5 उत्तरे
5
answers
साप चावल्यावर काय करावे?
13
Answer link
साप चावल्यावर त्याचे विष अंगात भिनू देऊ नये व त्यासाठी अंगावर ज्या ठिकाणी साप चावला आहे त्याच्या खालच्या व वरच्या बाजूला कपड्याने करकचून आवळून बांधावे जेणेकरून विष अंगात पसरायला विरोध होईल. तसेच हाताने दाबून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर साप चावल्यावर पेशंटला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.
3
Answer link
*🐍साप चावल्यास कोणते उपाय करावेत..?*
*🔰📶महा डिजी | दक्षता व प्रथमोपचार*
*🐍साप चावल्यानंतर काय करावे ? या ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !!*

साप चावला की माणूस भीतीनेच अर्धा मरतो. मग काही कधी वाचलेले-ऐकलेले प्रथमोपचार आठवतात आणि आपण माणूस वाचवायचा प्रयत्न करतो. ही वेळ तशी कधी सांगून येत नाही. म्हणूनच आज महा डिजी अपडेट सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करु नये याची माहिती घेऊन आलं आहे. या साध्यासोप्या ७ गोष्टी लक्षात ठेवल्या, तर आपलं आणि अशा अडचणीत सापडलेल्यांचं आयुष्य थोडं सुखकर होईल..
🐍 जर तुम्हाला सापाने दंश केलं असेल तर ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच थांबा. अजिबात चालू नका. कारण चालल्याने विष पटकन शरिरात पसरतं. जिथे सापाने दंश केला तिथला भाग घट्ट बांधा, ज्यामुळे विष वर शरीरात चढणार नाही.
📍१. जगात फक्त २०% साप विषारी असतात. तुम्हाला चावलेला साप विषारी जरी निघाला तरी त्याचा दंश विषारी असेल याची शक्यता फक्त ५०% असते. बऱ्याच वेळा साप 'कोरडा दंश' (म्हणजे विनाविषाचा दंश) देतो. पण जर तुम्हाला दुर्दैवाने 'ओला दंश' (म्हणजे विषारी दंश) झाला असेल तरी सुद्धा घाबरून जायचे कारण नाही. योग्य आणि वेळेत मिळालेल्या वैद्यकीय सेवेने तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही.

♦२. साप चावल्यानंतर माणूस फार घाबरून जातो. त्यामुळे त्याचा हृदयाचा वेग वाढून शरीरात विष अधिक गतीने पसरु लागते. म्हणून धैर्य आणि विश्वास बाळगा. प्रथम एका सुरक्षित/मोकळ्या जागेवर जा व खाली बसून घ्या. एकटे असाल तर त्वरित १०८ किंवा ११२ नंबरवर फोन करून अम्ब्युलन्सला थोडक्यात आपली माहिती सांगा (नाव, पत्ता आणि प्रॉब्लेम). जवळच्या लोकांना बोलावून घ्या. एकटे नसाल तर आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन लवकरात लवकर जवळचे इस्पितळ गाठा. तिथे डॉक्टर तुम्हाला अँटी-वेनम देतील. दंश केलेल्या सापाचे थोडेफार जरी वर्णन करता आले तरी डॉक्टरांना मदतच होईल. सापाचा रंग, लांबी, पट्टे, मानेवरील रेषा, वगैरे अशी महिती तुम्ही देऊ शकलात तर उत्तम. तुम्हाला जर साप नीट दिसला नसेल तरीही अडचण नाही. पण सापाला पकडायला अथवा मारायला जाऊ नका. तसे केल्यास तो पुन्हा चावण्याची शक्यता तर असतेच, शिवाय तुम्ही तुमचा अनमोल वेळसुद्धा वाया घालवता.

📍३. घट्ट कपडे (उदा. जीन्स, लेनिन्स किंवा तंग शर्ट) घातले असतील तर ते काढा अथवा तो भाग कापून/फाडून टाका. इतर गोष्टी (उदा. अंगठी, घड्याळ, इत्यादी) घातले असतील तर ते सुद्धा काढून ठेवा. असे का? कारण चावलेल्या जागी सूज निर्माण होऊ शकते. साप त्याचे विष रक्तप्रवाहात सोडतो त्यामुळे 'जखम कापून विषारी रक्त वाहून जाईल' हा समज चुकीचा आहे. उलट त्याने जखमेत इन्फेक्शन होऊ शकते. जखमेवर बर्फ लावू नका कारण त्याने जखम चिघळू शकते. बरं, मग काय करावे?

आपल्याकडे तेव्हा तीन पर्याय असतात:
▪अ). जवळपास जाड काठी/लाकडी फळी असेल तर त्याने संबंधित भाग चिंध्यांनी किंवा दोरीने बांधणे म्हणजे त्याची हालचाल होणार नाही. ह्याला 'स्प्लिन्ट' लावणे असं म्हणतात.
▪ब) विष शरीरात पसरू नये म्हणून लोक संबंधित भागाच्या वर करकचून दोरी किंवा कापड बांधतात. पण असे करणे अतिशय धोकादायक आहे कारण संबंधित भागाला पुरेसा रक्तपुरवठा पोहोचत नाही. त्यामुळे कायमची हानी किंवा गँगरिन सुद्धा होऊ शकते. रक्तपुरवठा बंद करण्याच्या साधनाला ‘टोरणीक्वेट’ असं म्हणतात, जे तुम्हाला लावायचे नाहीये. त्यापेक्षा तुमच्याजवळ रुमाल असेल तर तो जखमेवर दाबून ठेवा व तो भाग ओढणीने किंवा कापडाने (१ बोटाचे अंतर ठेऊन) लपेटून घ्या. याला 'कॉम्प्रेस बँडेज' लावणे असं म्हणतात.
क) जर तुमच्यापाशी रुमाल किंवा काठी नसेल तरी चिंतेची बाब नाही. लक्षात असू द्या की तुम्हाला संबंधित भागाची कमीत कमी हालचाल करायची आहे. जर हाताला दंश झाला असेल तर तो हात आपल्या हृदयाच्या लेवलला आणावा ज्यामुळे विष संक्रमणाचा वेग कमी होऊन जातो.

♦४. साप चावल्यानंतर काहीही खाऊ/पिऊ नका. उदा. अल्कोहोल, कॅफिन अशी पेये तर नक्कीच घेऊ नका. असे केल्यास हृदयाचा वेग वाढून शरीरात विष लवकर पसरू लागते आणि तेच आपल्याला टाळायचे आहे.
📍५. एक महत्वाची सूचना. 'तोंडाने विष शोषून थुंकून देणे' ही सिनेसृष्टीने तयार केलेली एक चुकीची व धोकादायक संकल्पना आहे. याने चोखणाऱ्याच्या तोंडात विष तर पसरेलच, शिवाय जखमेत इन्फेक्शनसुद्धा पसरू शकते.

♦६. मुळात साप चावू नये यासाठी काय करावं? सतर्क राहून निसर्गभ्रमण करा. साप दिसला तर उगाच सापाची छेड काढायला जाऊ नका. वाढलेल्या गवतात अनवाणी जाऊ नका. ट्रेकिंग करत असाल तर जाड बूट व डबल फुल पँट घाला. झाडाझुडपांमधून/ जंगलातून ट्रेक करतांना मुद्दाम पायाचा आवाज करत चाला. हातात एक मोठी काठीसुद्धा असूद्या आणि ती जमिनीवर आदळत चाला. आपण निर्माण केलेल्या कंपनांमुळे वाटेत असलेले साप, कोळी, अथवा इतर घातक कीटक स्वतः होऊन लांब पळून जातात.
📍७. साप कधी चावतो?- असुरक्षित वाटल्यावर, दचकल्यावर, छेड काढल्यावर, किंवा घेरल्यावर. साप माणसांच्या वस्तीत का येतात?- माणसांच्या वस्तीत वाढलेली उंदीर, घुशींसारखी भक्ष्यसंख्या सापांना आकर्षित करतात. त्यामुळे वेळीच पेस्ट कंट्रोल करून घेणे आवश्यक आहे.
अशा प्रसंगांच्या वेळेस डगमगून न जाता नीट काळजी घ्या आणि निरोगी राहा.

📎 https://youtu.be/IVIXd5_Kcsc
📎 https://www.youtube.com/watch?v=DFFzJIy-ak8
*🎙साप- विंचू चावल्यास : घरगुती उपाय*
🦋 पावसाळ्यात घराच्या आसपास गवत झाडेझुडपे तयार होतात. यामुळे साप-विंचू असे प्राणी आपल्या घराच्या आसपास असण्याच्या शक्यता वाढतात.
🦇 यातील एखादा किटक जर आपल्याला चावला घरगुती उपाय :
🦞 जर तुम्हाला विंचू चावला तर हळद गरम करून विंचूने जिथे डंख मारला तिथे लावा.
🦟 जर मुंगी किंवा मधमाशी चावली तर विक्स किंवा कांद्याचा रस चावलेल्या भागावर लावावा यामुळे आराम मिळतो.
🐀 उंदराने चावले असता घरात असलेला जुना नारळ जो लाल होऊन खराब झाला असेल तो थोडा किसून घ्या आणि त्यात मुळ्याचा रस मिसळून चावलेल्या भागावर लावा.
🕷 जर तुम्हाला कोळीने चावलं तर सर्वात आधी तो भाग स्वच्छ धुवून घ्या. आमचूर अर्थात आंब्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट चावलेल्या भागावर लावा.
__________________________
▪ सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे व 108 नंबरवर कॉल करून रुग्णवाहिका बोलविणे व दवाखान्यात घेऊन जाणे
▪ साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे.
▪सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता आहे, तिला मानसिक आधार द्यावा. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
▪ त्याचे मन बोलण्यात गुंतवावे. म्हणजे, मनावरचा ताण हलका होईल.
▪ त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही त्यामुळे विष शरीरभर जाण्याची प्रक्रिया मंद होईल.
▪ जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. त्यावर जंतुनाशक लावावे.
▪ तोंडाने रक्त शोषून विष उतरवण्याचे कोणतेही प्रयत्न मुळीच करू नयेत.
▪ दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
▪जखमेवर बर्फ लावू नये. तसेच, जखम चोळू नये.
▪दंश झालेल्या ठिकाणाच्या थोडी वरच्या बाजूस एक आवळपट्टी बांधावी.
▪आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट ठेवून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे.
▪ दवाखाना दूर असल्यास दर 15 ते 20 मिनिटांनंतर आवळपट्टी 15 सेकंदांसाठी सोडावी व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावी. त्यामुळे आवश्यक त्या रक्ताभिसरणात अडचण तर येणार नाही पण रक्तातील विष भिनण्यात अडथळा येईल. पट्टी थोडी सैल ठेवावी. म्हणजे, त्या भागातील मुख्य रक्तप्रवाह थांबणार नाही.
▪ सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. असल्या गावठी उपायाचा काहीच फायदा होत नाही
▪सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ दवाखान्यात दाखल करा. त्याला वाहनाने रुग्णालयात न्यावे. चालत किंवा घाईने धावत नेऊ नये.
▪ डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणतीही अॅलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.
▪सर्पदंशावर एकमेव उपाय म्हणजे प्रतिसर्पविष (स्नेक अँटिव्हेनिन) हेच होय, जे शासकीय सामान्य रुग्णालयात मोफत दिले जाते. सर्पदंशावर हाफकिनचे ‘अँन्टीस्नेक वेनम सिरम'(ASVS) हे अतिशय प्रभावी औषध आहे. तशीच इतरही औषधे उपलब्ध आहेत.
*🛑साप चावल्यास काय करू नये..?*
▪मांत्रिकाच्या मागे लागून वेळ फुकट घालवू नका. सापाचे विष मंत्राने उतरवता येत नाही. ही एक अंधश्रद्धा आहे
▪ सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका.
▪ रक्तप्रवाह थांबेल अशी आवळपट्टी अवयवास बांधू नका. यामुळे त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबूही शकतो. त्यामुळे अवयव कायमचा निकामी होऊ शकतो.
▪ जखमेतून रक्त काढू नये, तसेच जखम कापू नये किंवा चोखू नये. याचा काहीही उपयोग नसतो. उलट ते घातकच ठरू शकते.
▪ सर्पदंश झालेल्या जागेवर गरम केलेले लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे तसे करू नका.
▪ एक उपाय म्हणून काही लोक एकामागे एक कोंबड्यांचे गुदद्वार जखमेला दाबून लावतात. याचा काहीच उपयोग नसतो. फक्त कोंबड्या मात्र मरतात.! ही एक अंधश्रद्धा आहे
____________________________________
*🌐💁♂️आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

0
Answer link
सर्पदंश झाल्यास करावयाची प्राथमिक उपाययोजना खालीलप्रमाणे:
-
शांत राहा: घाबरल्यामुळे हृदय गती वाढते आणि विष लवकर पसरते. त्यामुळे शांत राहणे आवश्यक आहे.
-
हालचाल टाळा: शक्य असल्यास कमी हालचाल करा. ज्या अवयवाला साप चावला आहे, तो स्थिर ठेवा.
-
जखमेवरील कपडे/आभूषणे: सापाने चावा घेतलेल्या भागावरील घड्याळ, अंगठी किंवा इतर कपडे तसेच आभूषणे तत्काळ काढून टाका.
-
जखमेची तपासणी: जखमेचे निरीक्षण करा आणि विषारी आहे की नाही हे तपासा.
-
वैद्यकीय मदत: तातडीने वैद्यकीय मदत मिळवा. शक्य असल्यास रुग्णवाहिका बोलवा किंवा लवकर दवाखान्यात जा.
हे करू नका:
-
जखमेतून विष चोखण्याचा प्रयत्न करू नका.
-
जखमेवर बर्फ लावू नका.
-
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
ॲम्ब्युलन्सला केव्हा बोलवावे:
-
जर चावलेला साप विषारी असेल.
-
जर चावलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल.
-
जर चावलेल्या व्यक्तीला छातीत दुखत असेल.
टीप: सर्पदंश झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा आणि गैरसमजांपासून दूर राहा.
अधिक माहितीसाठी:
* सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये? [https://www.lokmat.news/maharashtra/what-to-do-and-what-not-to-do-if-bitten-by-snake-agk98/](https://www.lokmat.news/maharashtra/what-to-do-and-what-not-to-do-if-bitten-by-snake-agk98/)
* सर्पदंश झाल्यावर काय उपचार घ्यावेत? [https://www.tv9marathi.com/health/what-are-the-treatments-to-be-taken-after-snake-bite-ayurvedic-and-allopathic-treatment-knc-137292.html](https://www.tv9marathi.com/health/what-are-the-treatments-to-be-taken-after-snake-bite-ayurvedic-and-allopathic-treatment-knc-137292.html)