अन्न जात व कुळे धार्मिक श्रद्धा आहार

जैन बांधव कांदा आणि लसूण का खात नाहीत?

2 उत्तरे
2 answers

जैन बांधव कांदा आणि लसूण का खात नाहीत?

26
जैन बांधव कांदा आणि लसूण का खात नाहीत? जाणून घ्या.

जेवणाची लज्जत वाढवण्यात लसूण आणि कांदा खूप मोलाची भूमिका बजावतात, हे आपल्याला माहिती आहेच. या दोन्ही भाज्यांमुळे जेवणाला वेगळीच चव येते आणि ते आजून चटकदार बनते, हे मात्र नक्की आहे. पण बऱ्याचदा आपल्याला कानी पडतं की कांदा लसूण नाही खायला हवं, मुख्यतः जर आपला मित्र ब्राम्हण किंवा जैन समाजाचा असेल तर त्याचा तोंडून आपण हे नेहमी ऐकत असतो.
सात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जातं असतं कारण लसूण आणि कांदा तामसिक पदार्थ आहेत ज्यामुळे प्रकृतिवर दुष्परिणाम होत असतो.
अश्यावेळी आपण विचार करतो की तामसिक भोजन म्हणजे नेमकं काय? लसूण आणि कांद्याचा त्याच्याशी काय संबंध? असं म्हटलं जातं की जेवणाचा मनावर खूप परिणाम होत असतो. जे अन्न आपण खातो, तसेच आपले विचार ही तयार होत जातात. तर आपण या मागील पुराणिक आणि सामाजिक तत्व जाणून घेऊयात. तर चला जाणून घेऊया लसूण आणि कांद्याने असं नेमकं काय होतं ते !

आयुर्वेदानुसार भोजनाचे तीन प्रकार असतात- सात्विक , राजसिक आणि तामसिक. यापैकी सात्विक भोजन केल्याने शांती , संयम या सारखे गुण विकसित होऊन मनाची पवित्रता वाढत जाते. राजसिक भोजन केल्याने काम करण्याची इच्छा वाढते आणि स्वभाव आनंदी होतो. परंतु तामसिक भोजन केल्याने अहंकार वाढतो, वाईट कल्पना मनात येतात, मन अशांत होते, लहान लहान गोष्टींवर चिडचिड होते.
लसूण आणि कांद्याशी निगडित पौराणीक कथेबद्दल जाणून घेऊयात. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णु समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे “मोहिनी” रूप धारण करून देवी देवतांमध्ये वाटप करत होते तेव्हा तेथे दोन राक्षस देखील येऊन बसले त्यांचं नाव होतं राहू आणि केतू, त्यांना अमृताचे काही थेंब हाती लागले. परंतु जेव्हा भगवान विष्णूंना राक्षसांचा कपटाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी त्या दोन्ही राक्षसांचं डोकं धडावेगळ केलं.
मुंडकं धडावेगळं केल्याने ते अमृताचे थेंब जमिनीवर कोसळले आणि त्यातून कांदा व लसूण यांचा जन्म झाला. अमृतापासून तयार झाल्याने रोगांशी लढण्यासाठी आवश्यक गुण या दोघांत अमृतामुळे होते. परंतु राक्षसमुखातून बाहेर पडल्याने अत्यंत घाण असा वास त्यातून यायचा त्यामुळेच त्यांना अपवित्र म्हटलं जातं होतं.
शास्त्रीय कारण – लसूण आणि कांदा दोघी हज उष्णअवर्धक पदार्थ आहेत. दोन्ही पदार्थ ग्रहण केल्यावर शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेच यांना तामसिक भोजन श्रेणीत गणले जाते. ह्या पदार्थांचं सेवन केल्याने काम वासना देखील प्रचंड वाढते. ज्यामुळे माणसात अपप्रवृत्तीचा संचार होतो. मनुष्य आध्यात्म, चिंतन या पासून लांब जातो व स्वभाव अतिशय उग्र होतो.
आता हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं की या धारणा आणि मान्यता यांचा स्वीकार कितपत करायचा आहे. लसूण व कांदा यांची जेवणातील मात्रा किती ठेवायची आहे. एवढं मात्र कायम लक्षात असू द्या की आपल्या भोजनाचा सरळ संबंध हा आपल्या आचार विचार व आरोग्याशी असतो. तमोगुणाने मानसिक विकृती वाढिस लागते. जे पुढे जाऊन अडचणीचे ठरू शकते.
*______________________________*

*सौजन्य-माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव, जि. कोल्हापूर  💤_*



उत्तर लिहिले · 12/6/2018
कर्म · 569245
0

जैन धर्माचे अनुयायी कांदा आणि लसूण खाणे टाळतात, याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • अहिंसा: जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व आहे. कांदा आणि लसूण हे जमिनीच्या आत वाढतात आणि ते काढताना अनेक सूक्ष्म जीव मारले जाण्याची शक्यता असते. जैन धर्मात कोणतीही जीवहत्या टाळणे महत्त्वाचे मानले जाते.
  • तामसिक गुण: आयुर्वेदामध्ये कांदा आणि लसूण यांना तामसिक मानले जाते. तामसिक म्हणजे ते पदार्थ जे उत्तेजना वाढवतात आणि मानसिक शांती भंग करतात. जैन साधू आणि अनुयायी सात्विक जीवनशैलीचे पालन करतात, ज्यामुळे ते तामसिक पदार्थ टाळतात.
  • वास आणि चव: कांदा आणि लसूण यांचा वास तीव्र असतो आणि ते खाल्ल्यानंतर श्वासाला वास येतो. जैन धर्मात साधेपणा आणि शुद्धता यावर भर दिला जातो, त्यामुळे हे पदार्थ टाळले जातात.

या कारणांमुळे जैन बांधव कांदा आणि लसूण खाणे टाळतात.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1660

Related Questions

शनिदेवाची मूर्ती देवघरात का पूजत नाहीत?
धर्माची वैशिष्ट्ये सांगा?
निजानंद संप्रदायाबद्दल माहिती हवी आहे?
देवाच्या मूर्तीचे तोंड पूर्वेस आणि पश्चिमेस का असतात?
एका लहानशा मंदिरात तीन-चार देवतांच्या मूर्ती ठेवणे योग्य आहे का? तसेच हे मंदिर दक्षिण दिशेला तोंड करून असल्यास काही हरकत असू शकते का?
प्रत्येक देवळाच्या गाभाऱ्यात जाताना प्रथम कासव का असते?
पांडुरंगाच्या कानामध्ये मासे का घातलेले असतात?