3 उत्तरे
3
answers
कलियुग म्हणजे काय?
12
Answer link
हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील चौथा भाग म्हणजे कलि युग होय.
वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी ८ व्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.
वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी ८ व्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.
2
Answer link
हिन्दु धर्मातील ग्रंथाचया आधारे युगे ही चार प्रकारची आहेत.
1 .सत्ययुग.
2.त्रेतायुग.
3.द्वापारयुग.
4.कलियुग
अशा प्रकारे चार प्रकारात युगाची विभागणी केली आहे.सध्या कलियुग चालू आहे त्याला पाच हजार वर्ष लोटली असे जाणकारांचे म्हणणे आहे.प्रत्येक युगाचा कालावधी आहे.कला तिस आहेत.याच कला विधींचा मुहूर्त होय. मुहूर्त नी मानवाचे दिवस ,रात्र होतात. पंधरा दिवसांचा एक पक्ष म्हणजेच पंधरवाडा होय. दोन पक्षांचा एक महिना होतो. सहा महिन्यांचे एक आयन होते. दक्षिणायन व उत्तरायण हे एका वर्षाचे दोन भाग आहेत दक्षिणायनाच्या वेळी देवांची रात्र तर उत्तरायणाच्या वेळी दिवस असतो म्हणून शक्यतो संत लोक समाधी घेताना उत्तरायण बघतात अशाप्रकारे एक सहस्र वर्षाचे सत्ययुग, त्रेतायुग ,द्वापार युग व कलियुग इत्यादी चार योग्य होतात .अशा क्रमाने जेव्हा चार युगांची एक सहस्र चौकडी म्हणजेच चार सहस्त्र वर्षे पूर्ण होतात त्यावेळी ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. या एक दिवसात 14 मनु होतात .शेवटी संपूर्ण तरी त्रैलोक्य जळून जाते जलमय होते .परमेश्वर त्यानंतर बराच काळ विश्रांती घेतो त्यानंतर पुन्हा ब्रह्मदेव या जगाची निर्माती करतो. अशा प्रकारे ग्रंथात लिहिले आहे.
.सर्वप्रथम सत्ययुग होते त्यावेळी सर्व माणसे नारायणाची सेवा करण्यात तत्पर राहत असत.त्यामुळे लोकांना दुःख रोग याचा त्रास नसे ते या गोष्टीपासून मुक्त असत. सत्य युगात सर्व माणसे सत्य बोलत .सर्वांच्या मनात दया असे.
त्या काळी माणूस दीर्घायुष्य होता. धनधान्य भरपुर असे हिंसा किंवा अहंकार भावनेचा त्या काळात परिणाम नव्हता. सर्वांच्या मनात दुसऱ्याचे चांगले करण्याचे विचार असायचे .राजे धर्माने वागत असत. प्रजेचे पालन आनंदाने करीत असत .त्यामुळे अधर्म बिलकुल नव्हता. अशा प्रकारे सत्य युग होते.
त्रेतायुगात माणूस एक पाऊल थोडा पुढे गेला म्हणजेच पाप रहित मनुष्य वाईट वागण्याचा विचार करू लागला त्यामुळे लोकांना थोडे दुःख निर्माण होऊ लागले पण ते प्रमाण फार थोडे होते. सर्वसामान्य माणूस देवपूजा यज्ञयाग दानधर्म करीत होता वर्ण आश्रमा प्रमाणे काम करीत होता .शेत जमीन करीत होता व्यवसाय करीत होता .धर्माप्रमाणे वागत होता. ब्राह्मण सुद्धा वेदांचे अध्ययन करून त्याप्रमाणे वागत होते . एकंदरीत या युगात सुद्धा चांगल्या प्रकारे चालले होते.
यानंतर तिसरे द्वापार युग येते. या युगात मनुष्यप्राणी सुख दुःखाने त्रासला होता बरेच लोक वाईट कर्म तसेच पाप कर्मात मग्न झाले होते तर काही लोक धार्मिक वृत्तीचे होते .काही लोक गुणवान तर काही पुण्यवान लोक सुखाने जीवन जगत होते .या काळात ब्राह्मण थोडेसे विपरीत वागायला लागले होते दक्षिणा घेण्याच्या लोभाने ते लोकांना त्रास देऊ लागले होते. राजे सुद्धा प्रजेचे पालन व्यवस्थित करीत नव्हते. धर्म अजून एक थोडा पाउल खाली आला होता . पापा कडे वळला होता.
चौथा आणी शेवटचा युग म्हणजे कलियुग तो सध्या चालू आहे. कलियुग संपूर्ण पणे धर्मापासून वेगळा झाला आहे. कलियुगात धर्म केवळ नावापुरता उरला आहे. या युगात ब्राह्मण तसेच सर्व वर्णाचे लोक पाप मग्न आहेत .मनुष्य अत्यंत कामी स्वभावाचा आणि क्रूर रुदयाचा झाला आहे .वेदशास्त्र ग्रंथ परमार्थाची निंदा करणे, जुगार खेळणे, चोरी करणे अशा स्वभावाची माणसे या कलियुगात निर्माण झाली आहेत. कलियुगात विधवा स्त्री हि सुरक्षित नाही तिच्याविषयी सुद्धा पुरुषांना मोह होतो. पोट भरण्यासाठी ब्राह्मण त्यांची विद्या वापरतात .सर्व माणसे मदिरा आणि स्त्रियांची संग करण्यासाठी उत्सुक असतात. दुसऱ्याचे धन कसे अपहरण करावे याच वृत्तीत कलियुगातील माणूस असतो धर्म व्रत हे नावालाच आहेत. या कलियुगात सर्व पाखंडी लोक राहतात ब्राह्मण शूद्र सारखा व्यवहार करतात. चांगली समजदार माणसे सुद्धा नीच काम करायला तयार होतात .नीच माणसे या कलियुगात राज्यकारभार करतात. जीवश्च कंठश्च मित्र सुद्धा एकमेकाविरुद्ध खोटी साक्ष देतात लोक एकमेकाची निंदा करतात समोर फक्त गोड बोलतात स्री या चरित्र हीन झाल्या आहेत. पतीसमोर साध्वी सती सावित्रीचा आव आणतात. श्री जात भयंकर चंचल झालेली आहे या युगातील सर्व माणसांचे विचार आणि भाव वाईट दूषित झाले आहेत शेतीचे उत्पन्न कमी झालेले आहे पाऊस अनियमित पडतो वादळ भूकंप अशी नैसर्गिक हानी सतत होत असते अनेक प्रकारचे आजार रोग या कलियुगात मानवाला त्रास देत आहेत. कलियुगात सतत ईश्वराची निंदा केली जाईल चांगल्या माणसांना हाल-अपेष्टा भोगाव्या लागतील असत्याचा विजय सत्याचा पराजय हेच कलियुगाचा ब्रीद वाक्य असेल.
अशा प्रकारे कलियुग अतिउच्च वाईट पातळीवर जाईल आणी या जगाचा विनाश होईल असे धर्म ग्रंथात सांगितले आहे.
0
Answer link
कलियुग हे हिंदू धर्मातील चार युगांपैकी चौथे युग आहे. इतर तीन युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग.
कलियुगाची काही वैशिष्ट्ये:
- हे युग सर्वात लहान आहे.
- या युगात, मानवांमध्ये धार्मिकता, नैतिकता आणि सद्गुण कमी होतात.
- पाप आणि वाईट गोष्टी वाढतात.
- माणसे अल्पायुषी आणि दुर्बळ होतात.
कलयुगाचा कालावधी: कलयुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे असे मानले जाते. ह्या युगाचा आरंभ इ.स. पूर्व ३१०२ मध्ये झाला, जेव्हा महाभारत युद्ध संपले आणि भगवान कृष्णाने देह सोडला.
कलयुगामध्ये, भगवतगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे, अधर्म वाढतो आणि धर्म घटतो. ह्या युगात माणसांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता: