
धार्मिक श्रद्धा
*⭕ शनिदेवाच्या चेहरयाकडे पाहु नका, डोळयात पाहुन दर्शन घ्या ⭕*
_________________________
दि १८ जुलै २०२०
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_750.html
शनिवार हा दिवस शनि देवाचा मानला गेला आहे.शनीदेवाबाबत म्हटले जाते की त्यांची दृष्टी सरळ कोणावर पडली तर तो भस्म होतो. त्यामुळे त्यांची पूजा करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. शनिदेवाची नाराजी आणि प्रसन्नता दोन्ही खतरनाक मानली जाते. कारण शनी देव नाराज किंवा प्रसन्न झाले तर ते सरळ त्याची दृष्टी भक्तांवर पडते आणि भक्तांचा नाश होऊ शकतो.
भगवान शनी खूप रागीट देवता मानले जातात. जर नकळही त्यांच्या पूजनात चूक झाली, तर भगवान शनीदेव त्याला माफ करत नाही. त्यामुळे भगवान शनी देवाची पूजा करताना काही गोष्टी लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे.
तुम्ही कोणाच्या घरातील देवघरात शनिची मुर्ती पाहिली आहे का? नाही ना. त्याला कारणही तसेच आहे.
शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, उलट असे म्हणतात की घराबाहेरच्या मंदिरात जाऊन शनी महाराजची पूजा करण्याचे विधान आहे. असे मानले जाते की शनिदेवाला शाप मिळाला आहे की ते ज्यांना पाहतील त्याचा नाश होईल.
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
आणि म्हणून शनिदेवाची दृष्टी टाळण्यासाठी त्यांची मूर्ती घरात ठेवू नये.जर तुम्ही मंदिरात शनिदेवाचे दर्शन घ्यायला गेलात तर त्याचे पाय पाहा नाकी त्यांच्या डोळ्यांत पाहून नमस्कार करा.
अशा परिस्थितीत तुम्हाला शनिदेवाची घरीच पूजा करायची असेल तर ते तुमच्या मनात ध्यान करून पूजा करा. तसेच शनिवारी हनुमान जीची पूजा करावी व शनिदेवाची आठवण करावी. याने शनीदेव खूष होतात.
*▪️या गोष्टी लक्षात ठेवा. ▪️*
‼️शनिदेवाची मूर्ती या प्रतिमा घरात नाही ठेवली पाहिजे. त्यांची पूजा ही मंदिरात किंवा मनातल्या मनात केली पाहिजे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट.
‼️शनी देवाला जल किंवा तेल अर्पण करण्यासाठी कोणत्याही धातूचा वापर करू नका. त्यांच्याव तेल अर्पण करण्यासाठी लोखंडाच्या पात्राचा वापर करावा. तांब्याचा पात्राचा उपयोग चुकूनही करू नका. ‼️शनी देवावर तेल अर्पण करताना त्यांच्यावरही पडेल याची काळजी घ्या, इतरत्र पडणार नाही याची खबरदारी बाळगा.
‼️शनी देवावर लाल रंगाची वस्तू अर्पण करू नका. यात लाल रंगाचे फूल किंवा लाल रंगाचा कपडा चूकूनही अर्पण करू नका.
‼️काळा रंगासंदर्भातील गोष्टी शनी देवाला अर्पित करा.
‼️शनी देवावर तेल अर्पण करत असाल तर त्यात काळे तीळ टाका, नुसते तेल अर्पण करू नका.
‼️ शनीदेवाचे पूजन करताना सरळ समोर उभे राहू नका. बाजूने त्यांचे दर्शन घ्या किंवा पूजा करा.
‼️ शनी देवाची पूजा अशा ठिकाणी जाऊन करा, ज्या ठिकाणी ते शिळेच्या रुपात विराजमान असतील.
‼️शनिवारी पिंपळाच्या झाडावर जल आणि दीपक लावा. हे फक्त शनिवारी करा.
या लेखाचा उद्देश अंधश्रध्दा पसरवण्याचा नाही. भक्तानी वाचावे, अभक्तानी सोडुन दयावे.

धर्माचे वैशिष्ट्य
प्रामाण्यबुदि्धर्वेदेषु साधनानामनेकता ।
उपास्यानामनियमः एतद् धर्मस्य लक्षणम् ।। – लोकमान्य टिळक
अर्थ : वेदांना प्रमाण मानणे, साधनेचे अनेक मार्ग उपलब्ध असणे, उपासनेविषयी अवाजवी कट्टरता नसणे, हे (हिंदु) धर्माचे लक्षण आहे.
या लेखातून आपल्याला ‘धर्माची महती अन् त्याचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व’ लक्षात आले असेलच !
सद्यस्थितीत धर्माविषयी असलेले अपसमज दूर होणे आवश्यक आहे. सर्व मानवजात एकत्र येण्यासाठी धर्म हा अपरिहार्य आहे. या दृष्टीकोनातून या लेखमालिकेत धर्म शब्दाचा अर्थ, महत्त्व, प्रकार, धर्माची विविध अंगे आणि रहस्य, धर्मसिद्धान्त, धर्म आणि संस्कृती अन् नीती यांतील भेद, धर्मग्लानी आणि अवतार, धर्माच्या संदर्भात भारताचे महत्त्व, धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना इत्यादी विविध सूत्रांचे विवेचन केले आहे.
निजानंद संप्रदाय: एक परिचय
निजानंद संप्रदाय हा एक कृष्ण-भक्ति संप्रदाय आहे, जो प्रामुख्याने भारताच्या गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पसरलेला आहे. या संप्रदायाची शिकवण आणि विचार प्रेम, भक्ती आणि आत्म-साक्षात्कारावर आधारित आहेत.
इतिहास आणि संस्थापक:
निजानंद संप्रदायाची स्थापना 17 व्या शतकात श्री देवचंद्रजी महाराज यांनी केली. त्यांना 'महामती' म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी 'कुलजम स्वरूप' नावाचा ग्रंथ लिहिला, जो या संप्रदायाचा आधार आहे.
मुख्य सिद्धांत:
- एकत्व: या संप्रदायानुसार, आत्मा आणि परमात्मा एकच आहेत.
- प्रेम आणि भक्ती: निजानंद संप्रदाय प्रेम आणि भक्तीच्या माध्यमातून देवाला प्राप्त करण्यावर जोर देतो.
- कुलजम स्वरूप: हा ग्रंथ या संप्रदायाचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यात आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन दिलेले आहे.
अनुयायी आणि प्रसार:
निजानंद संप्रदायाचे अनुयायी भारत आणि जगभरात पसरलेले आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये या संप्रदायाचे मोठे अनुयायी आहेत.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही निजानंद संप्रदायाबद्दल अधिक माहितीसाठी काही संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
1. जागेची उपलब्धता:
मंदिरात मूर्ती ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी. प्रत्येक मूर्तीला योग्य प्रकारे ठेवता आले पाहिजे आणि त्यांची नियमित पूजा करता येणे शक्य असले पाहिजे.
2. मूर्तींची निवड:
एकाच मंदिरात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती ठेवताना त्या एकमेकांशी संबंधित असाव्यात किंवा त्यांची पूजा एकाच पद्धतीने केली जात असावी. उदाहरणार्थ, शिव, पार्वती आणि गणेश यांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जाऊ शकतात.
3. मंदिराची दिशा:
मंदिराची दिशा महत्त्वाची असते. दक्षिण दिशेला तोंड असलेले मंदिर काहीवेळा अशुभ मानले जाते, परंतु या संदर्भात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे. काही विशिष्ट परिस्थितीत दक्षिण दिशेला असलेले मंदिर देखील शुभ मानले जाते.
4. पूजा पद्धती:
प्रत्येक देवतेची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे, जर तुम्ही एकाच मंदिरात अनेक मूर्ती ठेवणार असाल, तर तुम्हाला त्या सर्वांच्या पूजेसाठी योग्य पद्धती आणि विधींचे पालन करावे लागेल.
5. धार्मिक मान्यता:
या संदर्भात तुमच्या कुटुंबातील किंवा परिसरातील धार्मिक गुरुंचा सल्ला घेणे उत्तम राहील. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
दक्षिण दिशेचे मंदिर:
दक्षिण दिशा नेहमीच अशुभ मानली जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट परिस्थितीत दक्षिण दिशा फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे, मंदिराची दिशा निश्चित करण्यापूर्वी वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेणे उचित आहे.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता:
जेवणाची लज्जत वाढवण्यात लसूण आणि कांदा खूप मोलाची भूमिका बजावतात, हे आपल्याला माहिती आहेच. या दोन्ही भाज्यांमुळे जेवणाला वेगळीच चव येते आणि ते आजून चटकदार बनते, हे मात्र नक्की आहे. पण बऱ्याचदा आपल्याला कानी पडतं की कांदा लसूण नाही खायला हवं, मुख्यतः जर आपला मित्र ब्राम्हण किंवा जैन समाजाचा असेल तर त्याचा तोंडून आपण हे नेहमी ऐकत असतो.
सात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जातं असतं कारण लसूण आणि कांदा तामसिक पदार्थ आहेत ज्यामुळे प्रकृतिवर दुष्परिणाम होत असतो.
अश्यावेळी आपण विचार करतो की तामसिक भोजन म्हणजे नेमकं काय? लसूण आणि कांद्याचा त्याच्याशी काय संबंध? असं म्हटलं जातं की जेवणाचा मनावर खूप परिणाम होत असतो. जे अन्न आपण खातो, तसेच आपले विचार ही तयार होत जातात. तर आपण या मागील पुराणिक आणि सामाजिक तत्व जाणून घेऊयात. तर चला जाणून घेऊया लसूण आणि कांद्याने असं नेमकं काय होतं ते !
आयुर्वेदानुसार भोजनाचे तीन प्रकार असतात- सात्विक , राजसिक आणि तामसिक. यापैकी सात्विक भोजन केल्याने शांती , संयम या सारखे गुण विकसित होऊन मनाची पवित्रता वाढत जाते. राजसिक भोजन केल्याने काम करण्याची इच्छा वाढते आणि स्वभाव आनंदी होतो. परंतु तामसिक भोजन केल्याने अहंकार वाढतो, वाईट कल्पना मनात येतात, मन अशांत होते, लहान लहान गोष्टींवर चिडचिड होते.
लसूण आणि कांद्याशी निगडित पौराणीक कथेबद्दल जाणून घेऊयात. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णु समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे “मोहिनी” रूप धारण करून देवी देवतांमध्ये वाटप करत होते तेव्हा तेथे दोन राक्षस देखील येऊन बसले त्यांचं नाव होतं राहू आणि केतू, त्यांना अमृताचे काही थेंब हाती लागले. परंतु जेव्हा भगवान विष्णूंना राक्षसांचा कपटाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी त्या दोन्ही राक्षसांचं डोकं धडावेगळ केलं.
मुंडकं धडावेगळं केल्याने ते अमृताचे थेंब जमिनीवर कोसळले आणि त्यातून कांदा व लसूण यांचा जन्म झाला. अमृतापासून तयार झाल्याने रोगांशी लढण्यासाठी आवश्यक गुण या दोघांत अमृतामुळे होते. परंतु राक्षसमुखातून बाहेर पडल्याने अत्यंत घाण असा वास त्यातून यायचा त्यामुळेच त्यांना अपवित्र म्हटलं जातं होतं.
शास्त्रीय कारण – लसूण आणि कांदा दोघी हज उष्णअवर्धक पदार्थ आहेत. दोन्ही पदार्थ ग्रहण केल्यावर शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेच यांना तामसिक भोजन श्रेणीत गणले जाते. ह्या पदार्थांचं सेवन केल्याने काम वासना देखील प्रचंड वाढते. ज्यामुळे माणसात अपप्रवृत्तीचा संचार होतो. मनुष्य आध्यात्म, चिंतन या पासून लांब जातो व स्वभाव अतिशय उग्र होतो.
आता हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं की या धारणा आणि मान्यता यांचा स्वीकार कितपत करायचा आहे. लसूण व कांदा यांची जेवणातील मात्रा किती ठेवायची आहे. एवढं मात्र कायम लक्षात असू द्या की आपल्या भोजनाचा सरळ संबंध हा आपल्या आचार विचार व आरोग्याशी असतो. तमोगुणाने मानसिक विकृती वाढिस लागते. जे पुढे जाऊन अडचणीचे ठरू शकते.
*______________________________*
*सौजन्य-माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव, जि. कोल्हापूर 💤_*
तर चला जाणून घेऊ या ....
जेव्हा आपण मंदिरात देवाच्या मूर्ती समोर जाऊन दर्शन घ्यायला जातो तेव्हा आपल्यातील षढ विकार,अहंकार,दुष्ट भावना कासवाप्रमाणे अंकुचित करून देवाला शरण जावे...नतमस्तक व्हावे.
◆या शिवाय अजून काही कारणे आहेत ते पुढील प्रमाणे
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो.
★कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते. ?कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे.
◆ कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.
◆ काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे.
◆आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.
*कासवाचे गुण* ?
1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात
काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर
कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे
?
2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.
3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा
यांकरीता कासव मंदिरात असते.
?
४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.
*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ*
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.
■श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असणे
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते.
■कासवाचे गुण◆
१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.
२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.
३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.
कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.