3 उत्तरे
3 answers

नेमके पोस्टमार्टम म्हणजे काय ?

3
लेखामध्ये तुम्हाला नेमकं पोस्टमार्टम म्हणजे काय समजेल 

वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे, हॉस्पिटलच्या निष्काळजीमुळे किंवा अपघातात मृत्युमुखी पडल्यावर अनेकदा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो पोस्टमाॅर्टेमचा. कोणत्याही हॉस्पिटलच्या शवागर परिसराबाहेर नजर टाकली की चिंताग्रस्त नातेवाईक दिसतात. पोस्टमाॅर्टेम नको, असा प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. पण त्याची आवश्यकता का आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरमसज आणि त्याचे महत्त्व विषद करण्याचा हा प्रयत्न... 

कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली तर मृतदेहाचे पोस्टमाॅर्टेम करावे लागते. पण मृताचे नातेवाईक अनेकदा पोस्टमाॅर्टेम नको, असा आग्रह धरतात. मात्र अशा प्रकरणात नियमाप्रमाणे व दंड विधानसंहितेतील तरतुदीनुसार पोस्टमाॅर्टेम करावे लागते. कायद्याने हे होत असल्याने त्यातून कोणालाही सूट देता येत नाही हे सर्वप्रमथ सर्वसामान्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. 
पोस्टमार्टेम करताना मृताचे सर्व अवयव काढून घेतले जातात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तसे नसते. शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी. लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते. 
पोस्टमाॅर्टेम सेंटरबाबतही अनेक गैरसमज आहेत. यामधील कर्मचारी मद्यपान करूनच पोस्टमाॅर्टेम करतात असे सर्वसामान्यप्रमाणे बोलले जाते. पण हे एक ऑपरेशनच असल्याने सेंटरमधील कर्मचारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करतात. पोस्टमाॅर्टेमचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांनाच हे काम दिले जाते. मूळात हे काम करणाऱ्यांची कमतरता आहे. त्यासाठी सहजासहजी कोणी तयार होत नाही. त्यामुळे हे काम करणाऱ्यांना अधिक भत्ते दिले तर पोस्टमाॅर्टेमच्या कामासाठी अधिक कर्मचारी येतील आणि मृतांच्या नातेवाईकांची प्रतीक्षाही कमी होईल. 
परवानग्यांच्या फेऱ्यात 
पोस्टमाॅर्टेम झाल्यावर मृतदेह एका जिल्ह्याच्या हद्दीतून दुस-या जिल्ह्याच्या हद्दीत नेण्यासाठी नातेवाईकांना अनेक परवानग्यांचे सोपस्कार पार पाडावे लागतात. त्यासाठी सर्वप्रथम स्थानिक पोलिस स्टेशनची परवागनी आवश्यक असते. त्यांची एनओसी घ्यावी लागते. मृतदेह बाहेरगावी नेण्यासाठी संबंधित पालिका हॉस्पिटल किंवा प्रशासकीय कार्यालयातून परवाना घ्यावा लागतो. बऱ्याचदा नातेवाईकांना याची माहिती नसल्याने वेळ व श्रम वाया जातात. पण त्याची माहिती सबंधित पोस्टमाॅर्टेम सेंटरमध्ये असणे आवश्यक आहे. मुंबईत असा परवाना राजावाडी, कूपर, कस्तुरबा व इतर सरकारी हॉस्पिटलमधून दिला जातो. जिल्हापातळीवर जिल्हा हॉस्पिटलमधून परवाना मिळतो. त्यामुळे पोस्टमाॅर्टेमबाबतचे गैरसमज मनातून काढून टाकण्याची गरज आहे. 

धन्यवाद
उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 20585
1
शवविच्छेदन क्रिया मराठीमध्ये म्हणतात. मृत्यूचे कारण पाहण्यासाठी ही क्रिया करतात.
उत्तर लिहिले · 27/8/2018
कर्म · 8710
0

पोस्ट मार्टम (Post Mortem) म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डॉक्टर त्याच्या शरीराची तपासणी करतात. या तपासणीला ‘पोस्ट मार्टम’ किंवा ‘शवविच्छेदन’ म्हणतात.

पोस्ट मार्टम का करतात?

  • मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्यासाठी.
  • मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, हे जाणून घेण्यासाठी.
  • खून झाला आहे की आत्महत्या, हे तपासण्यासाठी.
  • नैसर्गिक मृत्यू आहे की অন্য काही কারণে झाला आहे, हे पाहण्यासाठी.

पोस्ट मार्टम कसे करतात?

पोस्ट मार्टम करण्यासाठी, डॉक्टर মৃতदेहला कापून त्याच्या आतील अवयवांची तपासणी करतात. ते अवयव व्यवस्थित काम करत होते की नाही, त्यात काही दोष होता का, हे पाहतात. काही वेळा, ते अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवतात, ज्यामुळे मृत्यूचे कारण अधिक स्पष्टपणे समजू शकते.

पोस्ट मार्टम हे मुख्यतः पोलिसांना आणि कोर्टाला मृत्यूच्या कारणांची माहिती देण्यासाठी केले जाते.

तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

वैद्यकीय दृष्ट्या मनुष्य म्हातारा होतो म्हणजे काय होतं?
वैद्यकीय दृष्ट्या माणूस म्हातारा होता म्हणजे काय?
वैद्यकीय माणूस मात्र होतो म्हणजे काय?
वैद्यकीय दृष्ट्या माणूस म्हातारा होतो म्हणजे काय?
बंगालमध्ये देवीच्या रोगावरील देवीच्या लशी कधी उपलब्ध झाल्या?
What is blood? Name different blood cells with normal values.
शरीराचे पोस्टमार्टम म्हणजे काय व ते का करतात?