शब्दाचा अर्थ फरक उत्पादन वॉरंटी

गॅरंटी आणि वॉरंटी मध्ये काय फरक आहे?

4 उत्तरे
4 answers

गॅरंटी आणि वॉरंटी मध्ये काय फरक आहे?

15
माझ्या माहितीनुसार
●गॅरंटी :-
   जर खरेदी केलेली एखादी वस्तू ठराविक काळामध्ये खराब झाली/काही बिघाड झाला तर त्या बदल्यात   नवीन वस्तू दिली जाईल.यास गॅरंटी म्हणतात.

●वॉरंटी:-
दिलेल्या कालावधीत खरेदी केलेली वस्तू बिघडली तर तीच वस्तू फक्त दुरुस्त करून दिली जाते.(नवीन मिळत नाही) यास वॉरंटी म्हणतात.
उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 123540
3
💁🏻 _*गॅरंटी आणि वॉरंटी मधला फरक समजून घ्या?*_


🛒 _कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेलो की सर्वात आधी आपण त्याची गॅरंटी आणि वॉरंटी किती आहे हे नक्की तपासून बघतो, त्यानंतरच ती वस्तू खरेदी करतो. दुकानात जाणारा आणि वस्तू विकत घेणारा प्रत्येक ग्राहक हे दोन शब्द अनेकदा उच्चारत असतो. खरेदी विक्रीच्या व्यवसायात ह्या गॅरंटी आणि वॉरंटीचा खूप मोठा वाटा असतो._

🤔 _*आधी वॉरंटी म्हणजे नेमकं काय?*_
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ती वस्तू बनविणाऱ्याने ती वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकाला वचन देणे की, एका मर्यादित काळापर्यंत ती वस्तू खराब होणार नाही आणि त्याची क्वालिटी कमी होणार नाही.म्हणजेच ती वस्तू ग्राहकाच्या अपेक्षांवर खरी उतरेल ह्याची शाश्वती देणे.

🤔 _*आता जाणून घेऊ गॅरंटी म्हणजे काय ?*_
गॅरंटी हे देखील कंपनीने ग्राहकाला दिलेलं एक वचनच असतं. त्या वस्तूच्या क्वालिटी संबंधीचे वचन. पण वॉरंटीच्या तुलनेत गॅरंटीचे जास्त महत्व असते.जर एखाद्या कंपनीने तुम्हाला एखादी वस्तू विकली आणि त्यावर त्यांनी तुम्हाला ५ वर्षांची गॅरंटी दिली. म्हणजे पाच वर्षांत त्या वस्तूला काही जरी झाले तरी त्याचा जाब आपण त्या कंपनीला विचारू शकता.

🤔 _*आता गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊ*_

◆ जेव्हा आपण गॅरंटी बाबत बोलत असतो तेव्हा त्या वस्तूला काही झाले तर त्याचा पूर्ण पैसा वापस येण्याची किंवा रिप्लेसमेंटची शाश्वती असे समजल्या जाते.

◆ तर वॉरंटीमध्ये निव्वळ त्या वस्तूची सुधारणा आणि मेंटेनन्स एवढचं असतं. त्यामुळे गॅरंटीला जास्त महत्व दिले जाते.

◆ वॉरंटी लेटर मध्ये एक निश्चत काळ दिलेला असतो म्हणजे त्या निश्हीत काळापर्यंतच आपण क्लेम करू शकतो.

◆ तर गॅरंटी देताना कंपन्या अतिशय चातुर्याने त्याचे नियम बांधत असतात. गॅरंटी ही फार कमी कालावधीसाठी दिली जाते.त्यासोबतच अनेक नियम कायदे अन अटी देखील घातल्या जातात.

📍गॅरंटी ही कोणत्याही पेमेंटशिवाय झालेला करार आहे, परंतु वॉरंटी ही एक कायदेशीर इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला विक्रेता/निर्मात्यावर त्या करारानुसार सर्विस न दिल्याबाबत आरोप करण्यासाठी वैध कायदेशीर कागदपत्र म्हणून वापरले जाऊ शकते.
___________==========____________
उत्तर लिहिले · 5/3/2019
कर्म · 569265
0

गॅरंटी (Guarantee) आणि वॉरंटी (Warranty) ह्या दोन्ही उत्पादनांसोबत दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत, परंतु दोहोंमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत:

  • गॅरंटी (Guarantee):
    • गॅरंटी म्हणजे उत्पादन जसे सांगितले आहे तसेच काम करेल याची खात्री.
    • जर उत्पादन खराब झाले किंवा अपेक्षेप्रमाणे काम करत नसेल, तर ते बदलून मिळेल किंवा पैसे परत मिळतील.
    • गॅरंटीमध्ये विक्रेता उत्पादनाची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेची जबाबदारी घेतो.
  • वॉरंटी (Warranty):
    • वॉरंटी म्हणजे उत्पादन विशिष्ट कालावधीत कोणत्याही दोषांशिवाय काम करेल याची हमी.
    • वॉरंटीमध्ये उत्पादन खराब झाल्यास, ते दुरुस्त करून दिले जाते. काही वेळा, दुरुस्ती शक्य नसल्यास, उत्पादन बदलून देखील दिले जाते.
    • वॉंरटीमध्ये उत्पादनातील दोष आणि त्रुटी सुधारण्याची जबाबदारी कंपनीची असते.
मुख्य फरक:
  • गॅरंटी उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते, तर वॉरंटी उत्पादनातील दोषांवर लक्ष केंद्रित करते.
  • गॅरंटीमध्ये उत्पादन बदलून मिळण्याची किंवा पैसे परत मिळण्याची शक्यता असते, तर वॉरंटीमध्ये उत्पादन दुरुस्त करून देण्यावर भर दिला जातो.

थोडक्यात, गॅरंटी म्हणजे 'उत्पादन ठीक काम करेल याची खात्री' आणि वॉरंटी म्हणजे 'उत्पादनात काही दोष आढळल्यास ते दुरुस्त केले जाईल याची हमी'.

अधिक माहितीसाठी:
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मी 3 महिन्यांपूर्वी नवीन फ्रिज आणि वॉशिंग मशीन घेतले आहे, वॉरंटीमध्ये आहे. परवा आलेल्या महापुरामध्ये दोन्ही भिजले आहेत, तरी ते रिप्लेसमेंट करून नवीन मिळतील का?
नवीन फोर व्हील कार गाडी घेतांना एक्सटेंडेड वॉरंटी घ्यावी का?
वॉरंटी आणि गॅरंटी म्हणजे काय?
वॉरंटी आणि गॅरंटी मध्ये फरक काय?
वॉरंटी आणि गॅरंटीमधील फरक काय?
सीएट कंपनीचा टायर आहे आणि तो टाकून पाच-सहा महिने झाले आहेत, परंतु टायर फुटला आहे आणि तो रिपेअर करण्यासारखा राहिला नाही, तरी कंपनी तो बदलून देईल का? डीलरकडून घेतला आहे.