अवयव काढून घेतले जातात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तसे नसते. शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी. लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते.
पोस्टमाॅर्टेम सेंटरबाबतही अनेक गैरसमज आहेत. यामधील कर्मचारी मद्यपान करूनच पोस्टमाॅर्टेम करतात असे सर्वसामान्यप्रमाणे बोलले जाते. पण हे एक ऑपरेशनच असल्याने सेंटरमधील कर्मचारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करतात. पोस्टमाॅर्टेमचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांनाच हे काम दिले जाते. मूळात हे काम करणाऱ्यांची कमतरता आहे. त्यासाठी सहजासहजी कोणी तयार होत नाही. त्यामुळे हे काम करणाऱ्यांना अधिक भत्ते दिले तर पोस्टमाॅर्टेमच्या कामासाठी अधिक कर्मचारी येतील आणि मृतांच्या नातेवाईकांची प्रतीक्षाही कमी होईल.
परवानग्यांच्या फेऱ्यात
पोस्टमाॅर्टेम झाल्यावर मृतदेह एका जिल्ह्याच्या हद्दीतून दुस-या जिल्ह्याच्या हद्दीत नेण्यासाठी नातेवाईकांना अनेक परवानग्यांचे सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यासाठी सर्वप्रथम स्थानिक पोलिस स्टेशनची परवागनी आवश्यक असते. त्यांची एनओसी घ्यावी लागते. मृतदेह बाहेरगावी नेण्यासाठी संबंधित पालिका हॉस्पिटल किंवा प्रशासकीय कार्यालयातून परवाना घ्यावा लागतो. बऱ्याचदा नातेवाईकांना याची माहिती नसल्याने वेळ व श्रम वाया जातात. पण त्याची माहिती सबंधित पोस्टमाॅर्टेम सेंटरमध्ये असणे आवश्यक आहे. मुंबईत असा परवाना राजावाडी, कूपर, कस्तुरबा व इतर सरकारी हॉस्पिटलमधून दिला जातो. जिल्हापातळीवर जिल्हा हॉस्पिटलमधून परवाना मिळतो. त्यामुळे पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरसमज मनातून काढून टाकण्याची गरज आहे.
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 53715
0

शवविच्छेदन (Postmortem) म्हणजे काय:

शवविच्छेदन, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटोप्सी (Autopsy) म्हणतात, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून मृत्यूचे कारण आणि मृत्यू कसा झाला हे शोधण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

शवविच्छेदन का करतात:

  • मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी:
  • अचानक झालेल्या मृत्यूचे किंवा संशयास्पद मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाते.

  • गुन्हेगारी प्रकरणात मदत:
  • खून किंवा विषबाधा सारख्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, शवविच्छेदनाने महत्वाचे पुरावे मिळू शकतात.

  • वैद्यकीय संशोधनासाठी:
  • शवविच्छेदनाद्वारे रोगांचे स्वरूप आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करता येतो.

  • शिक्षण:
  • वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीर आणि रोगांविषयी अधिक माहिती देण्यासाठी शवविच्छेदनाचा उपयोग होतो.

  • सार्वजनिक आरोग्याचे रक्षण:
  • एखाद्या साथीच्या रोगामुळे मृत्यू झाल्यास, त्याचे कारण शोधून सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवता येते.

शवविच्छेदन एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया आहे, जी मृत्यूचे रहस्य उघड करते आणि न्याय मिळवून देण्यास मदत करते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
18
विषय जरा गांभीर्याचा आहे आणि तेवढ्याच कुतूहलाचाही कारण आजचा विषय आहे शरीर विच्छेदनाचा म्हणजेच पोस्ट-मोर्टमचा. पोस्ट-मोर्टम हा शब्द आपण सर्वांनी ऐकला आहे आणि तो केव्हा आणि कोणत्या कारणासाठी केला जातो हेही आपल्याला माहिती आहेच. आज मी तुम्हाला सांगणार आहे कि पोस्ट-मोर्टम हे रात्री का केल्या जात नाही, नेहमी सकाळीच का केल्या जाते… चला तर सुरु करूया.

पोस्ट-मार्टम ही एक शल्य चिकित्सा आहे; जी “माणूस का बरं मेला असावा” याची पडताळणी करण्यासाठी केली जाते. पोस्ट-मार्टम करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या परीजनांनकडून परवानगी घेतली जाते आणि त्या नंतरच शस्त्रक्रियेला आरंभ होतो. पोस्ट-मार्टमबद्द्द्ल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी देह मृत्यूमुखी पडल्यानंतर ६ ते १० तासांतच पोस्ट-मार्टम करणे गरजेचे आहे. पण का?

असं केलं नाही तर मानवी शरीरात आणि अवयवांत नैसर्गिक बदल व्यायला लागतात आणि मग हात-पाय अकडणे, शरीर फुगणे यांसारख्या गोष्टी व्हायला लागतात. आता आणखी एक; मृतदेह जर जास्त वेळ प्रकाशात राहिले ट्यूबलाइटमुळे आणि बाकी कोणत्याही कृत्रिम प्रकाशामुळे शरीराला झालेल्या जखमांचे निशाण हे जांभळ्या रंगाचे दिसायला लागतात. ही गोष्ट फोरेन्सिक विज्ञानाला मान्य नाहीये. रात्री पोस्ट मोर्टम न करण्याचे एक कारण हेही आहे कि नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात जखमांचे निशाण वेग-वेगळे दिसतात आणि जर ते ओळखण्यात चूक केली आणि रिपोर्ट दिली तर कोर्ट फॉरेंसिकला चेतावणी आणि दंड दोन्ही देऊ सतो म्हणून पोस्ट मोर्टम हे दिवसाच्या प्रकाशातच केले जाते.
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 123540
6
शरीराचे शवविच्छेदन म्हणजे एखादया व्यक्तीचा मुत्यु झाला असेल तर त्याचे कारण काय असावे हे शोधण्याकरिता शवविच्छेदन केले जाते.
हे कायदयाने बंधनकारक आहे.
-------------------------------------------------

शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी,लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो.
त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते.
--------------------------------------------------

कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली तर मृतदेहाचे शवविच्छेदन करावे लागते.
पण मृताचे नातेवाईक अनेकदा शवविच्छेदन नको,असा आग्रह धरतात.
मात्र अशा प्रकरणात नियमाप्रमाणे व दंड विधानसंहितेतील तरतुदीनुसार शवविच्छेदन करावे लागते.
.
🙏🇮🇳
उत्तर लिहिले · 20/1/2019
कर्म · 22320
13
हे पोस्ट मोर्टम असतं. इंग्रजीत Post Mortem असं असतं..

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर करावयाची शरीर तपासणी.. तपासणीमध्ये डॉक्टर जर मृत्यू अकस्मात झाला असेल तर ती व्यक्ती कोणत्या कारणांमुळे देवाघरी गेलीयं ते शोधण्याचा प्रयत्न करतात. त्या दरम्यान ते शरीर उघडून आतमध्ये तपासणी करतात, अवयव कसे आहेत, रक्तात विषतर नाही, अंगाला कसले घाव आहेत का? साप वैगरे चावला आहे का? विषबाधा झालय का ? असं सगळ चेक करतात आणि मग ठरवतात मृत्यू मागची कारणे..

दुसरा प्रकार हा की ज्यात व्यक्तीचा मृत्यू अकस्मात न होता, वृद्धपणामुळे, दिर्घ आजारामुळे झालायं.. ह्या प्रकारच्या पोस्ट मोर्टम मध्ये डॉक्टर मृताच्या घरच्यांनी परवानगी घेऊन किंवा मृताची मरणोत्तर इच्छा असतांना काही अवयव काढूण घेतात. जसे किडनी, डोळे आणि ते कोणा जीवित व्यक्तिंसाठी वापरुन त्यांना जीवनदान देतात..

परंतु आजकाल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात वाईटवृत्ती जास्त झाली असल्यामुळे त्याच त्याच गोळ्या देणे, मृत झालेले असता वेंटिलेटरला लावुन ठेवणे, उगाच आजार भयंकर दाखवणे हे सर्रास होत आहे.. ह्यात पोस्ट मोर्टम च्या रिपोर्ट सहज बदलल्या जातात, परवानगीशिवाय अवयव काढून घेतले जातात असे प्रकार खुप होत आहे..
उत्तर लिहिले · 26/10/2018
कर्म · 75305
8
                                                                                
                                 • शवविच्छेदन •
उत्तर लिहिले · 7/9/2018
कर्म · 458560
3
लेखामध्ये तुम्हाला नेमकं पोस्टमार्टम म्हणजे काय समजेल 

वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे, हॉस्पिटलच्या निष्काळजीमुळे किंवा अपघातात मृत्युमुखी पडल्यावर अनेकदा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो पोस्टमाॅर्टेमचा. कोणत्याही हॉस्पिटलच्या शवागर परिसराबाहेर नजर टाकली की चिंताग्रस्त नातेवाईक दिसतात. पोस्टमाॅर्टेम नको, असा प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. पण त्याची आवश्यकता का आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरमसज आणि त्याचे महत्त्व विषद करण्याचा हा प्रयत्न... 

कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली तर मृतदेहाचे पोस्टमाॅर्टेम करावे लागते. पण मृताचे नातेवाईक अनेकदा पोस्टमाॅर्टेम नको, असा आग्रह धरतात. मात्र अशा प्रकरणात नियमाप्रमाणे व दंड विधानसंहितेतील तरतुदीनुसार पोस्टमाॅर्टेम करावे लागते. कायद्याने हे होत असल्याने त्यातून कोणालाही सूट देता येत नाही हे सर्वप्रमथ सर्वसामान्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. 
पोस्टमार्टेम करताना मृताचे सर्व अवयव काढून घेतले जातात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तसे नसते. शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी. लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते. 
पोस्टमाॅर्टेम सेंटरबाबतही अनेक गैरसमज आहेत. यामधील कर्मचारी मद्यपान करूनच पोस्टमाॅर्टेम करतात असे सर्वसामान्यप्रमाणे बोलले जाते. पण हे एक ऑपरेशनच असल्याने सेंटरमधील कर्मचारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करतात. पोस्टमाॅर्टेमचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांनाच हे काम दिले जाते. मूळात हे काम करणाऱ्यांची कमतरता आहे. त्यासाठी सहजासहजी कोणी तयार होत नाही. त्यामुळे हे काम करणाऱ्यांना अधिक भत्ते दिले तर पोस्टमाॅर्टेमच्या कामासाठी अधिक कर्मचारी येतील आणि मृतांच्या नातेवाईकांची प्रतीक्षाही कमी होईल. 
परवानग्यांच्या फेऱ्यात 
पोस्टमाॅर्टेम झाल्यावर मृतदेह एका जिल्ह्याच्या हद्दीतून दुस-या जिल्ह्याच्या हद्दीत नेण्यासाठी नातेवाईकांना अनेक परवानग्यांचे सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यासाठी सर्वप्रथम स्थानिक पोलिस स्टेशनची परवागनी आवश्यक असते. त्यांची एनओसी घ्यावी लागते. मृतदेह बाहेरगावी नेण्यासाठी संबंधित पालिका हॉस्पिटल किंवा प्रशासकीय कार्यालयातून परवाना घ्यावा लागतो. बऱ्याचदा नातेवाईकांना याची माहिती नसल्याने वेळ व श्रम वाया जातात. पण त्याची माहिती सबंधित पोस्टमाॅर्टेम सेंटरमध्ये असणे आवश्यक आहे. मुंबईत असा परवाना राजावाडी, कूपर, कस्तुरबा व इतर सरकारी हॉस्पिटलमधून दिला जातो. जिल्हापातळीवर जिल्हा हॉस्पिटलमधून परवाना मिळतो. त्यामुळे पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरसमज मनातून काढून टाकण्याची गरज आहे. 

धन्यवाद
उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 20585