शब्दाचा अर्थ उत्पादन वॉरंटी

वॉरंटी आणि गॅरंटी म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

वॉरंटी आणि गॅरंटी म्हणजे काय?

12
गॅरंटी म्हणजे तुम्ही वस्तू खरेदी केल्यानंतर जर ती सदोष असेल तर पूर्ण वस्तू तुम्हाला बदलून मिळते, तर वॉरंटी म्हणजे सदोष वस्तू तुम्हाला दुरुस्त करून मिळते. वॉरंटी मध्ये वस्तू दुरुस्त करताना सर्व्हिस चार्ज आकारला जात नाही, फक्त जो भाग सदोष आहे त्याची किंमत आकारली जाते व ती वस्तू दुरुस्त करून मिळते.
उत्तर लिहिले · 29/1/2018
कर्म · 210095
5
*_🤔गॅरंटी आणि वॉरंटी मधला फरक काय?_*


_कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेलो की सर्वात आधी आपण त्याची गॅरंटी आणि वॉरंटी किती आहे हे नक्की तपासून बघतो, त्यानंतरच ती वस्तू खरेदी करतो. दुकानात जाणारा आणि वस्तू विकत घेणारा प्रत्येक ग्राहक हे दोन शब्द अनेकदा उच्चारत असतो. खरेदी विक्रीच्या व्यवसायात ह्या गॅरंटी आणि वॉरंटीचा खूप मोठा वाटा असतो._

*_🤔आधी वॉरंटी म्हणजे नेमकं काय? हे आपण जाणून घेऊ…_*
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ती वस्तू बनविणाऱ्याने ती वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकाला वचन देणे की, एका मर्यादित काळापर्यंत ती वस्तू खराब होणार नाही आणि त्याची क्वालिटी कमी होणार नाही.म्हणजेच ती वस्तू ग्राहकाच्या अपेक्षांवर खरी उतरेल ह्याची शाश्वती देणे.

*_🤔आता जाणून घेऊ गॅरंटी म्हणजे काय ?_*
गॅरंटी हे देखील कंपनीने ग्राहकाला दिलेलं एक वचनच असतं. त्या वस्तूच्या क्वालिटी संबंधीचे वचन. पण वॉरंटीच्या तुलनेत गॅरंटीचे जास्त महत्व असते.जर एखाद्या कंपनीने तुम्हाला एखादी वस्तू विकली आणि त्यावर त्यांनी तुम्हाला ५ वर्षांची गॅरंटी दिली. म्हणजे पाच वर्षांत त्या वस्तूला काही जरी झाले तरी त्याचा जाब आपण त्या कंपनीला विचारू शकता.

*_🤔आता गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊ…_*

◼जेव्हा आपण गॅरंटी बाबत बोलत असतो तेव्हा त्या वस्तूला काही झाले तर त्याचा पूर्ण पैसा वापस येण्याची किंवा रिप्लेसमेंटची शाश्वती असे समजल्या जाते.

◼तर वॉरंटीमध्ये निव्वळ त्या वस्तूची सुधारणा आणि मेंटेनन्स एवढचं असतं. त्यामुळे गॅरंटीला जास्त महत्व दिले जाते.

◼वॉरंटी लेटर मध्ये एक निश्चत काळ दिलेला असतो म्हणजे त्या निश्हीत काळापर्यंतच आपण क्लेम करू शकतो.

◼तर गॅरंटी देताना कंपन्या अतिशय चातुर्याने त्याचे नियम बांधत असतात. गॅरंटी ही फार कमी कालावधीसाठी दिली जाते.त्यासोबतच अनेक नियम कायदे अन अटी देखील घातल्या जातात.

*_📍गॅरंटी ही कोणत्याही पेमेंटशिवाय झालेला करार आहे, परंतु वॉरंटी ही एक कायदेशीर इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला विक्रेता/निर्मात्यावर त्या करारानुसार सर्विस न दिल्याबाबत आरोप करण्यासाठी वैध कायदेशीर कागदपत्र म्हणून वापरले जाऊ शकते._*
उत्तर लिहिले · 3/3/2019
कर्म · 569265
0

वॉरंटी (Warranty) आणि गॅरंटी (Guarantee) ह्या दोन्ही संज्ञा वस्तू किंवा सेवेच्या गुणवत्तेबद्दल विक्रेत्याकडून दिले जाणारे आश्वासन दर्शवतात, पण त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत.

वॉरंटी (Warranty):

  • वॉरंटी म्हणजे विक्रेता वस्तूमध्ये असलेले दोष दुरुस्त करण्याची किंवा बदलून देण्याची जबाबदारी घेतो.
  • हे विशिष्ट कालावधीसाठी असते.
  • वॉरंटीमध्ये काही अटी व शर्ती लागू असू शकतात.
  • वॉरंटी सामान्यतः उत्पादनातील दोष, खराब मटेरियल किंवा योग्य कामामध्ये अयशस्वी झाल्यास लागू होते.

गॅरंटी (Guarantee):

  • गॅरंटी म्हणजे विक्रेता वस्तूच्या गुणवत्तेची आणि कार्यक्षमतेची खात्री देतो.
  • गॅरंटी वॉरंटीपेक्षा अधिक व्यापक असू शकते. यात वस्तू बदलून देणे, पैसे परत करणे किंवा इतर उपाययोजना करणे समाविष्ट असू शकते.
  • गॅरंटीमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो.

उदाहरण:

एखाद्या फ्रिजवर 5 वर्षांची वॉरंटी आहे, याचा अर्थ असा की 5 वर्षांच्या आत फ्रिजमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास कंपनी ते दुरुस्त करून देईल. गॅरंटी असल्यास, विक्रेता विशिष्ट कालावधीत उत्पादनperformance देईल याची खात्री देतो आणि तसे न झाल्यास भरपाई देतो.

निष्कर्ष:

वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहेत. खरेदी करताना या संज्ञांची माहिती असणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मी 3 महिन्यांपूर्वी नवीन फ्रिज आणि वॉशिंग मशीन घेतले आहे, वॉरंटीमध्ये आहे. परवा आलेल्या महापुरामध्ये दोन्ही भिजले आहेत, तरी ते रिप्लेसमेंट करून नवीन मिळतील का?
नवीन फोर व्हील कार गाडी घेतांना एक्सटेंडेड वॉरंटी घ्यावी का?
गॅरंटी आणि वॉरंटी मध्ये काय फरक आहे?
वॉरंटी आणि गॅरंटी मध्ये फरक काय?
वॉरंटी आणि गॅरंटीमधील फरक काय?
सीएट कंपनीचा टायर आहे आणि तो टाकून पाच-सहा महिने झाले आहेत, परंतु टायर फुटला आहे आणि तो रिपेअर करण्यासारखा राहिला नाही, तरी कंपनी तो बदलून देईल का? डीलरकडून घेतला आहे.