कुतूहल पाणी फिल्टर प्लास्टिक विज्ञान

वॉटर बॉटल्सच्या खाली जे 1, 2, 3, 4, 5 नंबर असतात त्याचे उपयोग काय?

2 उत्तरे
2 answers

वॉटर बॉटल्सच्या खाली जे 1, 2, 3, 4, 5 नंबर असतात त्याचे उपयोग काय?

13
आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी आहे याचे grade wise केलेले मानांकन म्हणजे बॉटल च्या खाली दिलेले नंबर.

तुम्ही दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर मग हे नक्की वाचा

मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे....
यासाठी प्रथम
प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूया????

खरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते…

प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आहे.

प्लास्टिकची ग्रेडिंग प्रणाली म्हणून ओळखण्यासाठी प्लास्टीकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक तयार केले गेले आहे. खालील प्लास्टिक ग्रेड आहेत:

ग्रेड 1 (त्रिकोणात 1) :
लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी (Only One Time Use) सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.

ग्रेड 2, 4 व 5 (त्रिकोणात 2, 4 व 5 ) :
पॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या पुन्हा, पुन्हा वापरांसाठी (Reuse For Regular Use) उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं  तरच त्या सुरक्षित असतात.

ग्रेड 3 व 7 (त्रिकोणात 3 किंवा 7) :
3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतो टाळा (Avoid Use) कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

असे आहे तर मग कोणत्या ग्रेडची प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास चांगली......

खरे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिणेच चांगले, तरीपण........

मर्यादित वापरासाठी ग्रेड 2, 4 आणि 5 योग्य आहेत. (फक्त नियमितपणे निर्जंतुक करणे आवश्यक)

तर ग्रेड 1, 3, 6, आणि 7 यांचा वापर टाळवा.

विशेष सूचना : पाण्याच्या
प्लास्टिकच्या बॉटल व्यतिरिक्त ईतर ठिकाणी सुद्धा प्लास्टिकचा वापर करोत असतो.

या साठी आपण प्रत्येकाने एक चांगली सवय लावून घेने गरजेचे आहे की,

प्लास्टिकची वस्तू दिसली रे दिसली की ती उलटी करुन तिची त्रिकोणातील ग्रेड तपासायची असा प्रयत्न केल्याने तुमचा अभ्यास भी वाढेल व तुम्ही स्वतःच्या आरोग्य बाबत सदैव जागरूक राहाल.
उत्तर लिहिले · 4/6/2018
कर्म · 5060
0
div >

वॉटर बॉटल्सच्या खाली असलेले 1, 2, 3, 4, 5 हे नंबर प्लास्टिकचे प्रकार दर्शवतात. प्रत्येक नंबर पुनर्वापर करण्याच्या क्षमतेचे आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे संकेत देतो.

  1. 1 (PET किंवा PETE):

    या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर सामान्यतः डिस्पोजेबल पाण्याच्या बाटल्या आणि सोडा बाटल्या बनवण्यासाठी होतो. हे प्लास्टिक पुनर्वापर करणे सुरक्षित मानले जाते, परंतु ते पुन्हा वापरण्यासाठी नाही. वारंवार वापरल्याने त्यातून हानिकारक रसायने पाण्यात मिसळू शकतात.

  2. 2 (HDPE):

    उच्च घनता पॉलीथिलीन (High-Density Polyethylene) हे प्लास्टिक टिकाऊ असते आणि ते पुनर्वापरासाठी सुरक्षित मानले जाते. दूध, ज्यूसच्या बाटल्या आणि डिटर्जंटच्या बाटल्या बनवण्यासाठी याचा वापर होतो.

  3. 3 (PVC किंवा V):

    पॉलीविनाइल क्लोराईड (Polyvinyl Chloride) हे प्लास्टिक क्वचितच पुनर्वापर केले जाते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. पाईप्स आणि काही खाद्यपदार्थांच्या कंटेनरमध्ये याचा वापर होतो.

  4. 4 (LDPE):

    कमी घनता पॉलीथिलीन (Low-Density Polyethylene) हे प्लास्टिक लवचिक असते आणि मुख्यतः प्लास्टिकच्या पिशव्या बनवण्यासाठी वापरले जाते. हे पुनर्वापरासाठी सुरक्षित मानले जाते.

  5. 5 (PP):

    पॉलीप्रॉपिलीन (Polypropylene) हे प्लास्टिक मजबूत आणि उष्णता प्रतिरोधक असते. याचा वापर दहीचे कप, औषधांच्या बाटल्या आणि स्ट्रॉ बनवण्यासाठी होतो. हे पुनर्वापरासाठी सुरक्षित मानले जाते.

  6. 6 (PS):

    पॉलीस्टাইरीन (Polystyrene) म्हणजेच स्टायरोफोम, हे प्लास्टिक डिस्पोजेबल कप आणि खाद्यपदार्थांचे कंटेनर बनवण्यासाठी वापरले जाते. हे पुनर्वापरासाठी योग्य नाही आणि आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

  7. 7 (Other):

    या श्रेणीत इतर प्लास्टिक येतात, जे वरीलपैकी कोणत्याही प्रकारात मोडत नाहीत. यामध्ये पॉली कार्बोनेट (Polycarbonate) आणि बायoplastics (Bioplastics) यांचा समावेश असतो. या प्लास्टिकच्या पुनर्वापराची शक्यता कमी असते आणि काहीवेळा ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

महत्वाचे: पाण्याचे बॉटल खरेदी करताना, 2, 4, आणि 5 नंबरच्या प्लास्टिकला प्राधान्य द्या. 1, 3, 6 आणि 7 नंबरचे प्लास्टिक टाळण्याचा प्रयत्न करा.

टीप: अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5000

Related Questions

सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांच्या उपयोग यांचा तक्ता उपक्रम?
द्विनेत्री उपकरणाच्या रचना व कार्याबद्दलची संगणकीय सादरीकरणाचा उपक्रम?
द्विनेत्री रचना व कार्य याबद्दल संगणकीय सादरीकरणाचा उपक्रम?
द्विनेत्रीची रचना व कार्य याबद्दल संगणकीय सादरीकरण उपक्रम?
दुष्ट विद्युत धारा लांब वर नेता येत नाही का?
सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग शोधा आणि त्यांचा एक तक्ता तयार करा.
तुमच्या पाच मित्रांची वजने घेऊन, त्यांचे चंद्रावरील आणि मंगळावरील वजन काढण्याचा एक उपक्रम?